Headlines

India America Trade Deal ; भारत-अमेरिका ट्रेड डील अंतिम टप्प्यात, मग काम अडतंय कुठे? 100% Tariff वरही केला खुलासा, US Ambassador स्पष्टच म्हणाले


सध्या अमेरिका आणि इराण दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. याचा फटका संपूर्ण जगाला पडत आहे. जगभरातील बाजारव्यवस्था कोलमडली आहे. आखाती देशातून मोठ्या प्रमाणात एलपीजी आयात करणाऱ्या भारताने अमेरिकेला एलपीजीचे मुख्य स्त्रोत बनवले आहे. अशामध्ये अमेरिकेचे भारतातील दूतावास Sergio Gor यांनी अमेरिका-भारतातील व्यवसाय करारासंबंधित स्पष्टता दिली आहे. त्यानी स्पष्ट केले आहे की, “दोन्ही देशांमध्ये होत असलेला ‘Trade Deal’ जवळपास पूर्णत्वास आहे.” एकंदरीत, दोन्ही देशांमधील व्यावसायिक करार अंतिम टप्प्यावर आहे. यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा करार अद्याप पूर्ण झालेला नाही.

मग काम अडतंय कुठे?

अमेरिका-भारत व्यावसायिक करार तत्वतः अंतिम टप्प्यावर आला आहे, अद्याप कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणे बाकी आहे. करारातील कायदेशीर आणि तांत्रिक भाषा अंतिम करण्याचे काम सध्या सुरू आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर दोन्ही देशांतील हा महत्वाचा करार अमलात येईल. याचा मोठा फायदा अमेरिकेतील कंपन्यांशी व्यवसाय करू पाहणाऱ्या भारतीय कंपन्यांना होईल.

100% Tariff वरही दिली स्पष्टता

अमेरिकेतील लोकसभेत 100% Tariff ला अनेक खासदारांचा पाठिंबा मिळाला आहे. हा प्रस्ताव अद्याप लागू नाही परंतु जर तो लागू झाला तर याचे परिणाम भारतावरही होऊ शकतात. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या काही देशांच्या मालावर 100% Tariff लावण्याची तरतूद या प्रस्तावात आहे. मुख्य म्हणजे रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचाही समावेश आहे. त्यामुळे जर अमेरिकेने 100% Tariff ला मंजूरी दिली तर याचे पडसाद भारत-अमेरिका व्यावसायिक संबंधांवरही होईल.

मग Sergio Gor यांचे म्हणणे काय?

अमेरिकेचे भारतातील दूतावास Sergio Gor म्हणतात की 100% Tariff चा प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Trump यांनी मांडलेला नाही, तो अमेरिकेच्या संसदेतील Biparstian Proposal आहे. एकंदरीत, हा दोन राजकीय गटांकडून सहमंजुरीने तयार झालेला एक संयुक्त प्रस्ताव आहे. दरम्यान, त्यांनी दोन्ही देशांतील मैत्रीपूर्ण संबंधांवरही भाष्य केले आहे.

भारत आणि अमेरिकेत मैत्रीपूर्ण संबंध

Sergio Gor यांनी सांगितले आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात वैयक्तिकरित्याही घट्ट मैत्री आहे. अगदी Trump ज्यावेळी सत्तेत नव्हते तेव्हाही मोदी यांनी त्यांना पाठिंबा दिला. या भाष्यात Sergio Gor यांनी ‘भारत आमच्यासाठी महत्वाचा आहे’ असा उल्लेख केला तसेच पुरावा म्हणून अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट मॅक्रो रुबिओ यांच्या मे महिन्यातील पाच दिवसांच्या भारत दौऱ्याला अधोरेखित केले. तसेच त्यांनी सांगितले की रुबिओ येत्या ऑक्टोबर महिन्यात पुन्हा एकदा भारत दौरा करणार आहेत.

Maharashtra Timesदेशात एलपीजी पाइप कनेक्टिव्हिटीची होणार वाढ! 7000 कोटींची मोठी गुंतवणूक, प्रत्येकाच्या घरात पीएनजीचे ध्येयपाकिस्तानशी जवळचे संबंध कायम ठेवणार?

“आपले शेजारी आपण निवडू शकत नाही” असे म्हणत Sergio Gor यांनी पाकिस्तान तसेच चीनसह इतर देशांशी संबंध कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एकंदरीत, अमेरिका भारतासाठी कोणत्याही इतर देशांशी संबंध खराब करू इच्छित नाही.

दिवेश चव्हाण

लेखकाबद्दलदिवेश चव्हाणदिवेश दिनेश चव्हाण हे मराठी पत्रकार असून ते सध्या महाराष्ट्र टाइम्स येथे कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2026 पासून ते महाराष्ट्र टाइम्स येथे अर्थ, पर्सनल फायनान्स आणि देश-विदेशातील बातम्यांसंबंधित लेखन करत आहेत. शेअर बाजारातील घडामोडी, बँकिंग, नवे आर्थिक धोरण आणि तांत्रिक नियम अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

यापूर्वी ते नवराष्ट्र या मराठी वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून काम करत होते. या काळात त्यांनी अर्थ, व्यवसाय, करिअर आणि नोकरीसह विविध क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन केले आहे. यासोबतच काल्पनिक कथा लेखन आणि एखाद्या कथेचे स्वारस्यपूर्ण विश्लेषण करण्यातही ते पटाईत आहेत.

त्यांचे शिक्षण ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात झाले. याच ठिकाणी त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे मास्टर ऑफ आर्ट्स इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी आहे. विविध विषयांवर अचूक आणि विश्वासार्ह बातम्या पुरवणे हा त्यांच्या लेखन, पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार माहिती देऊन त्यांना जागतिक घडामोडींविषयी जागरुक ठेवणे हा त्यांचा हेतु आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन वार्षिक अंक Rta मध्ये इंग्रजी रिपोर्टींग विभागाचे हेड म्हणून त्यांनी कारोभार सांभाळला आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत