Headlines

ICC Test Ranking : ICC टेस्ट रँकिंग जाहीर, यॉर्कर किंग बुमराहने कसोटीतील नंबर वनचे सिंहासन गमावले; जाणून घ्या कारण – icc test ranking mitchell starc replaces jasprit bumrah number one position


ICC Test Ranking News : आयसीसी रँकिंग जाहीर झाले असून यॉर्कर किंग बुमराहला झटका बसला आहे. जस्सीने पहिले स्थान गमावले असून नंबर वन कोण? विशेष म्हणजे पहिली कसोटी जिंकूनही भारतीय गोलंदाजांना तोटा झालाय, जाणून घ्या.

ICC Test Ranking Jasprit Bumrah
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आयसीसी कसोटी रँकिंग जाहीर झाली असून ताज्या क्रमवारीनुसार भारताचा हुकमी गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहला मोठा फटका बसला आहे. बुमराहने कसोटीमधील नंबर वन गोलंदाजाचे स्थान गमावले असून पहिल्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू मिचेल स्टार्क याने दोन स्थानांनी प्रगती केली. आॉस्ट्रेलिया आणि बांगलादेशमध्ये पार पडलेली कसोटी मालिका १-१ ने बरोबरीत सुटली. या मालिकेत मिचेल स्टार्क याने २ सामन्यात १२ विकेट नावावर केल्या होत्या. यामधील दुसऱ्या कसोटीमध्येच स्टार्कने १० विकेट नावावर केल्या होत्या. या १० विकेटच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने बांगलादेश संघावर १ डाव आणि ५१ धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे जसप्रित बुमराह हा आता कितव्या स्थानी गेलाय जाणून घ्या.

जसप्रित बुमराहने गेल्या वर्षी म्हणजेच नोव्हेंबर २०२५ पासून एकही कसोटी सामना खेळलेला नाही. आता झालेल्या अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यातही बुमराह खेळला नव्हता. श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत दुखापतग्रस्त झाल्याने त्याला कसोटी मालिकेत खेळता आले नाही. तरीसुद्धा बुमराहकडेच कसोटी नंबर वन गोलंदाचाचा मुकूट होता. मात्र आता स्टार्कने दमदार कामगिरीच्या जोरावर मुसंडी मारलीय. त्यामुळे बुमराह हा दुसऱ्या स्थानी गेला आहे. बुमराह आणि स्टार्कमध्ये १० गुणांचा फरक असून स्टार्क हा पहिल्यांदा कसोटी नंबर वन गोलंदाज झाला असून त्याचे ८७२ गुण आहेत.

Maharashtra TimesAnaya Bangar News : BCCIकडून प्रतिसाद नाही, मग ऑस्ट्रेलियाकडे धाव; अनायाला महिला संघात क्रिकेटची संधी कशी मिळाली? रिपोर्ट ठरला महत्त्वाचा
जसप्रित बुमराहचे ८६२ गुण झाले आहेत. तिसऱ्या स्थानी न्यूझीलंड संघाचा मॅट हेन्री ८६१ गुण, चौथ्या स्थानी पॅट कमिन्स आला असून त्याने एका स्थानाने प्रगती केली आहे. कमिन्सने ८४१ गुणांसह दक्षिण आफ्रिकेच्या मार्को यान्सेनला मागे टाकले आहे. कमिन्सनेही बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेत दोन सामन्यात ७ विकेट घेतल्या होत्या. या कामगिरीचा त्याला फायदा झाला असून चौथ्या स्थानी आला आहे. पहिली कसोटी जिंकल्यावरही भारताचे गोलंदाज मोहम्मद सिराज आणि रविंद्र जडेजा हे रँकिंगमध्ये खाली गेले आहेत. सिराज १४ वरून १८ व्या स्थानी तर जडेजा १६ वरून १९ व्या स्थानी गेला आहे. तर दुसरीकडे पहिला सामना गमावल्यावरही श्रीलंकेचे वेगवान गोलंदाज असिथ फर्नांडो पाच स्थानांची प्रगती करत २० वरून १५व्या स्थानी तर प्रभात जयसूर्याही २१ वरून १६ व्या स्थानी पोहोचला आहे.

Maharashtra TimesSanjay Manjrekar : वैभव आणि जयस्वालला आताच आवरा, संजय मांजरेकरांची जाहीरपणे दोघांवर कारवाई करण्याची मागणी, काय कारण?दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह हा जवळपास ६०० पेक्षा जास्त दिवस नंबर वन होता. मात्र आता त्याने हे स्थान गमावले असून आता यॉर्कर किंगला लवकरात लवकर कमबॅक करावं लागणार आहे.