Headlines

Icc fines mohammad abbas khurram shahzad; वेस्ट इंडिजकडून नामुष्कीनंतर पाकिस्तानला ICC चाही दणका; दोन खेळाडूंवर मोठी कारवाई, काय घडलं होतं?


Icc fines mohammad abbas khurram shahzad : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पाकिस्तानच्या दोन वेगवान गोलंदाजांना आक्रमक सेलिब्रेशन महागात पडलं. आयसीसीने मोहम्मद अब्बास आणि खुर्रम शहजाद यांच्यावर दंडासह डिमेरिट पॉइंटची कारवाई केली आहे. नेमकं काय घडलं?

Icc fines mohammad abbas khurram shahzad
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे. आयसीसीच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज मोहम्मद अब्बास आणि खुर्रम शहजाद यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. विकेट घेतल्यानंतर आक्रमक पद्धतीने जल्लोष केल्यामुळे दोन्ही खेळाडूंना लेव्हल-१ नियमभंगाखाली दोषी ठरवण्यात आलं.

दोन्ही गोलंदाजांना डिमेरिट पॉइंट

आयसीसीच्या कलम 2.5 अंतर्गत खेळाडूंना बाद झालेल्या फलंदाजाला चिथावणी देणारे शब्द, हावभाव किंवा कृती करण्यास मनाई आहे. खुर्रम शहजादने शाय होपला बाद केल्यानंतर त्याच्या अगदी जवळ जाऊन जल्लोष केला. त्यामुळे त्याच्यावर सामन्याच्या मानधनाच्या 15 टक्के दंडासह एक डिमेरिट पॉइंटची शिक्षा सुनावण्यात आली. दुसरीकडे, मोहम्मद अब्बासलाही आक्रमक सेलिब्रेशनमुळे अधिकृत ताकीद देण्यात आली असून त्याच्या खात्यातही एक डिमेरिट पॉइंट जमा करण्यात आला आहे.

Maharashtra TimesAjinkya Rahane : कंठ दाटला, डोळे पाण्याने डबडबले, काळजाचा ठाव घेणारं एकच मराठी वाक्य, रहाणे निवृत्तीच्या घोषणेत काय म्हणाला?

बाबरची झुंज, पण पाकिस्तानचा पराभव

सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी 211 धावांचं लक्ष्य मिळालं होतं. मात्र, जेडन सील्सच्या भेदक गोलंदाजीपुढे पाकिस्तानची अवस्था 9 बाद 71 अशी झाली. सील्सने 20 धावांत 5 विकेट्स घेत पाकिस्तानची फलंदाजी उद्ध्वस्त केली.

अखेर कर्णधार बाबर आझमने नाबाद 58 धावांची झुंज दिली. त्याला 11व्या क्रमांकावरील मोहम्मद अब्बासची 23 धावांची साथ मिळाली. दोघांनी अखेरच्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी करत पराभव काही काळ लांबवला. मात्र, पाकिस्तानचा संपूर्ण डाव 120 धावांत संपुष्टात आला आणि वेस्ट इंडिजने 90 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

Maharashtra TimesAjinkya Rahane : मानलं भावा! अजिंक्य रहाणेने निवृत्ती घेतली पण 2015चा रेकॉर्ड कोणीच मोडू शकलं नाही, काय आहे तो अनब्रेकेबल विक्रम ; जाणून घ्या

बाबरने मान्य केल्या चुका

सामन्यानंतर बाबर आझमने फलंदाजीतील अपयश मान्य केलं. तो म्हणाला, “आम्ही गेल्या काही दिवसांत चांगलं क्रिकेट खेळलो, पण आज फलंदाजीत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. आम्ही सातत्याने विकेट्स गमावत राहिलो. पुढील सामन्यांमध्ये ही चूक टाळण्याचा प्रयत्न करू.”

त्याने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचंही कौतुक करत सांगितलं की, त्यांनी परिस्थितीचा उत्कृष्ट फायदा घेत अचूक मारा केला आणि पाकिस्तानच्या फलंदाजांवर सुरुवातीपासून दबाव कायम ठेवला.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा