Ajinkya Rahane : कंठ दाटला, डोळे पाण्याने डबडबले, काळजाचा ठाव घेणारं एकच मराठी वाक्य, रहाणे निवृत्तीच्या घोषणेत काय म्हणाला? – ajinkya rahane retirement post video viral social media emotional marathi sentence
Ajinkya Rahane : कंठ दाटला, डोळे पाण्याने डबडबले, काळजाचा ठाव घेणारं एकच मराठी वाक्य, रहाणे निवृत्तीच्या घोषणेत काय म्हणाला? – ajinkya rahane retirement post video viral social media emotional marathi sentence
Ajinkya Rahane Retirement News : भारतीय क्रिकेटमधील मराठमोळा लढवय्या क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने आज निवृत्तीची घोषणा केली होती. अजिंक्यसाठी हा निर्णय काही सोपा नव्हता, व्हिडीओमध्ये दिसत आहे की तो किती भावनिक झालेला. व्हिडीओ इंग्रजीमध्ये केला असला तरी त्याचे एक मराठी वाक्य सर्वांच्या काळजाला भिडले, कोणते जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारताची स्टार खेळाडू अजिंक्य रहाणे याने आज निवृत्तीची घोषणा केली. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने सर्व प्रकारातून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. अजिंक्यसाठी हा निर्णय सोपा नव्हता, कारण गेली अनेक वर्ष तो संघाबाहेर होता. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो कायम खेळ होता. टीम मॅनेजमेंटवर निवड झाली म्हणून कधी एक चकारही शब्द काढला नाही. आपल्या प्रदर्शनाच्या जोरावरच त्याने कायम संघात कमबॅक केल्याचं पाहायला मिळालं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी त्याची संघात निवड झाल होती. अशा प्रकारे त्याने याआधी अनेकवेळा कमबॅक केले होते. मात्र यावेळी मात्र त्याला संधा मिळाली नाही, शेवटी त्यानेही थांबण्याचा निर्णय घेतला. अजिंक्यने निवृत्तीचा व्हिडीओ शेअर केला आहे, त्यामध्ये स्पष्ट दिसून येत होतं की भावूक झाला होता. दाटलेला कंठ, डोळे पाण्याने डबडबलेले आणि संपूर्ण प्रवासाबद्दल सांगताना शेवटला एक मराठी वाक्य ज्याने सर्वांच्या काळजाचा ठाव घेतला.
अजिंक्य रहाणे काय म्हणाला?
अजिंक्यने संपूर्ण व्हिडीओ इंग्रजीमध्ये बनवला होता. दोन मिनिटे ५० सेकंदाच्या व्हिडीओमध्ये अजिंक्यने आपला प्रवास मांडला. यामध्ये त्याने सर्वांचे आभार मानले, डोंबिवलीपासून सरावाला येण्याबाबत सांगत आपणही क्रिकेटसाठी भविष्यात योगदान देणार असल्याचं म्हणाला. व्हिडीओ संपत असताना त्याने आवंढा गिळला आणि एक मराठीमध्ये बोलला की, तुम्ही मला कधी परकं मानलं नाही. अजिंक्यचे डोळे पाण्याने भरले होते. लढवय्या मराठमोळा अज्जू आता निवृत्त होत असल्याने चाहत्यांनाही दु:ख झालं आहे.
Ajinkya Rahane : मानलं भावा! अजिंक्य रहाणेने निवृत्ती घेतली पण 2015चा रेकॉर्ड कोणीच मोडू शकलं नाही, काय आहे तो अनब्रेकेबल विक्रम ; जाणून घ्या आयुष्याचं सत्य हेच आहे की प्रत्येक गोष्टीला सुरुवात असते आणि शेवटही असतो. जेव्हा ती वेळ येते तेव्हा ती स्वीकारून पुढे जावंच लागतं. बॅटिंग करताना मी नेहमीच टायमिंगवर विश्वास ठेवला आहे आणि त्याचं महत्त्वही नेहमी समजून घेतलं आहे. आज मला वाटतं की माझ्यासाठी पुढे जाण्याची आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याची योग्य वेळ आली आहे. डोंबिवलीहून फक्त प्रॅक्टिससाठी प्रवास करणाऱ्या त्या लहान मुलापासून आजपर्यंत मी या खेळासाठी माझं सर्वस्व दिलं. दररोज, प्रत्येक इनिंगमध्ये, फलंदाजीची मिळालेली प्रत्येक संधी… माझं स्वप्न नेहमीच भारताची कॅप घालण्याचं होतं. मी एकाच नियमाने आयुष्य जगलो – देश आणि संघाला नेहमी स्वतःपेक्षा आधी ठेवायचं. मी हा खेळ पूर्ण प्रामाणिकपणे खेळल्याचं अजिंक्य रहाणेने म्हटलं आहे. Ajinkya Rahane : 7 वर्षांचा अजिंक्य रहाणे डोंबिवली लोकलच्या गर्दीतून एकटा प्रॅक्टिसला जायचा, बाबांची ट्रिक, सहा वर्षांनी कारण समजताच गहिवरला फर्स्ट-क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून भारतीय क्रिकेटने प्रचंड प्रगती केली आहे. गेल्या वीस वर्षांत त्याचा एक भाग असल्याचा मला खूप अभिमान आहे. भारतीय क्रिकेटपटू म्हणून माझा अध्याय इथे संपला तरी खेळासोबतचा माझा प्रवास संपत नाही. पुढच्या पिढीला मदत करण्यासाठी, या खेळाने मला शिकवलेल्या मूल्यांची जाणीव करून देण्यासाठी आणि ज्याने मला सर्व काही दिलं त्या खेळाला परत देण्यासाठी मी उत्सुक आहे असल्याचं सांगत अजिंक्यने BCCI, MCA, माझे सहकारी, माझे प्रशिक्षक, प्रत्येक IPL फ्रँचायझी, राधिका, माझं संपूर्ण कुटुंब, मित्र आणि ज्यांनी माझ्यासोबत साथ दिली त्या प्रत्येकाचे मनापासून आभारन मानले.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा