Billionaires Family Net Worth: भारतातील सर्वात श्रीमंत उद्योग घराण्यांची लिस्ट समोर आली आहे. यामध्ये अंबानी, अदानी घराण्यांपासून ते कुमार मंगलम बिर्ला आणि जिंदाल घराण्यापर्यंत प्रमुख नावांचा समावेश आहे. अंबानी घराण्याने देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक घराण्याचा आपला किताब कायम राखला तर, पहिल्या पिढीतील व्यावसायिक घराण्यांच्या यादीत अदानी अग्रस्थानी आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबाची संपत्ती
भारतात श्रीमंतांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत आहे आणि व्यावसायिक कुटुंबे सतत व्यवसायाचा विस्तार करत आहेत. बार्कलेज आणि हुरुन इंडियाच्या नव्या अहवालानुसार, भारतातील 3 सर्वात मोठ्या व्यावसायिक कुटुंबांची एकत्रित निव्वळ संपत्ती जून 2026 पर्यंत 42 ट्रिलियन रुपये, म्हणजेच अंदाजे 42 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. यामध्ये अब्जाधीश मुकेश अंबानी, के. एम. बिर्ला आणि जिंदाल कुटुंबाचा समावेश आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत उद्योग घराणे
देशातील सर्वात श्रीमंत उद्योग घराण्यांच्या यादीत रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे कुटुंब 25.8 लाख कोटींच्या संपत्तीसह अव्वल स्थानावर असून कौटुंबिक संपत्ती 8.1 लाख कोटींसह के. एम. बिर्ला कुटुंब दुसऱ्या स्थानावर आहे, जी अंबानींच्या संपत्तीपेक्षा 3 पटीने कमी आहे. त्यानंतर जिंदाल कुटुंब 8 लाख कोटींच्या निव्वळ संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सुनील मित्तल आणि बिर्ला घराण्याची संपत्ती किती
तसेच दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी एअरटेलचे प्रवर्तक सुनील भारती मित्तल, 12.1 लाख कोटींच्या नेट वर्थसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून पहिल्या पिढीतील व्यावसायिकांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय 8.14 लाख कोटी रुपयांच्या निव्वळ संपत्तीसह बिर्ला घराणे देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक घराण्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.
18व्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेइतकी संपत्ती
हुरुन इंडियाचे संस्थापक आणि मुख्य संशोधक, अनस रहमान जुनैद यांनी म्हटले की मागील दोन वर्षांत टॉप-300 व्यावसायिक कुटुंबांनी दररोज सरासरी 4076 कोटींची भर घातली, यावरून भारतीय कौटुंबिक व्यवसायांची वाढती ताकद स्पष्ट होते. या कुटुंबांची एकत्रित संपत्ती अंदाजे 38 लाख कोटी किंवा $1.46 ट्रिलियन असल्याचा अंदाज आहे, जी नेदरलँड्स, सौदी अरेबिया, स्वित्झर्लंड आणि पोलंड यांसारख्या देशांना मागे टाकून जीडीपीच्या बाबतीत जगातील 18वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.
वेदांताच्या अध्यक्षांची मोठी झेप
बार्कलेज आणि हुरुन इंडियाच्या अहवालानुसार, वेदांता ग्रुपचे मालक अब्जाधीश अनिल अग्रवाल कुटुंबाने क्रमवारीत सर्वात मोठी झेप घेतली. वर्षभरात मूल्यांकनात 74.7% वाढ झाल्यानंतर वेदांता ग्रुप टॉप-10 यादीत तीन स्थानांनी वर चढून सहाव्या स्थानी पोहोचला आहे.
पहिल्या पिढीतील कुटुंबांमध्ये अदानींचे वर्चस्व
तसेच पहिल्या पिढीतील अव्वल व्यावसायिक कुटुंब म्हणून अदानींनाही मानाचे स्थान मिळाले आहे. अदानी कुटुंबाची एकूण संपत्ती 19.57 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज असून त्यांच्यापाठोपाठ भारती एअरटेलचे सुनील भारती मित्तल कुटुंबाची संपत्ती 21.1 लाख कोटी रुपये तर, सन फार्मा इंडस्ट्रीजचे संस्थापक दिलीप संघवी 4.54 लाख कोटींच्या मूल्यांकनासह पहिल्या पिढीतील कुटुंबांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
भारताचा जीडीपी किती
2025-26 या आर्थिक वर्षात भारताचा नाममात्र जीडीपी 3.92 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजे अंदाजे 328 लाख कोटी रुपये आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या एप्रिल 2026 मधील ‘जागतिक आर्थिक दृष्टिकोन’ अहवालानुसार सरकारने ऑगस्ट 2026 मध्ये ही घोषणा केली आणि यासह भारत सध्या जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.

