Headlines

How To Avoid Property Disputes; मालमत्तेवरून हसतं-खेळतं कुटुंब दुभंगले, मृत्युपत्राचा वाद कसा सोडवाल? जाणून घ्या संपत्ती वाटणीची सोपी युक्ती

Property Disputes: मालमत्तेशी संबंधित वाद-विवाद वर्षानुवर्षे चालतात आणि नातेसंबंध व हसतं-खेळतं कुटुंब उध्वस्त होतात. योग्य वेळी थोडी समज आणि योग्य नियोजन केल्यास तुम्ही तुमच्या पश्चात घरातील प्रियजनांना भविष्यातील न्यायालयीन लढाया, मानसिक ताण आणि आर्थिक नुकसानीपासून वाचवू शकता.

Tips To Avoid Family Disputes over Property
मालमत्ता, संपत्तीवरून कौटुंबिक वाद टाळण्यासाठी काय करायचे?
Property Rules: पैसा व मालमत्तेवरून उद्भवणारे वाद हसतं-खेळतं कुटुंब उध्वस्त करू शकतात. आपल्या देशात आजही न्यायालयांमध्ये मालमत्तेशी संबंधित अनेक प्रकरणे प्रलंबित असून बरीच प्रकरणे – मग ते घर, जमीन, रोख रक्कम किंवा व्यवसाय असो – मालमत्तेच्या विभागणीभोवती फिरतात.

मालमत्तेचे वाद टाळायला योग्य नियोजन करा

मालमत्तेचे वाद टाळायला योग्य नियोजन करा

बहुतेक प्रकरणात लोभापोटी लोक वाद घालत नाही तर, लोकांना मृत व्यक्तीची अंतिम इच्छा नीट समजलेली नसते किंवा त्यांच्याकडे मालमत्तेची योग्य कागदपत्रे उपलब्ध नसतात. अशाप्रकारे, कायदेशीर वादांमध्ये अनेक वर्षे आणि वेळ वाया जाऊ शकतो. पण योग्य नियोजनामुळे हा सगळा त्रास टाळता येऊ शकतो.

स्पष्ट आणि कायदेशीर वैध मृत्युपत्र करा

स्पष्ट आणि कायदेशीर वैध मृत्युपत्र करा

तुमच्या पश्चात कुटुंबातील संभाव्य वाद टाळण्यासाठी कायदेशीरदृष्ट्या मजबूत मृत्युपत्र तयार केले पाहिजे. तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या संपत्ती किंवा मालमत्तेचा वारसा कोणाला मिळणार हे मृत्युपत्रात स्पष्ट नमूदकेलेले असले पाहिजे. तसेच मृत्युपत्राशिवाय वारसा कायद्यानुसार मालमत्तेची विभागणी करण्याची खात्री करा, जे कदाचित तुमच्या इच्छेनुसार नसेल. मृत्युपत्रामध्ये सर्व वारसांची नावे आणि मालमत्तेचे स्पष्ट-संपूर्ण वर्णन नमूद करा. (प्रातिनिधीक फोटो)

नॉमिनेशन अपडेट करून घ्या

नॉमिनेशन अपडेट करून घ्या

बँक अकाऊंट, विमा किंवा गुंतवणुकीचा नामनिर्देशित व्यक्ती (नॉमिनी) हीच मालमत्तेची मालक असते, असा बहुतेकांचा समज असतो. पण बऱ्याच प्रकरणांमध्ये नामनिर्देशित व्यक्ती केवळ काळजीवाहू असते, वास्तविक मालक नाही. म्हणून कोणताही गोंधळ टाळण्यासाठी लग्न, घटस्फोट, मुलाचा जन्म किंवा अपघातानंतर लगेचच नामनिर्देशन अद्ययावत करा आणि तुमच्या मृत्युपत्राशी सुसंगत करून घ्या.

सर्व मालमत्तेची संपूर्ण नोंद ठेवा

सर्व मालमत्तेची संपूर्ण नोंद ठेवा

कुटुंबातील सदस्यांना मालमत्तेची रक्कम माहिती नसल्यामुळे भविष्यात वाद होतात. त्यामुळे बँक अकाउंट, मुदत ठेवी, म्युच्युअल फंड, शेअर्स आणि विम्याची कागदपत्रे एकत्रित करून ठेवा जेणेकरून नंतर शोधाशोध कमी होईल. तुमच्या कुटुंबासाठी गोष्टी सोप्या करण्यासाठी तुमच्या सर्व मालमत्ता आणि कर्जांची यादी तयार ठेवा.

तुमचे विचार कुटुंबाला सांगा

तुमचे विचार कुटुंबाला सांगा

मृत्यू आणि मालमत्ता या दोन्ही महत्त्वाच्या उघडपणे चर्चा केली पाहिजे. लक्षात घ्या की या दोन्ही मुद्द्यावर मौन अधिक धोकादायक ठरू शकतो. तुम्ही एखादा मोठा निर्णय घेत असाल, तर प्रथम तुमच्या कुटुंबाशी मोकळेपणाने बोला. तुम्हाला मालमत्तेच्या प्रत्येक पैश्याबद्दल सांगायची गरज नाही तर, फक्त तुमच्या निर्णयामागील कारण स्पष्ट करा जेणेकरून नंतर कुटुंबाला कोणताही धक्का बसणार नाही.

वेळोवेळी तुमच्या योजनेचा आढावा घ्या

वेळोवेळी तुमच्या योजनेचा आढावा घ्या

प्रत्येक दिवस सारखे नसतात, म्हणून तुमच्या मालमत्तेचे नियोजनही बदलले पाहिजे. लग्न, मुलं असो किंवा नसो तुम्ही एखादी नवीन, मोठी मालमत्ता खरेदी करता, तेव्हा तुमच्या मृत्युपत्र आणि त्यातील नामनिर्देशनांचे पुनरावलोकन करा व आवश्यक असल्यास बदल करा. कालबाह्य आणि अपूर्ण मृत्युपत्र हे Will नसण्याइतकेच धोकादायक ठरू शकते.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा