मुंबई : भारत आणि इंग्लंडमधील पहिल्या टी-२० सामन्याला सुरूवात झाली आहे. भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. इंग्लंडमधील रिव्हरसाइड ग्राऊंड चेस्टर ली स्ट्रीट येथे हा सामना पार पडत असून भारताकडून सलामीला संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा उतरतील. आजच्या सामन्यामध्ये या दोघांकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा असणार आहे. कारण आयर्लंडमध्ये संजू अपयशी ठरला होता. तर अभिषेकने ४९ धावा केल्या होत्या. आजचा संघ पाहिला तर वरूण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई मैदानात नवीन चेहरे दिसतील. बाकी सर्व संघ आयर्लंड मालिकेमधीलच आहे.
आज आयसीसी रँकिंग जाहीर झाली असून ईशान किशन जगातील नंबर वन फंलदाज ठरला आहे. तर दुसऱ्या नंबरवर अभिषेक शर्मा दुसऱ्या स्थानी गेला आहे. आज भारताच्या टॉप ऑर्डरमध्ये जगातील दोन टॉप खेळाडू खेळणार आहेत. आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये भारत पहिल्या आणि इंग्लंच दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यामुळे आज दोन अव्वल संघांमध्ये चुरशीचा सामना होऊ शकतो. Womens Team : वाघिणींनो अभिनंदन! टी-20 वर्ल्ड कपचं स्वप्न तुटलं पण महिला संघासाठी ऑलिम्पिकआधी आनंदाची बातमी भारत आणि इंग्लंड दोन्ही संघ शेवटचे आता पार पडलेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भिडले होते. भारताने हा सामना जिंला होता तर त्या सामन्यात जेकब बेथल याने भारताविरूद्ध शतक ठोकलेले. आजच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी याला संधी मिळाली नाही. सामन्याआधीच कॅप्टन श्रेयस अय्यर याने याबाबत हिंट दिलीच होती. त्यामुळे वैभवच्य पदार्पणासाठी चाहत्यांना वाट पाहावी लागणार आहे. IND vs ENG : याला काय अर्थ आहे! वैभव सूर्यवंशीला आजही खेळवणार नाहीत, मॅचआधी कॅप्टन अय्यर काय म्हणाला? भारताने तीन स्पिनर्स उतरवले आहेत. यामध्ये हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि शिवम दुबे बॉलिंग करतान दिसतील. तर स्पिन गोलंदाजीची जबाबदारी रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांच्यावर असणार आहे. तर कॅप्टन श्रेयस अय्यर आपल्या पहिल्या विजयासाठी उत्सुक आहे.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा