Headlines

Hospital Fire: पाकिस्तानच्या बाल रुग्णालयात भीषण स्फोट, १६ पैकी १५ नवजात अर्भकांचा जागीच मृत्यू


Islamabad Hospital Fire: पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये असलेल्या सरकारी रुगालयात १५ नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. १६ पैकी एक नवजात अर्भकाचा जीव वाचवण्यात यश आला. ही नर्सरी मध्ये AC चा कॉम्प्रेसर फुटल्याने आग लागल्याचे समोर आले आहे. बचाव कार्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

Pakistans hospital caught fire
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
इस्लामाबाद: पाकिस्तानच्या राजनधीमध्ये एक भीषण घटना घडल्याचे समोर आले आहे. सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात आग लागून १५ नवजात बालकांचा मृत्यू झाला. ही आग AC चा कॉम्प्रेसर जळाल्याने लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घडलेली घटना ही इस्लामाबाद येथील पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (PIMS) या रुग्णालयात घडली. पाकिस्तानी वृत्त जियो न्यूजच्या रिपोर्ट नुसार रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, गायनेकोलॉजी वार्डमध्ये घटनेच्यावेळी एकूण १६ नवजात अर्भक होते. मात्र त्यांपैकी एकाच नवजात बालकाचा जीव वाचण्यात यश आला. तर १५ नवजात अर्भकांनाच मृत्यू झाला. बचाव कार्य सुरु असून रुग्णालयात असलेल्या नर्सरी मध्ये AC चा कॉम्प्रेसर फुटल्याने आग लागली.

बचाव कार्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर

बचाव कार्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, या व्हिडिओमध्ये रुग्णालयाच्या पहिल्या माळ्यावर असलेल्या नर्सरीच्या खिडकीचा काच तोडून आत जातांना अग्निशमन दलाचे जवान दिसत आहे. पाकिस्तानी वृत्त जियो न्यूजच्या रिपोर्टनुसार बचाव पथकाने सांगितले की रुग्णालयात लागलेली आग विझवण्यात आली असून कूलिंग ऑपरेशन सुरु आहे. जेणेकरून पुन्हा आग लागण्याचा धोका कमी होऊ शकणार.

Maharashtra Timesआधी अशक्तपणा, मग लकवा अन् मृत्यू; हत्ती कोसळले, ते उठलेच नाहीत; 20 जणांचा जीव कोणी घेतला?

PIMS च्या प्रवक्ता काय म्हणाल्या?

डॉनच्या रिपोटनुसार PIMS च्या प्रवक्ता डॉ. अनीजा जलील यांनी सांगितले की रुग्णालयात गायनेकोलॉजी वार्डमध्ये सकाळी ७ वाजता आग लागायला सुरुवात झाली.या घटनेच्या तपासणीकरीता एडिशनल डिप्टी कमिश्नरच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती तयार करण्यात आली आहे. नेमकी आग कश्यामुळे लागली याचा तपास चौकशी समिती घेणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

PIMS मध्ये इम्रान खानला नेण्यात आले होते

PIMS (पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस) हा तोच रुग्णालय आहे ज्या रुग्णालयात पाकिस्तानचे पूर्व प्रधानमंत्री इम्रान खानला कोर्टाच्या आदेशावर आरोग्य तपासणीनंतर वैधकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा