Headlines

horrific cruiser car accident at parbhani selu-valur road 13 passenger injured ; लग्नाला समारंभाला जाताना अनर्थ; वऱ्हाडाच्या वाहनाला भीषण अपघात, 13 जण जखमी


Parbhani Accident: सेलू-वालूर रस्त्यावर लग्न सोहळ्यासाठी जात असलेल्या क्रुझर गाडीला मंगळवारी अपघात झाला. या अपघातात १३ वऱ्हाडी जखमी झाले आहेत. नेमकं काय घडलं?

parbhani accident
क्रुझरच्या अपघातात 13 वऱ्हाडी जखमी(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
परभणी : सेलू-वालूर रस्त्यावरील आलम शहा दर्ग्याजवळ मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास क्रुझर गाडीचा (क्रमांक एमएच १३ एझेड ३०२६) भीषण अपघात झाला. या अपघातात १३ जण जखमी झाले असून ५ ते ६ जणांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयातून मिळाली आहे.

जिंतूर तालुक्यातील ढोणे दहेगाव येथील वऱ्हाडी मंडळी क्रुझर गाडीने वालूर मार्गे सेलू तालुक्यातील खवणे पिंपरी येथे एका लग्न सोहळ्यासाठी जात होती. वालूर शिवारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातातील जखमींना तातडीने सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर सर्वांना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे यांनी दिली.

Maharashtra TimesPalghar News : पालघरमध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग; तांत्रिक बिघाड असूनही पायलटच्या निर्णयामुळे जीवितहानी टळली, चार जीव वाचले…
या अपघातात परमेश्वर जाधव, ज्ञानबा वाकडे, मधुकर ढोणे, अशोक अण्णासाहेब, भाऊसाहेब ढोणे, ज्ञानेश्वर पवार, विठ्ठल ढोणे, मधुकर ढोणे, नागेश गोडगे, पांडुरंग ढोणे, ज्ञानेश्वर वाकडे आणि परमेश्वर ढोणे हे प्रवासी जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी दीपककुमार वाघमारे, पोलिस निरीक्षक दीपक बोरसे, पोलिस उपनिरीक्षक गणेश पवार, जमादार गुलाब राठोड व पोलिस कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी पाहणी केली. दरम्यान, या अपघाताबाबत रात्री उशिरापर्यंत सेलू पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Maharashtra TimesHSC Board Exam: बारावीच्या पहिल्याच पेपरला सामूहिक कॉपी; मदत करणारे मास्तरही CCTVमध्ये कैद, 19 जणांवर कारवाई
तर दुसऱ्या एका घटनेत, देशसेवेसाठी कर्तव्य बजावून आपल्या कामासाठी गावी आलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) जवानाचा अपघाती मृत्यू झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी-देवकर येथील तोंडेवस्तीजवळ रस्ता ओलांडताना भरघाव वाहनाच्या धडकेत मराडेवाडीचे (ता. इंदापूर) सुपुत्र आणि सीआरपीएफ जवान महादेव दादा नाझीरकर (वय ३४) यांचा मृत्यू झाला.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा