Parbhani Accident: सेलू-वालूर रस्त्यावर लग्न सोहळ्यासाठी जात असलेल्या क्रुझर गाडीला मंगळवारी अपघात झाला. या अपघातात १३ वऱ्हाडी जखमी झाले आहेत. नेमकं काय घडलं?

जिंतूर तालुक्यातील ढोणे दहेगाव येथील वऱ्हाडी मंडळी क्रुझर गाडीने वालूर मार्गे सेलू तालुक्यातील खवणे पिंपरी येथे एका लग्न सोहळ्यासाठी जात होती. वालूर शिवारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातातील जखमींना तातडीने सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर सर्वांना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे यांनी दिली.
Palghar News : पालघरमध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग; तांत्रिक बिघाड असूनही पायलटच्या निर्णयामुळे जीवितहानी टळली, चार जीव वाचले…
या अपघातात परमेश्वर जाधव, ज्ञानबा वाकडे, मधुकर ढोणे, अशोक अण्णासाहेब, भाऊसाहेब ढोणे, ज्ञानेश्वर पवार, विठ्ठल ढोणे, मधुकर ढोणे, नागेश गोडगे, पांडुरंग ढोणे, ज्ञानेश्वर वाकडे आणि परमेश्वर ढोणे हे प्रवासी जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी दीपककुमार वाघमारे, पोलिस निरीक्षक दीपक बोरसे, पोलिस उपनिरीक्षक गणेश पवार, जमादार गुलाब राठोड व पोलिस कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी पाहणी केली. दरम्यान, या अपघाताबाबत रात्री उशिरापर्यंत सेलू पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
HSC Board Exam: बारावीच्या पहिल्याच पेपरला सामूहिक कॉपी; मदत करणारे मास्तरही CCTVमध्ये कैद, 19 जणांवर कारवाई
तर दुसऱ्या एका घटनेत, देशसेवेसाठी कर्तव्य बजावून आपल्या कामासाठी गावी आलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) जवानाचा अपघाती मृत्यू झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी-देवकर येथील तोंडेवस्तीजवळ रस्ता ओलांडताना भरघाव वाहनाच्या धडकेत मराडेवाडीचे (ता. इंदापूर) सुपुत्र आणि सीआरपीएफ जवान महादेव दादा नाझीरकर (वय ३४) यांचा मृत्यू झाला.

