Heavy rains cause devastating flood in gadchiroli 40 year old teacher asantu soma talandi drowns; पुराच्या पाण्यातून जाताना सरांचा घात झाला; 40 वर्षीय शिक्षकाचा बुडून मृत्यू
Heavy rains cause devastating flood in gadchiroli 40 year old teacher asantu soma talandi drowns; पुराच्या पाण्यातून जाताना सरांचा घात झाला; 40 वर्षीय शिक्षकाचा बुडून मृत्यू
गडचिरोली: राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. विशेषत: मुंबई, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील अमरावती आणि गडचिरोली यांसारख्या जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसामुळे पूर आला असून एक दुःखद घटना घडली. पेरमिली केंद्रातील शिक्षक असन्तु सोमा तलांडी यांचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. ते नाला ओलांडताना पाण्यात वाहून गेले असून त्यांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, 18 ऑगस्टपासून गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. नद्या आणि नाले पाण्याने तुडुंब भरले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. अहेरी पंचायत समिती अंतर्गत पेरमिली केंद्र आहे. या केंद्रातील शिक्षक असन्तु सोमा तलांडी (वय 40) यांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ते जोनावाहीचे रहिवासी होते.
असन्तु तलांडी हे पल्ले येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते. पल्ले गाव पेरमिलीपासून 10 किलोमीटर दूर आहे. 18 ऑगस्ट रोजी शाळा सुटल्यावर ते घरी निघाले होते. सिपनपल्ली मार्गे जात असताना, नाला ओलांडताना ते पाण्यात वाहून गेले. 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी सिपनपल्ली नाल्यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. “जोनावाही येथील शिक्षक बेपत्ता आहेत,” असे कळल्यावर महसूल कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना बोलावले. तो मृतदेह असन्तु सोमा तलांडी यांचाच असल्याचे त्यांनी ओळखले.
दरम्यान, भामरागड तालुक्यात अशी ही दुसरी घटना आहे. 18 ऑगस्ट रोजी खंडी नाला ओलांडताना लालचंद कपिलसाय लकडा नावाचा 19 वर्षांचा तरुण वाहून गेला होता. त्यानंतर आता असन्तु सोमा तलांडी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. असन्तु यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा