Headlines

Head & Neck Cancer Symptoms, causes, signs, prevention tips; डोकं व मानेच्या कॅन्सरची लक्षणे, संकेत, कारणे व उपाय


तोंडातील छाला, आवाज बसणे, गिळताना त्रास किंवा मानेला गाठ यांसारखी लक्षणे अनेकदा सामान्य समजून दुर्लक्षित केली जातात. मात्र, ही डोके आणि मानाच्या कर्करोगाची सुरुवातीची चिन्हे असू शकतात. तंबाखू, गुटखा, मद्यपान आणि HPV संसर्गामुळे या कर्करोगाचा धोका वाढतो. दोन ते तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ लक्षणे कायम राहिल्यास तातडीने ईएनटी तज्ज्ञ किंवा ऑन्कोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा. वेळेवर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात आणि बोलणे, गिळणे तसेच जीवनाची गुणवत्ता जपता येते. तंबाखू-मुक्त जीवनशैली, तोंडाची स्वच्छता आणि नियमित तपासणी हा बचावाचा सर्वोत्तम मार्ग आहे.

head neck cancer
head neck cancer
छातीत दुखणे, सतत येणारा तीव्र ताप किंवा अचानक वजन कमी होणे अशा लक्षणांकडे बहुतेक लोक लगेच लक्ष देतात. परंतु, तोंड, घसा किंवा आवाजात होणाऱ्या बदलांकडे बहुतांश वेळा दुर्लक्ष केले जाते. तोंडात झालेला आणि बरा न होणारा छाला (Mouth Ulcer), घशातील सततची खवखव किंवा आवाजातील घोगरापणा यांसारख्या समस्यांना लोक सहसा हवामानातील बदल, ताणतणाव किंवा सामान्य संसर्ग समजून सोडून देतात. तथापि, ही साधी दिसणारी लक्षणे डोके आणि मानाच्या कर्करोगाची (Head and Neck Cancer) सुरुवातीची चिन्हे असू शकतात. डोके आणि मानाच्या कर्करोगात तोंडाची पोकळी, जीभ, घसा, स्वरयंत्र, नाकाची पोकळी, थायरॉईड आणि लाळ ग्रंथींच्या कर्करोगाचा समावेश होतो. भारतात हा कर्करोग अत्यंत वेगाने पसरणाऱ्या कर्करोगांपैकी एक आहे. परंतु, दिलासादायक बाब म्हणजे वेळेवर निदान झाल्यास यावर पूर्णपणे मात करता येते.

कर्करोगाचा धोका वाढवणाऱ्या दैनंदिन सवयी

कर्करोगाचा धोका वाढवणाऱ्या दैनंदिन सवयी

आपल्या दैनंदिन जीवनशैलीतील काही सवयी या कर्करोगाला थेट आमंत्रण देतात:

  • तंबाखूचे सेवन : सिगारेट, बिडी, सिगार, हुक्का किंवा गुटखा, खैनी आणि मावा यांसारख्या तंबाखूच्या सर्व प्रकारांमुळे तोंडातील नाजूक पेशींवर कर्करोगजन्य (Carcinogenic) घटकांचा परिणाम होतो, ज्यामुळे पेशींमध्ये अनियंत्रित वाढ सुरू होते.
  • दारूचे अतिसेवन : जास्त प्रमाणात दारू प्यायल्याने तोंड आणि घशाच्या आतील मऊ त्वचेचे नुकसान होते. तंबाखू आणि दारू एकत्र सेवन केल्यास कर्करोगाचा धोका अनेक पटींनी वाढतो.
  • एचपीव्ही (HPV) संसर्ग : आजकाल ‘ह्युमन पॅपिलोमाव्हायरस’ (HPV) मुळे तरुण वर्गात आणि तंबाखूचे सेवन न करणाऱ्यांमध्येही घशाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे.
  • इतर कारणे : तोंडाची अस्वच्छता, नीट न बसणारे बनावट दात, निकृष्ट आहार आणि हवेचे प्रदूषण यांमुळेही कर्करोगाचा धोका संभवतो.

तुमचे तोंड, घसा आणि आवाज देतात हे ५ गंभीर संकेत

तुमचे तोंड, घसा आणि आवाज देतात हे ५ गंभीर संकेत

डोके आणि मानाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे सामान्य आजारांसारखीच दिसतात, त्यामुळे अनेक जण स्वतःच्या मनाने औषधे घेत राहतात किंवा त्रास आपोआप कमी होण्याची वाट पाहतात. खालील लक्षणे २ ते ३ आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे:

  • बरा न होणारा छाला : तोंडात किंवा जिभेवर आलेला छाला जो २-३ आठवड्यांत बरा होत नाही.
  • आवाजात बदल : अचानक आवाज घोगरा होणे किंवा आवाजात बदल होणे.
  • गिळताना त्रास : अन्न किंवा पाणी गिळताना त्रास किंवा वेदना होणे.
  • गाठ किंवा चट्टे : मान किंवा जबड्यात गाठ (Lump) येणे, किंवा तोंडात पांढरे (Leukoplakia) व लाल (Erythroplakia) चट्टे पडणे.
  • इतर लक्षणे : तोंडून अस्वाभाविक रक्तस्त्राव होणे, सतत कान दुखणे किंवा जीभ व जबडा हलवण्यास त्रास होणे.

होमिओपॅथी, आयुर्वेद आणि उपचारांमधील दिरंगाई

होमिओपॅथी, आयुर्वेद आणि उपचारांमधील दिरंगाई

भारतात कर्करोगाच्या उपचारांत होणारा विलंब हा रुग्णाच्या जीवावर बेतणारा सर्वात मोठा घटक आहे. अनेक रुग्ण लक्षणे दिसल्यानंतर वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध नसलेल्या उपचारांच्या मागे (उदा. काही होमियोपॅथी किंवा आयुर्वेदाच्या अनधिकृत दाव्यांवर) महिनोन महिने वेळ वाया घालवतात. तुम्ही वेळ वाया घालवत असता, पण कर्करोग थांबत नाही! पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात असलेला कर्करोग पाहता पाहता तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात पोहोचतो. कर्करोगात ‘उपचारांना होणारा विलंब हाच खरा मारेकरी’ आहे.

कर्करोगापासून बचावासाठी सुरक्षित आणि सोपे उपाय

कर्करोगापासून बचावासाठी सुरक्षित आणि सोपे उपाय

कर्करोगाला रोखण्यासाठी खालील जीवनशैलीचा स्वीकार करणे आवश्यक आहे:

  • व्यसनमुक्ती : तंबाखू, गुटखा आणि दारूचे सेवन पूर्णपणे थांबवणे हा कर्करोग टाळण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे.
  • तोंडाची काळजी : रोज दात आणि तोंडाची व्यवस्थित स्वच्छता राखा. नियमित दंतवैद्यकांकडून तपासणी करून घ्या.
  • संतुलित आहार : आहारात फळे, हिरव्या भाज्या आणि अँटीऑक्सिडंट्सचा समावेश करा.
  • स्क्रीनिंग आणि तपासणी : जर तुम्ही तंबाखू किंवा दारूचे सेवन करत असाल, तर वर्षातून किमान एकदा कान-नाक-घसा तज्ज्ञ (ENT) किंवा ऑन्कोलॉजिस्टकडून तपासणी (Screening) करून घ्या.

शरीराची प्रत्येक चेतावणी गंभीरपणे घ्या

शरीराची प्रत्येक चेतावणी गंभीरपणे घ्या

कर्करोग होण्यापूर्वी शरीर अनेकदा काही सूक्ष्म इशारे देत असते. तोंडातील छाला, आवाजातील बदल, गिळताना होणारा त्रास किंवा मानेवर आलेली सूज ही लक्षणे काही आठवड्यांनंतरही कायम राहिली, तर ती सामान्य समजून दुर्लक्ष करू नका. अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. डोके आणि मानाच्या कर्करोगाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची सुरुवातीची अनेक लक्षणे सहजपणे दिसून येतात. त्यामुळे योग्य वेळी तपासणी आणि उपचार सुरू केल्यास जीव वाचण्याबरोबरच उपचारांचा खर्च आणि शस्त्रक्रियेची गुंतागुंतही मोठ्या प्रमाणात कमी करता येते.

तुमच्या शरीराने दिलेल्या संकेतांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तोंडात बरा न होणारा छाला, आवाजातील घोगरापणा किंवा मानातील गाठ या साध्या वाटणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करून अनधिकृत उपायांमध्ये वेळ वाया घालवू नका.

वेळेवर निदान (Early Detection) का महत्त्वाचे आहे?

वेळेवर निदान (Early Detection) का महत्त्वाचे आहे?

सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास डोके आणि मानाचा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो.

  • अवयवांचे आणि कार्याचे रक्षण : वेळेवर उपचार केल्यास रुग्णाचा जीव तर वाचतोच, पण बोलणे, अन्न गिळणे आणि चेहऱ्याचा नैसर्गिक आकार कायम राखणे शक्य होते.
  • उपचारांचा खर्च आणि गुंतागुंत : उशिरा निदान झाल्यास गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी आणि केमोथेरपीची गरज पडते, ज्यामुळे उपचारांचा खर्च प्रचंड वाढतो आणि रुग्णालाही शारीरिक त्रास जास्त होतो.
प्रतीक्षा सुनील मोरे

लेखकाबद्दलप्रतीक्षा सुनील मोरेप्रतीक्षा सुनील मोरे या एक अनुभवी आणि कुशल मराठी कंटेंट रायटर व पत्रकार असून त्यांना मीडिया आणि डिजिटल क्षेत्राचा सुमारे 12 वर्षांपेक्षा प्रदीर्घ अनुभव आहे. पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ABP Majha या प्रख्यात वृत्तवाहिनीमधील इंटर्नशिपपासून केली. कालांतराने त्यांनी वृत्तवाहिनी, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि OTT माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत आपली कारकीर्द सातत्याने उंचावत नेली आहे.

पुढे त्यांनी TV9 मराठी वृत्तवाहिनीत पूर्णवेळ पत्रकारिता सुरु केली, जिथे प्रत्यक्ष रिपोर्टिंग आणि बातमी संकलनाच्या प्रक्रियेत त्यांची पत्रकार म्हणून भक्कम जडणघडण झाली. घटनास्थळी जाऊन बातम्यांचा मागोवा घेणं, तथ्य पडताळणं आणि प्रेक्षकांपर्यंत विश्वासार्ह माहिती पोहोचवणं या मूलभूत पत्रकारितेच्या मूल्यांवर त्यांची भक्कम पकड आहे.

पत्रकारीतेमधील अनुभवानंतर त्यांनी kesari tours and travels कंपनीत ट्रॅव्हलिंग व टूरिझम या विषयावरही प्रभावी लिखाण करत Travelling क्षेत्रातही अनुभव संपादन केला. त्यानंतर त्यांना Zee Entertainment OTT प्लॅटफॉर्मवर क्रिएटीव्ह राईटिंगच्या कौशल्यावर नवी जबाबदारी हाताळण्याची संधी मिळाली. येथे त्यांनी डिजिटल कंटेंटच्या सादरीकरणातील बारकावे आत्मसात केले. कंटेंटची मांडणी, अचूक वर्गीकरण आणि प्रेक्षकांच्या आवडीनुसार सादरीकरण, मराठी मालिकांचे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आकर्षक Synopsis लिखाण या प्रक्रियेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. याखेरीज कारकीर्दीच्या अनेक टप्प्यावर त्यांनी स्क्रिप्ट रायटिंग, स्टोरी डेव्हलपमेंट आणि सोशल मीडिया हाताळण्याचा व्यापक अनुभव मिळवला.

कथा आणि स्क्रिप्ट लेखन, वेबसाईट व ब्लॉगसाठी लेखन, अचूक संपादन कौशल्य आणि कठोर डेडलाईन्समध्ये काम पूर्ण करण्याची क्षमता हे त्यांच्या व्यावसायिक व्यक्तिमत्त्वाचे ठळक गुण आहेत . विषयाचा सखोल अभ्यास करून तो सोप्या, स्पष्ट, वाचकांच्या मनाला भिडेल व पटेल आणि परिणामकारक भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवणे, हे त्यांच्या लेखनाचं बलस्थान आहे. नियोजनबद्ध कामाची सवय, संघटन कौशल्य आणि स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता यामुळे त्या प्रत्येक जबाबदारीत यशस्वी ठरल्या आहेत .

गेल्या 6 वर्षांपासून प्रतीक्षा या लाइफस्टाईल विभागासाठी सातत्याने काम करत आहेत. फॅशन, हेल्थ, रिलेशनशिप, प्रेग्नेंसी पॅरेंटिंग, प्रवास, करिअर आणि बदलत्या जीवनशैलीशी निगडित विषयांचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. केवळ ट्रेंड सांगणं नव्हे, तर त्या ट्रेंडमागची कारणं, सामाजिक परिणाम आणि वाचकांच्या दैनंदिन आयुष्यात त्याचा उपयोग कसा होऊ शकतो, हे सोप्या आणि स्पष्ट भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

गंभीर रिसर्च करण्याची सवय, विषयांमध्ये बारकाईने शिरण्याची वृत्ती आणि प्रत्येक लेखातून वाचकांना काहीतरी नवं देण्याची धडपड यामुळे प्रतीक्षा यांनी लाइफस्टाईल पत्रकारितेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. वाचकांना केवळ माहिती देणं नव्हे, तर त्यांना विचार करायला लावणं आणि त्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा देणं, हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश असतो.

कामाव्यतिरिक्त त्यांना वाचन, स्वतःसाठी लेखन, प्रवास आणि व्यायामाची विशेष आवड आहे . विविध विषयांवरील वाचनामुळे त्यांच्या लेखनाला अधिक खोली मिळते, तर प्रवासातून मिळणारे अनुभव त्यांच्या आशयाला व्यापक दृष्टिकोन देतात. सातत्य, अभ्यासू वृत्ती आणि लेखनावरील प्रामाणिक प्रेम यामुळे प्रतीक्षा सुनील मोरे यांनी डिजिटल पत्रकारितेत स्वतःची वेगळी आणि ठाम ओळख निर्माण केली आहे.

शैक्षणिक दृष्ट्या त्यांनी Journalism या विशेष विषयासह Bachelor of Mass Media ही पदवी कीर्ती महाविद्यालय, मुंबई येथून 2015 साली पूर्ण केली आहे. शिक्षणातून मिळालेलं तांत्रिक ज्ञान आणि प्रत्यक्ष क्षेत्रातील अनुभव यांचा संगम त्यांच्या लेखनात स्पष्टपणे दिसून येतो.आणखी वाचा