Gondia 45 Nursing Students Food Poisoning: विषबाधा झालेल्या विद्यार्थिनींवर शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.

स्थानिक बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या परिसरातील शासकीय नर्सिंग महाविद्यालयात १८५ प्रशिक्षणार्थी विद्यार्थी नर्सिंगचे प्रशिक्षण घेत आहेत. सर्व विद्यार्थ्यांना कॉलेजच्या कॅन्टीनमधून जेवण आणि नाश्ता दिला जातो. बुधवारी रात्री विद्यार्थी जेवण करून झोपायला गेले. नंतर रात्री दोन-तीन विद्यार्थिनींना पोटात दुखू लागले तसेच उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे त्यांना उपचारासाठी तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास नर्सिंग कॉलेजमधील इतर विद्यार्थ्यांनाही तसाच त्रास जाणवू लागला. त्यामुळे, या सर्व विद्यार्थ्यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.
Rishikesh Vaidya : मी महादेवाचा अवतार; पुण्यातील विवाहितेवर लॉजमध्ये अत्याचार, वसईच्या स्वयंघोषित धर्मगुरुवर गुन्हा, खरात केसनंतर महिलेला बळ
नर्सिंग कॉलेजमधील सर्व १८५ विद्यार्थ्यांनी कॅन्टीनमध्ये जेवण केले होते. यापैकी ४५ जणांना संसर्ग झाला. दरम्यान, हे सर्व ४५ विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असून तेथील डॉक्टरांनी त्यांच्या लक्षणांना दुजोरा दिला आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जात आहे. विषबाधे मागील कारण शोधण्यासाठी अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हर यांनी रुग्णालयात जाऊन बाधित विद्यार्थीनींची भेट घेत विचारपूस केली.
Crime News : प्लॉट विक्रीच्या वादातून संसाराची राखरांगोळी, पतीच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली; संतापात नवऱ्याला संपवलं
रामनवमी उत्सवाला जाणाऱ्या भाविकांना उडविले; एक ठार
रामनवमी उत्सवात सहभागी होण्यासाठी पायी वारी करीत निघालेल्या अकोला जिल्ह्यातील तीन भाविक तरुणांवर काळाने घाला घातला. भरधाव मालवाहू पिकअपने चिरडल्याने एक जण ठार झाला; तर दोघे गंभीर जखमी झाले. खामगाव तालुक्यातील संभापूर ते लासुरा फाट्यादरम्यान गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. हर्षल गजानन फाळके (वय १७, रा. वाहळा बुद्रूक, ता. पातूर, जि. अकोला) असे मृत तरुणाचे, तर शंकर अशोक ठाकरे आणि धनंजय शिवनारायण सिरसाठ अशी गंभीर तरुणांची नावे आहेत.

