याआधी सोमवार, 10 ऑगस्ट रोजी, बाजार उघडताच चांदीच्या दरांनी उसळी घेतलेली, तर सोन्याच्या दरात किंचित घसरण झाली. पण, संध्याकाळपर्यंत दोन्ही मौल्यवान धातूंवर तेजीचा हिरवा रंग चढला. अशा स्थितीत, मंगळवार, 11 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय बाजारापासून सराफा बाजारापर्यंतच्या दरांवर एक नजर टाकूया.
सोने चांदीच्या दरात तेजीचा ट्रेंड कायम
गेल्या काही महिन्यांपासून स्थिर राहिलेल्या सोने आणि चांदीच्या दरांनी सलग दुसऱ्या दिवशी जोरदार मुसंडी मारली आहे. देशांतर्गत बाजारात मंगळवारी, सलग तिसऱ्या सत्रात, सोन्याच्या दरात वाढ होऊन दोन महिन्यांहून अधिकच्या उच्चांकावर पोहोचले. त्याचवेळी, व्याजदरांबाबत फेडरल रिझर्व्हच्या धोरणाचे संकेत मिळवण्यासाठी गुंतवणूकदार अमेरिकेतील महागाईच्या आकडेवारीकडे नजर लावून आहेत.
मंगळवारी सकाळी, 9.15 वाजता बाजाराच्या सुरुवातीला MCX वर सोन्याचा वायदा भाव 1.19 टक्के वाढून 1,54,924 रुपयांच्या आसपास व्यवहार करत असताना चांदीच्या फ्युचर्स किमती 0.90 टक्क्यांनी वाढून 2,38,999 रुपये किलोवर पोहोचल्या. त्याचप्रमाणे, 24 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 1,55,210 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 1,42,276 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 1,16,408 रुपये प्रति 10 ग्रॅम असून चांदीचा भाव 2,40,340 रुपये किलो झाला आहे. अशाप्रकारे, गेल्या काही सत्रातील स्थिर व्यवहारांनंतर गुंतवणूकदारांचा पुन्हा खरेदीचा कल वाढल्याने बुलियन दरात मोठी वाढ झाली.
Adani US Case: अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; Criminal Case रद्द, लाचखोरी-फसवणुकीचे आरोप मागे; तरी लागेल 18 दशलक्ष डॉलर्सचा दंडदुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात Comex वर सकाळच्या व्यवहारांदरम्यान आंतरराष्ट्रीय स्पॉट सोन्याचे भाव 1.68% वाढून 4,494 डॉलर्स प्रति औंसवर पोहोचले, तर चांदीचे भाव 1.88% वाढीसह 66.50 डॉलर्स झाले. तसेच अमेरिकी स्पॉट गोल्डचा भाव सोमवारच्या (10 ऑगस्ट) सत्रात 1,50,208 रुपये इतका राहिला.
अमेरिकेतील व्याजदराचा सोन्यावरील दबाव
कमोडिटी सहामाही अहवालावर भाष्य करताना मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडचे कमोडिटी संशोधन प्रमुख, नवनीत दमानी म्हणतात की, “2026 च्या पहिल्या सहामाहीने हे दाखवून दिले आहे की युद्ध आणि सोने यांच्यातील संबंध आता अधिकाधिक अटींवर आधारित झाले आहेत. बाजार आता केवळ भू-राजकीय बातम्यांना प्रतिसाद देण्याऐवजी या घडामोडींचा महागाई, वास्तविक व्याजदर आणि चलनविषयक धोरणाच्या अपेक्षांवर कसा परिणाम होतो यावर लक्ष ठेवून आहे. वाढते वास्तविक परतावे सोन्यासाठी प्रमुख अडथळा म्हणून समोर आले, ज्याने भू-राजकीय तणाव वाढलेला असूनही पारंपारिक सुरक्षित गुंतवणुकीच्या मागणीला मागे टाकले. गुंतवणूकदारांनी भविष्यात मौल्यवान धातूंचे मूल्यांकन करण्याच्या पद्धतीमध्ये झालेला हा एक महत्त्वाचा रचनात्मक बदल आहे.”
2026 या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपातीची शक्यता, मध्यवर्ती बँकांची खरेदी आणि ETF गुंतवणुकीमुळे सोन्याच्या दरवाढीला बळ मिळालेले. मात्र, अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे टॅरिफमुळे वाढलेला उत्पादनांचा खर्च आणि महागाई वाढण्याच्या भीतीमुळे व्याजदर दीर्घकाळ उच्च राहण्याची शक्यता बळावली, ज्यामुळे सोन्यावर विक्रीचा दबाव वाढला.
अशा स्थितीत, गुंतवणूकदार नवीन आर्थिक संकेतांकडे नजर ठेवून असल्यामुळे सोन्याचे भाव स्थिर आहेत. यामध्ये या आठवड्यात अमेरिकेच्या CPI आकडेवारीवर मुख्य लक्ष असेल, ज्यामुळे फेडरल रिझर्व्हचा धोरणात्मक दृष्टिकोन आणि भविष्यातील व्याजदरांबाबत अपेक्षा निश्चित केले जातील.

