Today’s Gold-Silver Rate 7 August 2026: देशभरात MCX तसेच सराफा बाजारांमध्ये सोने आणि चांदीच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तेजीचा कल पाहायला मिळत आहे, जो आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही सुरूच राहिला. शुक्रवार, 7 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत दोन्ही बाजारांमध्ये तेजी दिसून आल्याने सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली.

सोने-चांदीची घोडदौड सुरूच
सोन्याचा वायदा दर पुन्हा एकदा दीड लाखांच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे, तर चांदीची किंमत अडीच लाख रुपये किलोच्या जवळपास व्यवहार करत आहे. MCX वर सोन्याचे फ्युचर्स 0.37% वाढीसह 1,49,587 रुपयांवर व्यवहार करत आहेत तर, चांदीचा वायदा 1.05 टक्क्यांनी वाढून 2,28,151 रुपये किलोच्या आसपास व्यवहार करत आहेत. त्याचवेळी, वार्षिक आधारावर सोन्याच्या किमतीत तब्बल 46.48% मोठी वाढ झाली असून गेल्या वर्षभरात सराफा बाजारात सोन्याच्या किमती सातत्याने मजबूत राहिल्या असून गुंतवणूकदारांनी शानदार नफा कमावला.
सोन्याची किंमत वाढणार की घसरणार?
जागतिक अनिश्चिततेच्या काळात MCX वर सोन्याच्या किमती गुरुवारी सात आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचल्या, पण खरा प्रश्न हा आहे की: सोन्याचा भाव आता 1.50 लाखांचा टप्पा ओलांडेल का, की प्रॉफिट-बुकिंगमुळे येथून भाव खाली येतील?
RBI New Rules: EMI न भरल्यास बँक मोबाईल-लॅपटॉप लॉक नाही करू शकणार; कर्जदारांना RBI चा मोठा दिलासा, लोन रिकव्हरीच्या दादागिरीला लगामहोर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा एकदा कोणत्याही शुल्क किंवा अडथळ्याशिवाय खुली केली जाऊ शकते, असे अहवालतुन समोर आले असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही अमेरिका इराणसोबत करार करण्याच्या प्रयत्नात असल्याचे संकेत दिले. अशा परिस्थितीत, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अडथळा दूर झाल्यास पश्चिम आशियातील तणाव कमी झाल्यास कच्च्या तेलाच्या किमती नरम पडू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे चलनवाढीचा दबाव आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हवरील व्याजदर वाढवण्याचा दबाव कमी होईल. परिणामी, अमेरिकेच्या ट्रेझरी यील्ड्समध्ये घट झाली, ज्यामुळे सोन्याला आधार मिळाला.
यादरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या. ब्रेंट क्रूड 0.51% घसरून प्रति बॅरल 80 डॉलरच्या खाली आले, तर WTI क्रूड जवळपास 1% घसरणीसह प्रति बॅरल 75 डॉलरच्या खाली व्यवहार करत होते.

