Commodity Market: सोने आणि चांदीच्या दरांमधील यावर्षातील पहिल्या सहामहीतील चढ-उतारांनी गुंतवणूकदारांची नक्कीच चिंता वाढवली आहे. गेल्या दोन वर्षांत उच्चांकी झेप घेणाऱ्या सोने-चांदीच्या दरानं उतरती कळा लागली असून गुंतवणूकदार संभ्रमात सापडले आहेत की ही घसरण खरेदीची संधी आहे की सोन्याचे दर आणखी घसरणार आहेत?
सोन्या-चांदीच्या दरांना उतरती कळा
गुरुवार, 16 जुलै रोजी, सकाळी MCX वर सोने आणि चांदीच्या दरांमध्ये घसरणीचा कल कायम राहिला. पश्चिम आशियातील तणाव निवळण्याची चिन्हे अजूनही दिसत नसून अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे महागाई दीर्घकाळापर्यंत उच्च राहण्याची भीती निर्माण झाली. यामुळे अमेरिकेच्या फेड रिझर्व्हला यावर्षी व्याजदर वाढवावे लागतील, अशी शक्यता आणखी बळावली आहे.
इराणवर अमेरिकेच्या नव्या हल्ल्यानंतर पिवळसर सोन्याची किंमत 0.9% पर्यंत घसरली आणि 4,025 डॉलर्सच्या आसपास कमी झाली. होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांना लक्ष्य करणे इराणने थांबवेपर्यंत हल्ले सुरूच ठेवण्याचा निर्धार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला.
सध्या अमेरिकेशी वाटाघाटी करण्याचा इराणचा कोणताही विचार नसल्याचे माध्यमांमधील वृत्तांवरून समोर आले आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सांगितले की, अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर इराणचे संपूर्ण लक्ष देशाच्या सुरक्षेवर केंद्रित आहे आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराण ‘ठामपणे’ प्रत्युत्तर देणे सुरूच ठेवेल.
यादरम्यान, अमेरिकेने इराणी लष्करावर हल्ल्यांच्या दोन नवीन हल्ले केले. तेहरानने वाटाघाटी सुरू न केल्यास इराणमधील वीज प्रकल्प आणि पुलांवरही लष्करी हल्ले वाढवले जातील, असा ट्रम्प यांनी आधीच इशारा देऊन जगाचे टेन्शन वाढवले आहे.
गेल्या महिन्याभरापासून मध्यपूर्वेतील युद्धाला विराम लागलेला पण, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष नव्याने निखळल्यामुळे प्रमुख मध्यवर्ती बँकांच्या लक्ष्यांपेक्षा महागाई जास्त राहण्याचा धोका वर्तवला आहे. अमेरिकेतील महागाई आणि CPI निर्देशांकाचे आकडे नरमले, पणवाढत्या ऊर्जा किमतींमुळे महागाई वाढण्याचा धोका बाजारातील सहभागींमध्ये स्पष्ट दिसून येत आहे.
जून महिन्यात अमेरिकेतील CPI महागाई दर मे महिन्यातील 4.2% वरून 3.5% पर्यंत कमी झाली, तर मे महिन्यात 0.5% वाढल्यानंतर महिन्यागणिक अमेरिकेचा ग्राहक किंमत निर्देशांक, एप्रिल 2020 नंतर, 0.4% घसरला.
लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.
मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.
पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.
2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.
शैक्षणिक पात्रता
प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.… आणखी वाचा