Headlines

Gold Silver Price Today 25 August 2026; ऐन सणासुदीत सोन्याच्या दरांनी घेतली भरारी, चांदीचा झगमगाटही महागच; दरांची पुन्हा कसोटी लागणार, अमेरिकेचा निर्णय दिशा ठरणार


Gold Price News: सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा तेजीचा कल सुरू झाला आहे, तर चांदीच्या दरांमध्ये चढ-उतार होत आहेत. सणासुदीच्या तोंडावर तुम्ही सोने-चांदीचे दागिने खरेदीचा विचार करत असाल तर, हीच योग्य वेळ असू शकते. पश्चिम आशियात अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव कायम असून क्षेपणास्त्र हल्ल्यांवर ब्रेक लागला आहे. तसेच जागतिक बाजाराच्या भक्कम आधारामुळे सोने आणि चांदीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

सोन्याच्या दराने पाच महिन्यांचा उच्चांक गाठला, तर चांदीनेही चार महिन्यांच्या उच्चांकीवर झेप घेतली आहे. अशा परिस्थितीत, आता गुंतवणूकदार तसेच ज्वेलर्स, खरेदीदार बाजारातील पुढील हालचालींकडे लक्ष ठेवून असतील जे सोने-चांदीची दरवाढ किंवा घसरणीबाबत संकेत देतील.

Maharashtra TimesEPFO Pension: फक्त 10 वर्षं नोकरी, तरी उतारवयात मिळणार पेन्शन; 15000 मूळ पगार असलेल्यांचं संपूर्ण गणित समजून घ्या

सोने-चांदीचा आजचा दर काय

देशांतर्गत बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या दरांमध्ये संमिश्र कल दिसत आहे. भारतीय वायदा बाजार, MCX वर, सोन्याचा वायदा किंचित वाढून 1.63 लाख रुपयांवर स्थिर राहिला आहे तर, चांदीच्या फ्युचर्स किमती कमी होऊन 2.43 लाखांवर घसरल्या आहेत. याआधी गेल्या आठवड्यात, शुक्रवारी, सोन्याचा दर 1,64,400 रुपयांवर पोहोचला होता आणि 9 मार्चनंतर प्रथमच जादुई स्तर गाठला आहे.

सोन्याच्या दरवाढीचे कारण काय

अमेरिका-इराणमधील तणाव, डॉलरचे अवमूल्यन आणि सुरक्षित गुंतवणुकीच्या मोठी मागणी यांमुळे देशांतर्गत बाजारात तेजी आली. तसेच काही तज्ज्ञ म्हणतात की ही तेजी केवळ भू-राजकीय तणावाचा परिणाम नसून अमेरिकेतील स्थूल-आर्थिक बदलांचाही परिणाम आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरील कर्ज प्रथमच 40 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले त्यानंतर, ट्रेझरी सेक्रेटरी बेसेंट यांनी दीर्घकालीन रोखे बायबॅक करण्यासाठी आणि कर्जाचा खर्च कमी करण्यासाठी नवीन योजना जाहीर केली. यामुळे बॉण्ड यील्डमध्ये मोठी घट झाली आणि डॉलर दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर (98.5) घसरला.

Maharashtra Timesआधी इथेनॉल, मग कमी उत्पादन, आता नवे कारण समोर; देशातली प्रमुख साखर उद्योग संस्था स्पष्टच म्हणालीसोने-चांदीचे दर आता वाढणार की घसरणार?

अशा परिस्थितीत, आता सोन्याच्या भविष्यातील हालचालीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून असणार आहे, विशेषतः भारतात सणासुदीचे दिवस सुरू होताना खरेदीदारही सराफा बाजारातील चढ-उतारांकडे बारीक लक्ष ठेवून असतील.

या दरम्यान, सोन्याची पुढील वाटचाल आता भू-राजकारणापेक्षा महागाईच्या आकडेवारीवर अधिक अवलंबून असेल. या आठवड्यात बाजार यूएस कोअर पीसीई आकडेवारी आणि जॅक्सन होल येथील केविन वॉर्श यांच्या विधानावर करडी नजर ठेवून असतील. याशिवाय पुढील काही तासांत इराणवरील निर्बंधांची घोषणाही सर्वात मोठा प्रेरक घटक ठरू शकतो.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर कडक निर्बंध लादल्यास कच्चे तेल महाग होईल, ज्यामुळे फेड रिझर्व्हला व्याजदर वाढवणे भाग पडू शकते. परिणामी सोन्याच्या वाढीचा वेग मंदावू शकतो. मात्र, हलक्या प्रमाणात निर्बंध लादले आणि महागाईचे आकडे कमी झाले, तर या आठवड्यात सोने आणि चांदीमध्ये आणखी मोठी वाढ दिसून येऊ शकते.