Headlines

PPF Child Account Investment ; मुलांच्या भविष्यासाठी सरकारी स्कीम! पीपीएफ योजनेतून उभी करा सहा लाखांची बचत, जाणून घ्या संपूर्ण गणित


तुम्हाला तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी काही बचत करायची असेल तर पीपीएफ एक उत्तम पर्याय ठरू शकतो. पीपीएफ म्हणजे पब्लिक Provident Fund. या सरकारी योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी सुरक्षित निधी उभारू शकता. भविष्यात मुलाच्या शिक्षणात ही रक्कम कामी येऊ शकते. जर तुमची मुलं लहान असतील तर बचतीसाठी ही योजना उत्तम ठरू शकते.

प्रत्येक आई-वडील आपल्या मुलाच्या नावाने पीपीएफ खाते तयार करू शकते. जर कुटुंबात आई, वडील आणि दोन मुलं असे चारजण का असेना तरी घरातील प्रत्येक सदस्य पीपीएफ खात्यास पात्र आहे. एका कुटुंबात फक्त काही ठराविकच पीपीएफ खाते असावेत अशा काही अटी नाहीत. अट मात्र एकच म्हणजे एका कुटुंबाला दर वर्षी त्यांच्या पीपीएफ खात्यात फक्त 1.50 लाख रुपयांपर्यंतची रक्कम डिपोजिट करण्यांची मुभा देण्यात आली आहे. 1.50 लाख रुपये एका कुटुंबियांद्वारे जमा होणारी मर्यादित रक्कम आहे.

उदाहरणार्थ., जर पालकांनी त्यांच्या पीपीएफ खात्यात एका वर्षात 80,000 रुपयांची रक्कम जमा केली आणि मुलांच्या खात्यात 1,00,000 रुपयांची रक्कम जमा केली. याचा अर्थ त्या कुटुंबाद्वारे जमा करण्यात आलेली एकूण वार्षिक रक्कम 1,50,000 हून 30,000 रुपयांनी जास्त आहे त्यामुळे त्या 30,000 रुपयांवर पीपीएफ योजनेअंतर्गत असणारे व्याजही मिळणार नाही आणि त्यातून होणाऱ्या उत्पन्नावर कर सवलतही दिली जाणार नाही. पीपीएफ खात्यात वर्षाला 500 रुपये ते 1.50 लाख रुपये इतकीच रक्कम जमा करता येते.

या योजनेअंतर्गत फक्त 15 वर्षांसाठी रक्कम जमा करता येते. 15 वर्षानंतर तुमची जमा रक्कम मॅच्युर होते. परंतु, जर तुम्हाला या योजनेचा आणखीन 5 वर्षे लाभ घ्यायचा असेल तर तशी मुभा देण्यात आली आहे.

जर तुम्हाला 15 वर्षांनी किमान साडे सहा लाखांचा निधी उभा करायचा असल्यास दर महिन्याला 2000 रुपये पीपीएफ खात्यात जमा करणे आवश्यक आहे. दर महिन्याला 2000 रुपये म्हणजे एका वर्षात तुमच्या खात्यात 24,000 रुपयांची रक्कम जमा होते, जी दीड लाख रक्कमेसंदर्भात असलेल्या अटींना पात्रही ठरते. 15 वर्षांच्या या योजनेत तुमच्या पीपीएफ खात्यात एकूण 3,60,000 रुपयांची रक्कम जमा होते.

Maharashtra TimesDemat खातेधरकांसाठी महत्वाची बातमी! आता नॉमिनीची जागा भरणे सक्तीचे, SEBI च्या नव्या नियमांत काय-काय?पीपीएफ योजनेची विशेष बाब म्हणजे यात चक्रवाढ व्याज आहे. एकंदरीत, पहिल्या वर्षी पीपीएफ खात्यात 24,000 जमा झाले तर त्यावर 7.1% ने वार्षिक व्याज मिळेल. दुसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या खात्यात आधीच्या वर्षांची मूळ रक्कम आणि त्यावर मिळालेला व्याज मिळून एकूण 24,921 रुपये जमा होतील. दुसऱ्या वर्षात तुमच्या खात्यात एकूण रक्कम 48,921 रुपये असतील. याच जमा रकमेवर तुम्हाला दुसऱ्या वर्षीचा व्याज मिळेल. अशा प्रकारे जर 15 वर्षांसाठी तुम्ही दर माह 2000 रुपये तुमच्या पीपीएफ खात्यात जमा केले तर 15 वर्षात तुमच्या हातात 6.37 लाख मिळण्याची शक्यता आहे.