Headlines

Gold-Silver Price Crash; सराफा बाजारात घबराट… पिवळसर सोने 17000 रुपये, चांदीची किंमत 51000 रुपयांनी उतरली; भाव कमी होण्याची काय आहेत कारणे?


Gold Price Crash Explained: सोने आणि चांदीच्या किमतीत आतापर्यंतचा एका महिन्यातील मोठा भूकंप पाहायला मिळाला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात संघर्ष सुरू झाल्यापासून सोन्या-चांदीच्या दरांमध्ये सतत दबाव पाहायला मिळाला असून युद्ध शमल्यावर मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ अपेक्षित होती, पण जूनच्या महिन्याभरात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरणीची त्सुनामी आली ज्यामुळे गुंतवणूकदारांचे गणितच बिघडले.

Gold and Silver prices Crash
सोने चांदी रेकॉर्डब्रेक घसरले! किमती कमी होण्याची काय आहेत कारणे?(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Commodity Market Sell-Off: जून महिन्याच्या अगदीआधी सोने आणि चांदीची खरेदी करणाऱ्यांना या अख्ख्या महिन्याभरात मोठा शॉक बसला असेल. अख्ख्या जून महिन्यात सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून यामुळे एकीकडे खरेदीदारांची चंगळ झाली तर, गुंतवणूदारांना मोठा धक्का बसला आहे.

इराण-अमेरिका युद्ध संपले आणि शांतता चर्चा सुरू झाली झाल्यावर जून महिन्यात सोने आणि चांदीच्या किमती ंना उतरती कळा लागली. परिणामी सोने आणि चांदीच्या किमती वाढणे अपेक्षित होते, पण मौल्यवान धातूंनी यु-टर्न घेतला आणि किमतीत मोठी घसरण झाली. गेल्या कित्येक वर्षांतील जून महिन्यातील ही सर्वात मोठी पडझड ठरली आहे. ही लक्षणीय घसरण का झाली? आपण समजून घेऊया…
Maharashtra Timesनव्या आयकर प्रणालीत मिळतात 5 टॅक्स बेनिफिट; तुम्ही वाचवू शकता कर, ITR भरण्यापूर्वी जाणून घ्या कसा आणि कुठे

जून महिन्यात सोने-चांदी किती स्वस्त झाले?

देशांतर्गत फ्युचर्स बाजार, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याची किंमत एका महिन्याभरात 17000 रुपयांनी घसरली, तर 29 मे पासून सोन्याचा वायदा दर 10.36 टक्क्यांनी कमी झाला आहे. त्याचप्रमाणे, सोन्यापाठोपाठ चांदीची किंमतही जमिनीवर कोसळली आहे. जून महिन्यात चांदीच्या दरात 51000 रुपयांची, म्हणजेच 18.56% घट झाली असून या लक्षणीय घसरणीनंतर गुंतवणूकदार नव्याने सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत.

सोन्या-चांदीच्या घसरणीमागे कोणाचा हात?
इराण आणि अमेरिकेने युद्ध थांबवून पश्चिम आशियात परिस्थिती सामान्य करण्यासाठी ‘शांतता करारा’वर स्वाक्षरी केल्या, ज्यामुळे सोने-चांदीच्या किंमतीत वाढ अपेक्षित होती. पण इकडे युद्ध थांबताच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या निवेदनामुळे घसरणीचा जोर वाढला. फेड रिझर्व्हचे नवीन अध्यक्ष केविन वॉर्श यांनी यावर्षी व्याजदर वाढण्याचे संकेत दिले, ज्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतीत घसरणीचा कल सुरू झाला.
Maharashtra Times900 रुपयांचा शेअर 2800 वर; देशातील नामचीन म्युच्युअल फंड कंपनीच्या IPO पूर्वी GMP मध्ये गुंतवणूकदारांना मिळतोय तगडा रिस्पॉन्स
जागतिक बाजारात अनेक तज्ज्ञ फेड रिझर्व्हच्या पुढील बैठकीत व्याजदर वाढीचा अंदाज वर्तवत असून यामुळे सोने आणि चांदीच्या किमतीत सातत्याने घसरणीचा ट्रेंड दिसून येत आहे. याशिवाय आधीच उच्चांकी शिखरावर पोहोचलेल्या सोन्या-चांदीत गुंतवणूक करणारे आता नफावसूली करून सुरक्षित मालमत्तेऐवजी शेअर बाजारात गुंतवणूक वाढवत आहेत, ज्यामुळे सोन्याच्या किमतीतील घसरण आणखी तीव्र झाली.
Maharashtra TimesBank Holidays July 2026: जुलैमध्ये 12 दिवस बँकांचे कामकाज बंद पडणार; सुट्ट्यांची यादीच पाहूनच कामाचे प्लॅनिंग करा
किती स्वस्त झालं सोने-चांदी?
सोन्याची किंमत जानेवारी 2026 मधील आपल्या सर्वकालीन उच्चांकावरून अंदाजे 29% घसरली आणि 4000 डॉलरच्या खाली आली. तर, चांदीची किंमतही 50% पेक्षा जास्त घसरणीसह सुमारे 57 डॉलरवर कमी झाली आहे.

(Disclaimer: सोन्या-चांदीमधील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते, तुम्ही सोने किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आधी तुमच्या भरवशाच्या आर्थिक तज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.)

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा