Headlines

Gir Cow A2 Milk vs Regular Milk Difference and Health Benefits, Myths & Facts | गीर गाईचे ए2 दूध की साधे दूध जास्त हेल्दी असते? जाणून घ्या वैज्ञानिक सत्य


आजकाल बाजारामध्ये साध्या दुधाव्यतिरिक्त ‘गीर गाईचे ए२ दूध’ (A2 Milk) म्हणून एक नवा पर्याय मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहे. अनेक जाहिरातींमुळे लोकांमध्ये या दुधाविषयी प्रचंड उत्सुकता आहे, परंतु सामान्य दुधापेक्षा हे दूध नक्की कसे वेगळे आहे आणि त्याचे आरोग्याला काय फायदे होतात, हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेणे गरजेचे आहे.

दुधाचा उगम आणि प्रथिनांची रचना (Protein Structure)

95
दुधाचा उगम आणि प्रथिनांची रचना

गीर गाईचे दूध हे प्रामुख्याने भारतातील अस्सल देशी वंशाच्या ‘गीर’ (Gir) या गाईच्या जातीपासून मिळवले जाते. याउलट, आपण जे नियमित दूध वापरतो ते प्रामुख्याने संकरित किंवा परदेशी वंशाच्या (Crossbred cattle – जसे की जर्सी किंवा होल्स्टाईन) गाई-म्हशींचे असते. या दोन्ही दुधांमधील सर्वात मुख्य आणि मूलभूत फरक हा त्यातील प्रथिनांच्या (Protein Structure) रचनेत असतो. गीर गाईच्या दुधात केवळ ‘ए२ बीटा-केसिन’ (A2 beta-casein) नावाचे प्रोटीन आढळते, तर नियमित दुधामध्ये ‘ए१’ (A1) आणि ‘ए२’ (A2) या दोन्ही प्रकारच्या बीटा-केसिन प्रथिनांचे मिश्रण असते.

गीर गाईच्या दुधाचे शरीराला होणारे फायदे

96
गीर गाईच्या दुधाचे शरीराला होणारे फायदे

गीर गाईच्या दुधात केवळ ए२ प्रोटीन असल्यामुळे आरोग्याला खालील फायदे मिळतात:

  • पचनास हलके : हे दूध पचायला अत्यंत सोपे असते आणि शरीरात याचे शोषण जलद गतीने होते (High Bioavailability).
  • अ‍ॅसिडिटी होत नाही : अनेक लोकांना नियमित दूध पिल्यावर गॅस किंवा अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो, परंतु गीर गाईच्या दुधामुळे अ‍ॅसिडिटी (पित्त) होण्याचा धोका नसतो.
  • अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध : यामध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
  • कोलेस्टेरॉलवर नियंत्रण : हे दूध शरीरात हानिकारक सीरम कोलेस्टेरॉल (Serum Cholesterol) तयार होण्यास प्रतिबंध करते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.

कोणी हे दूध पिणे टाळावे किंवा मर्यादित करावे?

97
कोणी हे दूध पिणे टाळावे किंवा मर्यादित करावे?

जरी गीर गाईचे दूध आरोग्यासाठी चांगले मानले जात असले, तरी काही विशिष्ट वैद्यकीय समस्या असलेल्या व्यक्तींनी याचे सेवन करणे टाळावे:

  • लॅक्टोज इनटॉलरन्स (Lactose Intolerance) : ज्या लोकांना दुधातील लॅक्टोज शर्करा पचत नाही, त्यांनी हे दूध पिणे टाळावे, कारण ए२ दुधातही लॅक्टोजचे प्रमाण असतेच.
  • गाईच्या दुधाची अ‍ॅलर्जी : ज्यांना गाईच्या प्रथिनांची अ‍ॅलर्जी आहे, त्यांनी हे दूध घेऊ नये.
  • पोटाचे जुनाट विकार : आयबीडी (IBD) आणि आयबीएस (IBS) यांसारख्या गंभीर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी हे दूध पिणे टाळावे.
  • किडनीचे आजार : ज्या रुग्णांना मूत्रपिंडाचे आजार आहेत, त्यांनी आपल्या आहारातील प्रथिनांचे आणि खनिजांचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी या दुधाचे सेवन अत्यंत मर्यादित करावे.

लहान मुलांसाठी दुधाचे नियम आणि बुद्धिमत्तेचा गैरसमज

98
लहान मुलांसाठी दुधाचे नियम आणि बुद्धिमत्तेचा गैरसमज

अनेक पालकांमध्ये असा एक मोठा गैरसमज आहे की, गीर गाईचे दूध पिल्याने मुलांची बुद्धिमत्ता प्रचंड वाढते आणि त्यांच्या शारीरिक विकासाचे टप्पे वेगाने पूर्ण होतात. परंतु, पोषणतज्ज्ञांच्या मते या दाव्याला कोणताही वैज्ञानिक आधार किंवा पुरावा उपलब्ध नाही. नियमित दुधाच्या तुलनेत गीर गाईचे दूध अतिरिक्त बुद्धिमत्ता देते हे सिद्ध झालेले नाही. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मुलांसाठी खालील नियम पाळावेत:

  • जन्मानंतरचे पहिले ६ महिने बाळाला केवळ आणि केवळ स्तनपान (Exclusive Breastfeeding) देणे अनिवार्य आहे. गाईचे दूध हे आईच्या दुधाला पर्याय ठरू शकत नाही.
  • ६ महिन्यांनंतर स्तनपानासोबतच बाळाला वयानुसार वरचा मऊ आहार (Complementary Food) सुरू करावा.
  • बाळ १ वर्षाचे झाल्यानंतरच त्याच्या संतुलित आहाराचा एक भाग म्हणून त्याला गाईचे दूध दिले जाऊ शकते.

गीर दूध खरंच श्रेष्ठ आहे का?

99
गीर दूध खरंच श्रेष्ठ आहे का?

पोषक घटकांचा विचार केला तर गीर गाईच्या दुधामध्ये लॅक्टोज, उच्च दर्जाची प्रथिने (High-Quality Protein), मध्यम साखळीतील ट्रायग्लिसराइड्स असलेले फॅट प्रोफाईल (Medium Chain Triglycerides), आणि कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी यांसारखी सूक्ष्म पोषक तत्वे असतात.

परंतु, विज्ञानाचा आणि डाएटिशियनचा अंतिम निष्कर्ष असा आहे की, गीर गाईचे दूध हे पोषक तत्वांच्या बाबतीत नियमित दुधापेक्षा खूप जास्त श्रेष्ठ किंवा वरचढ आहे, असे सांगणारा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा सध्या उपलब्ध नाही. दोन्ही दुधांमधील मुख्य फरक केवळ पचनक्षमतेचा (ए१ विरुद्ध ए२ प्रोटीन) आहे, पौष्टिक मूल्यांचा नाही.

जर तुम्हाला नियमित दूध पिल्यावर पोट फुगणे, गॅस होणे किंवा पचनाचा त्रास होत असेल, तर गीर गाईचे ‘ए२’ दूध तुमच्यासाठी नक्कीच एक उत्तम आणि आरामदायी पर्याय ठरू शकतो. मात्र, हे दूध पिल्याने मुलांची बुद्धिमत्ता अफाट वाढेल किंवा हे साध्या दुधापेक्षा खूप जास्त पौष्टिक आहे, यांसारख्या अतिशयोक्तीपूर्ण जाहिरातींना बळी पडू नका. सामान्य व्यक्ती आपल्या बजेटनुसार नियमित दूध देखील सुरक्षितपणे पिऊ शकते, कारण दोन्हीमधील मुख्य फरक केवळ पचनाचा आहे, पोषणाचा नाही.

प्रतीक्षा सुनील मोरे

लेखकाबद्दलप्रतीक्षा सुनील मोरे“लेखिकेची माहिती – प्रतीक्षा सुनील मोरे एक अनुभवी पत्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा तब्बल 8 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी एका वृत्त वाहिनीमधून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली जेथे एक पत्रकार म्हणून खऱ्या अर्थाने त्यांची जडणघडण झाली. प्रतीक्षा यांना लाइफस्टाईल विषयांमध्ये विशेष रस असून गेल्या 3 वर्षांपासून त्या या विभागासाठी काम करत आहेत.

लाईफस्टाइल पत्रकारीतेचा गाढा अभ्यास आणि त्यातील कौशल्य यामुळे त्यांनी या विषयातील एक जाणकार पत्रकार म्हणून ओळख कमावली आहे. लाईफस्टाईल विभागातील नवनवीन गोष्टी आपल्या वाचकांना समजेल अशा सहज सोप्प्या भाषेत पोहोचवण्यात त्यांचा खरा हातखंडा आहे. प्रतीक्षा यांच्याकडे असलेली गहन रिसर्च करण्याची क्षमता आणि वाचकांच्या आवडीचे विषय निवडण्याचे ज्ञान यामुळे त्या सातत्याने वाचकांपर्यंत परिपूर्ण गोष्टी पोहोचवण्यात यशस्वी ठरतात.

कामाव्यतिरिक्त प्रतीक्षा यांना स्वत:साठी लिहिण्याची, प्रवास करण्याची आणि वाचनाची खूप आवड आहे. लिखाणाबद्दल त्यांना जी आसक्ती आहे त्यामुळेच त्यांच्या हातून असे प्रभावशाली लेख लिहिले जातात जे वाचकांचे लक्ष तर वेधून घेतातच पण त्यांना नवनवीन विषयांची गोडी देखील लावतात. प्रवासाची आवड असल्याने त्या नेहमीच बाहेरील जगातील विविध संस्कृती आणि लाईफस्टाईल अनुभवत असतात आणि त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या लिखाणात दिसून येते.”आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत