Geeta Kapur : गीता कपूरनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये साजिद खानसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – कोरिओग्राफर गीता कपूर कायम स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. गीता वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि मालमत्तेबद्दलच्या अफवांमुळे चर्चेत असते. काही वृत्तांनुसार, तिच्याकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता, अनेक बंगले आणि गाड्या होत्या. चित्रपट निर्माता साजिद खानसोबत तिच्या रिलेशनशिपच्या चर्चाही झाल्या. आता, गीता कपूरनं यावर मौन सोडलं आहे.
साजिदसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन
सिद्धार्थ कन्ननने मुलाखतीदरम्यान गीता कपूरला विचारलं की, साजिद खाननं तिला कधी लग्नाची मागणी घातली होती का? त्यावर गीतानं नकार दिला. गीता म्हणाली की, ती खूप लहान असताना तिनं ‘हे बेबी’ या चित्रपटात साजिद खानसोबत काम केलं होतं. साजिद अनेकदा आईस्क्रीम खायला घेऊन जायचा, पण याचा अर्थ असा नाही की त्यांचं रिलेशनशिप होतं. Trupti Akkalwar : ‘कुणालाही पैसे काढायला द्यायचे नाहीत’, सिद्धूचा बँकेत फोन अन् बदललं अभिनेत्याच्या पत्नीचं आयुष्य; म्हणाली, ‘मी डिस्टर्ब झाले’ कोट्यवधी रुपयांची संपत्ती आणि आलिशान गाड्या व पाच-सहा बंगले असल्याच्या वृत्तांवर गीता कपूरनं संतापही व्यक्त केला. तिनं सांगितलं की, सोशल मीडियावर तिच्याबद्दल अनेक खोट्या आणि बनावट कथा पसरवल्या जातात. लोक असं भासवतात की, तिच्याकडे अमाप पैसा आहे, पण वास्तव त्यापेक्षा खूप वेगळं आहे. आपल्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलताना गीता म्हणाली की, ती आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करते. त्यामुळे आयुष्य जगण्यासाठी तिच्याकडे पुरेसा पैसा आहे. तिनं केवळ गरजेपुरतेच पैसे साठवले आहेत, अमाप संपत्ती जमा केलेली नाही. कोणताही अतिरिक्त पैसा नाही. तो लपवण्याची तिला कोणतीही गरज वाटत नाही. Pravin Tarde : ‘माझी हिंदुत्ववादी विचारसरणी आणि शाहरुख खानचे आभार याचा संबंधच नाहीये’, ट्रोलर्सना प्रवीण तरडेंचं सडेतोड उत्तर गीता म्हणाली, ‘साजिदची बहीण, फराह खानने तिला सावध केलं होतं. तिचा भाऊ थोडा खोडकर आहे, त्यामुळे जर त्यानं फ्लर्ट केलं, तर ते फार गांभीर्याने घेऊ नकोस. मात्र, साजिदने तिला कधीही लग्नाची मागणी घातली नाही.’
माझ्या नवऱ्याची बायकोतील अभिजीतच्या भूमिकेमुळे टोमणे, Sukhada Khandkekar ने उलगडले धमाल किस्से
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा