Dnyanada Ramtirthkar : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम ज्ञानदा रामतीर्थकरला पहिल्याच मालिकेच्यावेळी अचानक रिप्लेस करण्यात आलेलं. त्याबद्दल अभिनेत्रीनं एका मुलाखतीमध्ये सांगितलंय.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – इंडस्ट्रीमध्ये कलाकारांना काम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. काही वेळेस प्रोजेक्ट मधून अचानक काढून टाकण्यात येतं. याबद्दल अनेकदा कलाकार भाष्यही करतात. मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरच्या बाबतीतही असाच प्रकार घडला होता. त्याबद्दल तिनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
इंडस्ट्रीतील अनुभवांबद्दल बोलताना ज्ञानदा म्हणाली की, ‘मला वेगवेगळे अनुभव आले आहेत. माझी सुरुवातच अशी झाली आहे की, मी आयुष्यात पहिल्यांदाच ऑडिशन दिली होती. ती माझ्या पहिल्या मालिकेसाठी होती आणि त्यांनी माझी निवडसुद्धा केली. आमचा करारसुद्धा झाला. शूटिंग सुरू होणार होतं, त्यामुळे मी माझं सामान वगैरे सगळं पॅक करत होते. तेव्हा मी २० वर्षांची होते. ती माझ्या आयुष्यातली पहिलीच ऑडिशन होती. त्यामुळे, पहिलीच ऑडिशन दिली आणि त्यातही माझी निवड झाली याचा आनंदच वेगळा होता. आनंदही होत होता आणि कुठेतरी ते पचतसुद्धा नव्हतं.’ Farah Khan Ali : बॉबी देओलच्या प्रेमात होती ज्वेलरी डिझायनर, म्हणाली, ‘आम्ही एकमेकांचा हात धरायचो, पत्रं लिहायचो’
मालिकेतून रिप्लेस करण्यात आलं
ज्ञानदा पुढे म्हणाली की, ‘आदल्या दिवशी कळलं की, मला शूटिंगला नाही जायचं तर मला मुंबईला जायचंय; कारण पुन्हा सगळ्यांची ऑडिशन होणार आहे. तेव्हा मालिकेतील सगळ्या कलाकारांना रिप्लेस करण्यात आलं. तेव्हा मला असे प्रश्न पडले की मीच का? मला मालिकेतून रिप्लेस करण्यात का आलं? माझ्यामध्ये काही कमतरता आहे का? मी त्या पात्रासाठी योग्य नव्हते का?, मी चांगली दिसत नाही का? वगैरे. पण त्यावेळी मालिकेतील कलाकार आणि इतर लोकांमुळे इतर चार ऑडिशन्ससाठी प्रयत्न करता आले.’
माझ्या नवऱ्याची बायकोतील अभिजीतच्या भूमिकेमुळे टोमणे, Sukhada Khandkekar ने उलगडले धमाल किस्से
‘तेव्हा पहिल्याच मालिकेच्यावेळी आपल्याबरोबर असं का झालं, याचा खूप त्रास झाला आणि वाईट वाटलं. पण तिथूनच मला दुसऱ्या ऑडिशनबद्दल कळलं. ती ऑडिशन मी दिली आणि त्यानंतर मला माझी पहिली मालिका मिळाली.’ असं ज्ञानदानं ‘बी द लाईट’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं. Pravin Tarde : ‘माझी हिंदुत्ववादी विचारसरणी आणि शाहरुख खानचे आभार याचा संबंधच नाहीये’, ट्रोलर्सना प्रवीण तरडेंचं सडेतोड उत्तर दरम्यान, ज्ञानदाच्या कामाबद्दल सांगायचं तर तिला ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेमुळे ओळख मिळाली. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेमध्ये काव्याची भूमिका साकारत आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा