Shakuntala Nare Cheated : रात्रीस खेळ चाले या मालिकेत माई म्हणून दिसलेल्या अभिनेत्री शकुंतला नरे यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेला एक किस्सा सांगितला. त्यात त्यांची फसवणूक झाली होती.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
काही मालिका या कितीही जुन्या झाल्या किंवा त्यांना संपून बरेच वर्ष उलटली तरीही त्यातील पात्र प्रेक्षकांच्या मनात अगदी घट्ट घर करून बसलेले असतात. असेच एक पात्र होते ते म्हणजे माई. झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेत माईंची भूमिका अभिनेत्री शकुंतला नरे यांनी साकारली होती. त्या या पात्रामध्ये इतक्या मुरलेल्या की खऱ्या आयुष्यात सुद्धा प्रेक्षक त्यांना माई म्हणूनच ओळखू लागले. या मालिकेचे तीन सीजन आले त्यांना संपून आता बराच कालावधी ही लोटला पण तरीही प्रेक्षकांच्या मनातील माई ही अजूनही चिरतरुण आहे. Celina Jaitly : लग्नाच्या वाढदिवसाची भेट म्हणून घटस्फोटाची नोटीस, मुलांना भेटायचंय तर दुकानात सफाईकामगाराची नोकरी कर! अभिनेत्रीसमोर नवऱ्याची विचित्र अट अभिनेत्री शकुंतला नरे यांनी यापूर्वीही चिक्कार काम केले आहे. रंगभूमी हा त्यांचा जवळचा विषय. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत सुद्धा त्यांनी स्क्रीन शेअर केली होती. इंडस्ट्रीमध्ये काम करताना बरेचदा कलाकारांना फसवणुकीचे अनुभव येतात. अभिनेत्री शकुंतला नरे यांना पण तब्बल 23 लाख रुपयांना फसवले गेले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी हा किस्सा शेअर केला. त्या म्हणाल्या की माझा वन रूम किचन या नाटकासाठी पहिला पगार हा प्रयोगाला दीडशे रुपये होता. ते सुद्धा कमी करायला त्या नाटकाचे लोक चार वेळा माझ्या घरी आले होते. त्यावेळी मी बँकेत आहे काम करत होते. इथल्या दीडशे रुपयांपेक्षा मला तिकडे बरे पैसे मिळत होते पण तरीही मी नवखी असल्यामुळे काहीही म्हणाले नाही. त्यावेळी निर्माते अगदी प्रामाणिकपणे जेवढं ठरलं आहे तेवढं मानधन द्यायचे.
Sunita Ahuja : सूप आहे की गोमूत्र! लॉकअप 2 मध्ये खाण्यापिण्याचे हाल होत असल्याने संतापली सुनीता आहुजा, आली गोविंदाची आठवण माझ्या करिअरमध्ये मला पैसे बुडवणारे प्रोड्यूसर भेटले नाही. आयुष्यात बरेचदा पैसे बुडवणारे लोक भेटतात. माझेही 23 लाख बुडवले आहेत. याच इंडस्ट्री मधला एक माणूस आहे. मी त्याचं नाव घेणार नाही पण तो एक चांगला नेपथ्यकार आहे. त्याला मी काम दिलं होतं. पैसे परत मागण्यासाठी मी बरेचदा त्याच्याशी बोलणी केली पण त्यांनी नाही दिले . त्यामुळे तेवीस लाखाला सध्या मी तोट्यामध्ये आहे. त्या माणसावर विश्वास ठेवून मी दुसऱ्याला काम देण्यापेक्षा त्यालाच काम देऊ असं म्हणून ती जबाबदारी त्याच्यावर सोपवली होती. मी माझ्या घराचं काम त्याला दिलं होतं. मी जर तेच घेऊन बसले तर माझं घर पूर्ण झालं नसतं.
परमेश्वर एक मार्ग बंद झाला की दुसरा उघडा करून देतो. स्वामी आणि मारुतीरायावर माझी प्रचंड श्रद्धा आहे. माझ्या कठीण प्रसंगाला हे दोघेही माझ्यासाठी धावून आले आहे. मला त्यांचा खूप अनुभव आला आहे. त्यामुळे आपण श्रद्धा ठेवायची ते बरोबर काळजी करणारे आहेत. एकाने आपले नुकसान केले तरीही दुसरी कडून कुठेतरी ते पैसे भरून निघणार आहे. ज्याने मला तेवीस लाखांना फसवलं तो एक इंडस्ट्री मधल मोठं नाव आहे. पण जर मी कोर्ट कचेऱ्या करत बसले तर माझे आणखी एक 23 लाख रुपये जातील त्यापेक्षा मी अजून दुसऱ्या मार्गाने चांगले कमवीन. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत शकुंतला नरे यांनी हा किस्सा सांगितला होता.
लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.… आणखी वाचा