Headlines

Garuda Ram in Marathi Movie: साऊथ इंडस्ट्रीतल्या खतरनाक अभिनेत्याची मराठी सिनेमात एन्ट्री, सुपरस्टार यशसोबत खास कनेक्शन; ‘देवघर ऑन रेंट’मध्ये दिसली झलक


‘केजीएफ’ चित्रपटातील दमदार खलनायकाच्या भूमिकेमुळे देशभरात लोकप्रिय ठरलेला अभिनेता गरुडा राम आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. दिग्दर्शक स्वरूप सावंत यांच्या आगामी ‘ देवघर ऑन रेंट ‘ या चित्रपटात गरुडा राम महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून, त्यांच्या या एंट्रीमुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे.

मराठी चित्रपटांचा वाढता विस्तार आणि विविध भाषांतील कलाकारांचं वाढतं सहकार्य याचं हे आणखी एक उदाहरण मानलं जात आहे. या चित्रपटात गरुडा रामसोबत दक्षिणेकडील लोकप्रिय अभिनेता श्रवण राघवेंद्रही दिसणार आहे. विशेष म्हणजे, आध्यात्मिक आशय असलेल्या या कथेला दमदार अॅक्शनची जोड देण्यात आली असून, ‘पुष्पा’ फेम अॅक्शन मास्टर कार्तिक डंगरी यानं अॅक्शन दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.

Maharashtra TimesTejaswini Pandit On Jyoti Chandekar : आमचे आई बाबा दोघेही गेले, आता मला ‘अचानक’ या शब्दाचीच भीती वाटतेय! ज्योती चांदेकर यांच्या आठवणीत तेजस्विनी पंडित भावुक
गरुडा राम म्हणाला, ‘मराठी चित्रपटसृष्टीबद्दल मला नेहमीच विशेष आदर वाटत आला आहे. इथल्या कथा, भावना आणि अभिनयाचा दर्जा समृद्ध आहे. ‘देवघर ऑन रेंट’ची कथा ऐकल्यानंतर मला ती आवडली. माझी भूमिका केवळ अॅक्शनपुरती मर्यादित नसून तिच्यात अनेक भावनिक आणि नाट्यमय पैलू आहेत. मराठी कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत काम करण्याचा अनुभव अतिशय समृद्ध करणारा ठरला. प्रेक्षकांनी मला आजवर विविध भाषांतील चित्रपटांत स्वीकारलं आहे. आता मराठी प्रेक्षकही माझ्या या नव्या भूमिकेला तितक्याच प्रेमानं प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा आहे’.

Maharashtra TimesTwinkle Khanna On Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंमुळे वाढलं ट्विंकल खन्नाचं काम, आता घरीच बनवावं लागतंय पनीर, आईसोबतच्या मजेशीर भांडणाचा किस्सा शेअर
चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संजय नवगिरे यांनी लिहिले असून, स्वरूप सावंत यांनी दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात निखिल चव्हाण, अंकित मोहन, भाऊ कदम, शशांक शेंडे, अश्विनी चवरे, वैभव चव्हाण आणि गौतमी पाटील यांच्याही महत्त्वापूर्ण भूमिका आहेत. आध्यात्म, नाट्य आणि अॅक्शन यांची सांगड घालणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव ठरणार असल्याचं कलाकार सांगतात. निर्माते सचिन रोडे पाटील आणि पूनम चौधरी पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

गरुडा राम

केव्हा प्रदर्शित होणार सिनेमा?

हा चित्रपट २५ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

कोण आहे अभिनेता गरुडा राम?

‘केजीएफ: चॅप्टर १’ या ब्लॉकबस्टर चित्रपटामध्ये आपल्या क्रूर आणि जबरदस्त अभिनयानं प्रेक्षकांवर छाप पाडणारा अभिनेता रामचंद्र राजू उर्फ ‘गरुडा राम’ (आज दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि मागणी असलेला व्हिलन बनला आहे.

सुपरस्टार यशचा बॉडीगार्ड ते मुख्य खलनायक

गरुडा रामचा अभिनय क्षेत्रातील प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी तो कन्नड सुपरस्टार यशचा मुख्य बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. ‘केजीएफ’ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी जेव्हा यशसोबतच्या संवादादरम्यान गरुडा रामची शरीरयष्टी आणि त्याचे व्यक्तिमत्त्व पाहिलं, तेव्हा त्यांनी लगेचच त्याला ‘गरुडा’ या मुख्य खलनायकाच्या भूमिकेसाठी निवडलं. या भूमिकेसाठी गरुडा रामनं तब्बल वर्षभर कठोर मेहनत घेऊन आपली शरीरयष्टी आणि अभिनय उंचावला.

या एकाच भूमिकेनं त्याचं आयुष्य रातोरात बदलले. त्याच्या दमदार आणि क्रूर लूकमुळं त्याला सर्वभाषिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. तमिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतही दबदबा’केजीएफ’च्या प्रचंड यशानंतर गरुडा रामला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून ऑफर्सचा पाऊस पडू लागला.

कार्तीसोबत ‘सुल्तान’, तसंच ‘कोडीयिल ओरुवन’ आणि ‘यानई’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांत मुख्य व्हिलन त्यानं काम केलंय.

‘महासमुद्रम’, पवन कल्याणचा ‘भीमला नायक’ आणि प्रभासचा ब्लॉकबस्टर ‘सालार’ मधील महत्त्वपूर्ण भूमिकाही त्याच्या गाजल्या. सुपरस्टार मोहनलाल यांच्या ‘आराट्टू’ चित्रपटातून त्यानं मल्याळममध्ये पदार्पण केलंय.

त्यामुळे आता त्याला मराठी सिनेमात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत