Tejaswini Pandit Post On Mother Jyoti Chandekar Birth Anniversary ; आमचे आई बाबा दोघेही गेले, आता मला ‘अचानक’ या शब्दाचीच भीती वाटतेय! ज्योती चांदेकर यांच्या आठवणीत तेजस्विनी पंडित भावुक
Tejaswini Pandit Post On Mother Jyoti Chandekar Birth Anniversary ; आमचे आई बाबा दोघेही गेले, आता मला ‘अचानक’ या शब्दाचीच भीती वाटतेय! ज्योती चांदेकर यांच्या आठवणीत तेजस्विनी पंडित भावुक
मुलांच्या डोक्यावरून आई वडिलांचे छत्र हरवले की ती पार पोरकी होऊन जातात. मग ती मुलं कोणी प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलं तरीही आई-वडिलांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही. मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये तेजस्विनी पंडित हे खूप मोठं नाव आहे. मात्र आई-वडिलांच्या निधनामुळे ती सध्या खूप एकटी पडलीये. तेजस्विनी पंडित ही दिग्गज अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची लेक. साधारण 11 वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर ज्योती चांदेकरयांनीच त्यांच्या दोन्ही मुलींना आई आणि वडिलांचे प्रेम दिले. पण गेल्यावर्षी 16 ऑगस्ट रोजी ज्योती चांदेकर यांच्यावर काळा निघाला घातला आणि त्या हे जग सोडून अचानक निघून गेल्या. आज ज्योती चांदेकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तेजस्विनी पंडित ने तिच्या आयुष्यात आलेला एकाकीपण व्यक्त केलं आहे आणि आईच्या आठवणींना उजाळा दिलाय.
तेजस्विनी instagram वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, रँडम पोस्ट नाहीये. आई गेल्या पासून सोशल मीडिया वर मोजकच व्यक्त होता आलं. किंबहुना, नाहीच व्यक्त होता आलं.कदाचित या प्लॅटफॉर्मवर माझ्या आईवडिलांबद्दल स्पष्टपणे मत व्यक्त करण्याची ही शेवटची वेळ असेल…
आज आई चा ७०वा वाढदिवस असता. जोरात celebrate करायचा प्लॅन होता…..असो. आई बाबा नेहमी म्हणायचे शिकत राहिलं पाहिजे. शेवटच्या श्वासापर्यंत शिकण्याची वृत्ती पाहिजे.
पण काय कमाल आहे ना ! आई-वडील बनल्यावर मूल वाढवायला कुणी शिकवत नाही, ते अपसूक येतं. दुर्दैवाने, आई-वडील गेल्यावर मुलांना एकट्याने मोठं व्हायला अपसूक येत नाही, ते शिकावं लागतं. इतरांसाठी कदाचित “हां एवढ काय! आता झालं की वर्ष ” असंही वाटण्याची शक्यता आहे… पण खरंच आई वडील गेल्यावर आपल्या मनाच्या कुठल्यातरी भागात एक कायमची पोकळी निर्माण होते जी कधीच कुणी भरून काढू शकत नाही आणि हे कुणीच नाकारू शकत नाही.
पुढच्या फोटो स्टोरी मध्ये तिने लिहिले, एक एक पाऊल पुढे टाकावच लागतं . अनेक गोष्टी स्वीकाराव्या लागतात… चार खोल्यांच्या घरात एकट्याने परतावं लागतं, झोप येत नसेल, थकवा आला असेल तर डोक्यावरून हात फिरवायला कुणी येणार नाही हे गृहीत धरावं लागतं… दाराकडे डोळे लावून वाट बघणारं कुणी नाही आणि वाट बघायला लावणारही कुणी नाही हे ही समजून घ्यावं लागतं… आमचे आई बाबा दोघेही “अचानक ” गेले. अचानक ह्या शब्दाचीच भीती वाटेल इतके अचानक.
तेजस्विनीने पुढे लिहिले की, कदाचित दुःख कालांतराने ओसरेल, पण अशा प्रकारची हानी कधीच पुसली जात नाही. आणि ना तुम्ही आत्तापर्यंत असता त्याच्यापेक्षा खुप बदलून जाता. तुमच्या आत काहीतरी बदलेलं असतं. तुम्ही असं ओझं वाहत असता जे बहुतेक लोकांना समजत नाही. खऱ्या अर्थाने तुम्हाला ‘मोठं व्हावं लागतं’ कारण आता आयुष्य आणि त्यातले अनुभवच तुमचे पालक होतात. शिकवतात. चांगलं-वाईट, सगळंच!
तुमचे संस्कारच आमची सगळ्यात मोठी कमाई आहे. तुम्ही शाररिक दूर गेले असाल आमच्यापासून पण तुमच्या विचारांचा वारसा इथेच आहे. आमच्यासोबत. आता तुम्ही एकमेकांची काळजी घ्या. आम्ही आमची घेतो. खुप प्रेम, आई बाबा ……..अमर रहा…
वाढदिवसाच्या शुभेच्छा ज्योती
अभिनेत्री ज्योती चांदेकर या अगदी आयुष्याच्या अखेरपर्यंत काम करत राहिल्या. ठरलं तर मग या मालिकेमध्ये त्यांनी पूर्णा आजी ही भूमिका साकारली होती. अगदी तीन दिवसाच्या सुट्टीवर त्या गेल्या होत्या पण परतल्या नाहीत. त्यांना अचानक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं गेलं आहे त्यानंतर त्यांचे निधन झाले.
लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.… आणखी वाचा