Ganpati ST Bus Group Booking: समूह आरक्षणासाठी अतिरिक्त शुल्क लावण्यामुळे गणेशभक्तांचा प्रवास महागल्याचा मुद्दा सर्वप्रथम ‘महाराष्ट्र टाइम्स’ने बातमीच्या माध्यमातून मांडला होता.

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली. ‘गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी सुमारे पाच हजार एसटी बसगाड्या आरक्षित केल्या जातात. प्रवाशांना गावी सोडल्यानंतर या बसगाड्या रिकाम्या परत आणाव्या लागतात. त्यामुळे महामंडळाला इंधन तसेच चालक आणि वाहकांच्या अतिरिक्त कामाचा खर्च सहन करावा लागतो. डिझेलच्या वाढलेल्या किमती आणि कर्मचाऱ्यांच्या अतिकालीन भत्त्यात झालेली वाढ यामुळे एसटीचा खर्च वाढला आहे.
Vishakha Raut : महापौर आणि आमदार राहिलेल्या विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द, मुंबईत ठाकरेंना मोठा धक्काया पार्श्वभूमीवर ३० टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र कोकणवासी आणि गणेशोत्सव मंडळांकडून अतिरिक्त शुल्क रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीचा विचार करून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अतिरिक्त शुल्क रद्द करण्याची सूचना केली. त्यानुसार यंदा एकेरी गट आरक्षणावर (ग्रुप बुकिंगवर) ३० टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही,’ असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. एसटी महामंडळाला होणारा संभाव्य आर्थिक तोटा अन्य मार्गांवरील प्रवासी वाहतूक वाढवून भरून काढावा, अशा सूचना ही मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला केल्या आहेत.
मुंबईतील कोकणवासींची स्वस्त प्रवासासाठी भिस्त असलेल्या एसटीच्या भाडेवाढीविरोधात ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सर्वप्रथम ‘समूह आरक्षणास मोजा अधिक पैसे’ या मथळ्याखाली ११ ऑगस्टला बातमी प्रसिद्ध केली होती. ही कोकणवासी प्रवासी संघटनांमध्ये चर्चेची बातमी ठरली. ‘मटा’ने याचा सातत्याने पाठपुरावा केला. या मुद्द्यावरून कोकणवासी प्रवासी संघाने आंदोलनाचा निर्णय घेतला होता.
Ashish Shelar | ठाकरेंनी डिवचलं, आशिष शेलारांचा पलटवार, ठाकरे बाप-लेकावर तुटून पडले
खासगी वाहतूकदारांवर निर्बंध आवश्यक
‘गणेशोत्सवाआधीच बाप्पा पावल्याने ३० टक्के भाडेवाढीचे संकट दूर झाले. आता समूह आरक्षणासाठी कोकणवासींमध्ये उत्साह आहे. जुलैमध्ये लागू केलेल्या १३.५ टक्के भाडेवाढीबाबतही विचार व्हायला पाहिजे. भाडेवाढ करून प्रवासी दुरावतो. सेवेत सुधारणा आवश्यक आहे. खासगी वाहतूकदारांवरील निर्बंधाचे काटेकोर पालन आवश्यक आहे,’ असे गणेशभक्त कोकणवासी प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी सांगितले. मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल त्यांनी आभार मानले.

