Headlines

Gadchiroli Flood: गडचिरोलीत मुसळधार पाऊस; पर्लकोटा नदीला पूर, भामरागड आलापल्ली मार्ग बंद, जनजीवन विस्कळीत – heavy rainfall in gadchiroli parlakota river flooded bhamragad-alapalli road closed normal life disrupted


Gadchiroli Flood: पर्लकोटा नदीवरील जुन्या पुलावरून पाणी वाहत असल्याने भागरागड आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद आहे.

Anderson Phillip Catch - 2026-08-25T065336
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, गडचिरोली : दक्षिण गडचिरोलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, पर्लकोटा नदीच्या रौद्ररूपामुळे भामरागड तालुक्याचा बाह्य जगाशी संपर्क तुटला आहे. नदीच्या पुराचे पाणी जुन्या पुलावरून वाहू लागल्याने भामरागड-आलापल्ली या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. परिणामी, तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भामरागड परिसरात रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यानंतर पर्लकोटा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. नदीवरील नवीन पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने सध्या जुन्या पुलावरूनच वाहतूक सुरू होती. मात्र, पुराचे पाणी पुलावर आल्याने प्रशासनाला हा मार्ग बंद करावा लागला. त्यामुळे भामरागडमार्गे होणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

Maharashtra TimesManoj Jarange Patil : मराठ्यांनो घराबाहेर पडा, हे शेवटचं आंदोलन, सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर जरांगे यांचं आवाहनदरम्यान, जिल्ह्यात इतरत्रही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मागील २४ तासांत कुरखेडा तालुक्यातील कढोली मंडळात ११२.४ मिमी पावसाची नोंद झाली. सिरोंचा तालुक्यातील असरअली मंडळात ८८.६ मिमी, तर अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा मंडळात ७५.४ मिमी पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे अनेक लहान-मोठे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, ग्रामीण भागातील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

दक्षिण गडचिरोलीतील पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Maharashtra TimesPune Politics: भाजप-राष्ट्रवादीमध्ये आता ‘लेटरवॉर’; बीडकरांच्या पत्रावर सुनील टिंगरेंचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्रपुरामुळे मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका अडकली

पूरस्थितीची गंभीरता आलापल्ली-सिरोंचा मार्गावरही दिसून आली. नंदीगाव येथील नाल्याला अचानक पूर आल्याने मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका तसेच अन्य वाहने काही काळ अडकून पडली. जिमलगट्टा येथील मलय्या पंटीवार यांचा हेडरी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून जिमलगट्टा येथे आणला जात असताना नंदीगावच्या नाल्यावरील पुरामुळे रुग्णवाहिकेचा प्रवास थांबला. त्यामुळे दुःखात असलेल्या कुटुंबीयांना मृतदेहासह मार्गातच थांबावे लागले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा