Gadchiroli Accident: मनाला चटका लावणारी बातमी… जावयाच्या अंत्यविधीवरुन घरी परतताना दोन चुलत सासऱ्यांवर काळाचा घाला. दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या अपघातात ३ गंभीर जखमी आहेत.

यादव विठ्ठलराव कोलपाकवार (७३) रा. आष्टी व त्यांचे चुलत बंधू सुनील मुरलीधर कोलपाकवार (५५) रा.बोरी (अहेरी) अशी मृतांची नावे आहेत.
नेमकं काय घडलं?
अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील रवींद्र तंगडपल्लीवार हे १८ जानेवारी रोजी दुपारपासून बेपत्ता झाले होते. १९ जानेवारीला सकाळी सिरोंचा मार्गावर कालिमाता मंदिराजवळ त्यांचा मृतदेह आढळला होता. आरोपीने त्यांची धारदार शस्त्राने हत्या केली होती. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यादव हे आपल्या चुलत जावयाच्या अंत्यविधीसाठी आले होते. त्यांच्यासोबत पोस्टमास्तर असलेले त्यांचे चुलत बंधू सुनील हेदेखील होते. अंत्यसंस्कार आटोपून सर्व जण कारने परतत होते. दुपारी दीड वाजताच्या सुमारास दिना नदीच्या पुलावरून कार नदीत कोसळली.
Crime News : लग्न जमलं, दोघांचं भेटणं सुरु, तरुणीला केळवणला मुंबईला बोलावून शारीरिक संबंध; ऐनवेळी मुलाचे आई-वडील म्हणाले…
दीना नदीचा हा पूल सध्या वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. पुलाला संरक्षक कठडे नसल्याने चालकाला अंदाज आला नाही. परिणामी, कार अनियंत्रित होऊन थेट खोल नदीत कोसळली.
Beed Crime: खळबळजनक! बीडच्या जंगलात ‘महादेव ॲप’चा आंतरराष्ट्रीय अड्डा! मध्यरात्री पोलिसांचा छापा; कोट्यवधींची उलाढाल उघड
तर एका दुसऱ्या घटनेत, समृद्धी महामार्गावर भरधाव आयशर समोरील वाहनाला धडकून चालक ठार झाला. मेहकर तालुक्यातील शहापूरजवळ चॅनेल क्रमांक २७४ वर १७ जानेवारीला पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला. अजय सुभाष शर्मा, असे मृत चालकाचे नाव असून तो नाशिकच्या सिडकोमधील विजयनगर बसस्थानकाजवळ राहत होता. समृद्धी महामार्गाने एमएच-२५-जेडब्ल्यू-६८७८ क्रमांकाच्या वाहनाने निघाला होता.

