Headlines

G7 summit Modi Trump Press Conference : पीएम मोदी, ट्रम्प यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत नक्की काय घडलं? अमेरिकेची टिप्पणी, त्यावर भारताची प्रतिक्रिया सर्व समजून घ्या


फ्रांसमध्ये G7 Summit झाली. त्यावेळी द्विपक्षीय भेटीदरम्यान भारताने स्पष्ट केलं होतं की पत्रकार परिषदेत कोणताही प्रश्न विचारण्यात येणार नाही. मात्र असे न होता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे बोलणं संपल्यानंतर पत्रकारांना काही प्रश्न आहेत का असे म्हटले असा दावा भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी केला. यावर भारत सरकारने देखील स्पष्टीकरण दिले आहेत.

Narendra Modi and Donald Trump
Explained : पीएम मोदी, ट्रम्प यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत नक्की काय घडलं? अमेरिकेची टिप्पणी, त्यावर भारताची प्रतिक्रिया सर्व समजून घ्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची G7 Summit मध्ये भेट झाली. फ्रांसमध्ये झालेल्या या भेटीदरम्यान मीडिया प्रश्न विचारणार की नाही यावरून वाद झाला होता. त्यावर भारत सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. सोमवारी सरकारने स्पष्टीकरण देत असे म्हटले की व्हीव्हीआयपी नेत्याच्या सार्वजनिक उपस्थितीच्या नियोजनाबाबत चर्चा करणे म्हणजे व्हीव्हीआयपी नेत्याच्या भेटीपूर्वी पत्रकार परिषद घेणे किंवा कार्यक्रम कसा होईल यावर चर्चा करणे हे सामान्य आहे.

भारतातील अमिरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी आरोप केले आहेत की भारताने विशेष विनंती करत म्हटलं होतं की कोणताही प्रश्न मीडिया विचारणार नाही. ही विशेष विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची द्विपक्षीय भेटीदरम्यान भारताने केली होती. या आरोपानंतर परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे.

नेमके काय आरोप सर्जिओ गोर यांनी केले आहेत?

G7 Summit दरम्यान पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची द्विपक्षीय भेट झाली. तेव्हा दोन्ही बाजूने पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यापूर्वी पत्रकार परिषदेत कोणतेही प्रश्न प्रसारमाध्यमे विचारणार नाही असे भारत सरकारने स्पष्ट केले होते, असे सर्जिओ गोर यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले की “मी पंतप्रधान यांना सांगितले की भारतीयांची अशी इच्छा आहे की कोणतेच प्रश्न विचारले जाऊ नयेत. त्यांनी नक्कीच असेच होणार असे म्हटले.

पत्रकार बैठकीसाठी सभागृहात दाखल झाले. जवळपास ५० कॅमेरा तिथे लावण्यात आले. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी तर दुसऱ्या बाजूला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बसलेले होते. दोघांनीही पत्रकारांशी बोलायला सुरुवात केली. त्यांचे बोलणे संपले तेव्हा राष्ट्राध्यक्षांनी सर्वात पहिली गोष्ट केली ती म्हणजे कॅमेऱ्याकडे पाहिलं आणि म्हंटल ‘काही प्रश्न आहेत का?’ असा दावा सर्जिओ गोर यांनी केला. त्यांनी सांगितले या एका व्याख्यामुळे पत्रकारांना प्रश्न विचारायला वाव मिळाला. त्यानंतर पत्रकार परिषद ४५ मिनिटे झाली. त्यात सगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

G7 summit मध्ये नेमकी काय चर्चा झाली?

द्विपक्षीय भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी Strait of Hormuz मध्ये जहाजांवरील हल्ले वाढत असल्याने सागरी वाहतूक करणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. अमेरिका आणि इराण यांच्यात संघर्ष सुरु असल्याने Strait of Hormuz मध्ये तणाव वाढला आहे. लाखो भारतीय हे सागरी वाहतूक क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांची सुरक्षा महत्वाची आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना सांगितले.

ट्रम्प यांनी दिले उत्तर

मोदींनी केलेल्या वक्तव्यानंतर ट्रम्प यांनी यावर उत्तर दिले की, भारतीयांवर जर कोणी हल्ला केला तर अमेरिका त्यांच्या मदतीसाठी सज्ज असेल आणि भारतीयांच्या बाजूने असेल. त्यादरम्यान त्यांनी ‘नवा नेता आला तर काय सांगता येत नाही’ असे म्हटले. एव्हढेच नाही तर ट्रम्प यांनी भविष्यात भारताला भेट देणार असल्याचे देखील संकेत दिले आहेत.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा