Viral Instagram Video: कॅनडामध्ये घरातील वापरात नसलेल्या, पण चांगल्या स्थितीतील वस्तू घराबाहेर ठेवून त्या गरजू लोकांना मोफत देण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. भारतीय महिलेनं शेअर केलेला हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

फुकटात मिळाला सोफा आणि टीव्ही
हा व्हिडीओ ruman_tarun या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ७४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कॅनडामध्ये एक नवा ट्रेंड सुरू झाला आहे. या ट्रेंडनुसार लोक घरातील वापरात नसलेल्या, पण चांगल्या स्थितीतील वस्तू घराबाहेर ठेवतात. गरजू लोक त्या वस्तू कोणालाही न विचारता मोफत घरी घेऊन जाऊ शकतात.
एका भारतीय जोडप्याने या वस्तू आपल्या व्हिडीओमध्ये दाखवल्या आहेत. त्यांना टीव्ही, सोफा, डिशवॉशर आणि बार्बेक्यू मशीन अगदी मोफत मिळाली. लक्षवेधी बाब म्हणजे या वस्तू अगदी नव्यासारख्या आणि सुस्थितीत आहेत. भारतात अशा वस्तू घराबाहेर एक रात्र ठेवल्या, तर त्या चोरीला जाण्याची शक्यता जास्त असते.
भारतामध्ये असा ट्रेंड कसा येणार?
हा व्हिडीओ पाहून बहुतांश नेटकरी अवाक् झाले आहेत. कारण भारतात अशा प्रकारचा ट्रेंड क्वचितच पाहायला मिळतो. मात्र, कॅनडा हा आर्थिकदृष्ट्या समृद्ध देश मानला जातो. तिथे लोकसंख्या तुलनेने कमी असून अनेक नागरिकांची आर्थिक परिस्थितीही चांगली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे ट्रेंड तिथे सहज शक्य होतात. असो, या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

