पालेभाज्यांचे दर सरासरी ५ टक्क्यांनी कमी
तोतापुरी कैरीच्या दरात वाढ झाली, तर इतर बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून पालेभाज्यांची आवक कमी होत असल्याने कोथिंबीर, मेथी, शेपूसह बहुतांश पालेभाज्याचे दर वाढले होते. मात्र, आता आवक वाढल्याने पालेभाज्यांचे दर सरासरी ५ टक्क्यांनी कमी झाले आहेत.
परराज्यांतून,स्थानिक भागातून आवक
पुणे बाजारात समितीच्या गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी राज्यातील विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून हिरवी मिरची, कोबी, घेवडा, गाजर, लसूण, मटार, शेवगा आणि बटाट्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. स्थानिक भागातून टोमॅटो, फ्लॉवर, ढोबळी मिरची, काकडी, भेंडी, गवार, कोबी, तांबडा भोपळा आणि कांद्याची आवक झाली.
किरकोळ बाजारीतल दर
कोथिंबिरीच्या सुमारे अडीच लाख आणि मेथीच्या सव्वा लाख जुड्याची आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. किरकोळ बाजारीतल दर (प्रतिकोलो) बटाटा ३० – ४०, कांदा ३५ – ४५, लसूण २००-२५०, आले १६०-२००, टोमॅटो ३०-४०, वांगी ८०-१००, कोंबी ८०-१००, फ्लॉवर ८०-१००, हिरवी मिरची १२०-१४०.
मोसंबी, पपई, चिकूचे दर वाढ
मार्केटयार्डातील फळबाजारात लिंबू, मोसंबी, पपई, चिकूच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली; तर कलिंगड , खरबूज, डाळिंबाच्या दरात घट झाली असून अन्य फळांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. रविवारी फळबाजारातलिंबाच्या ११०० ते १२०० गोणी, मोसंबी ४० ते ५०, संत्री दोन टन, डाळिंब ४० ते ४५ टन, पपई पाच ते सहा टेम्पो, कलिंगड आठ ते दहा टेम्पो, खरबूज एक ते दोन टेम्पो, चिक्कू १०० बॉक्स, पेरू ६०० ते ७०० क्रेट्स, अननस पाच ट्रक, सीताफळ दहा ते १२ टन इतकी आवक झाली.
मागणी कमी ,फुलांच्या दर १० ते २० टक्क्यांनी घटले
फुलबाजारात रविवारी सर्व प्रकारच्या फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली. मात्र, मागणी कमी असल्याने फुलांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी घट झाली. पावसामुळे ओल्या फुलांची आवक निम्म्यावर आल्याची माहिती अडतदार सागर भोसले यांनी दिली. बाजारात झेंडू, शेवंती, गुलाब, जर्बेरा, कार्नेशियन, लिलियम, ऑर्चिड, मोगरा, जुई आदी फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली.
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-४०, गुलछडी : १००-१५०, ॲस्टर : गड्डी १०-२०, सुट्टा : ५०-१००, शेवंती : ३०-७०, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : २०-३०, गुलछडी काडी : १०-२०, डच गुलाब (२० नग) : १००-१५०, जर्बेरा : ४०-५०, कार्नेशियन : १२०-१६०, शेवंती काडी २००-२५०, लिलियम (१० काड्या) ८००-१२०० ऑर्किड ४००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) : १००-१५०, जिप्सोफिला : २००-२५०, लिली बंडल : १०-१६, मोगरा : १५०-२००, जुई : २५०-३००, पर्पल : ४०-६०.

