Former Chimur MLA Avinash Warjurkar quits Congress Chandrapur to join BJP meets Devendra Fadnavis; माजी आमदाराचा काँग्रेसला रामराम, मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट, भाजपचा झेंडा हाती धरणार
Former Chimur MLA Avinash Warjurkar quits Congress Chandrapur to join BJP meets Devendra Fadnavis; माजी आमदाराचा काँग्रेसला रामराम, मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट, भाजपचा झेंडा हाती धरणार
Maharashtra Politics : काँग्रेस पक्षातील गटबाजीमुळेच आपला पराभव झाल्याचा आरोप करत चिमूरचे माजी आमदार डॉ. अविनाश वारजूरकर यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर : काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून चिमूरचे माजी आमदार डॉ. अविनाश वारजूरकर व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सतीश वारजूरकर हे आज, गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश घेणार आहेत. वारजूरकर बंधूच्या हा पक्षबदल काँग्रेससाठी चिमूरमध्ये मोठा धक्का मानला जात आहे.
कोण आहेत वारजूरकर बंधू?
काँग्रेसचे माजी आमदार डॉ. अविनाश वारजूरकर व त्यांचे बंधू डॉ. सतीश वारजूरकर मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होते. डॉ. सतीश वारजूरकर हे २०१९ व २०२४ अशा सलग दोन निवडणुकीत चिमूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार राहिले होते. पण, यात त्यांना पराभवाचे तोंड बघावे लागले होते.
काँग्रेसमधील अंतर्गट गटबाजीने त्रस्त
काँग्रेस पक्षातील गटबाजीमुळेच आपला पराभव झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत काँग्रेसचा पराभव झाला. त्यापाठोपाठ सत्तेच्या जवळ असताना काँग्रेसने केवळ गटबाजीमुळे महापालिकेतील सत्ता गमावली.
वारजूरकर बंधूंनी बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे आमदार बंटी भांगडिया उपस्थित होते. ते गुरुवारी भाजपच्या मुंबई कार्यालयात अधिकृत पक्ष प्रवेश घेणार असल्याची पुष्टी डॉ. सतीश वारजूरकर यांनी जोडली.
आसाम काँग्रेसला धक्का
चारच दिवसांपूर्वी, रविवारी आसाम काँग्रेसचे माजी प्रमुख भूपेनकुमार बोरा यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप सैकिया यांच्या उपस्थितीत सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर काही तासांतच भाजपने बोरा यांना राज्य कार्यकारिणीवर स्थान दिले. आसाम भाजपचे मुख्यालय असलेल्या ‘वाजपेयी भवन’ येथे झालेल्या कार्यक्रमात बोरा यांनी भाजप प्रवेश केला. त्यांच्यासोबत माजी काँग्रेस नेते संजू बोरा, राजेशकुमार जोशी, कंगन दास, गगनचंद्र बोरा आणि विरोधी पक्षातील डझनभराहून अधिक कार्यकर्तेही भाजपमध्ये सामील झाले.
Ritu Tawade | मुंबई प्रदूषित, बिल्डर्सनं नियम पाळले नाहीतर कठोर कारवाई होणार, तावडेंचे आदेश
बोरा यांनी १६ फेब्रुवारीला राजीनामा दिला होता, परंतु काँग्रेस हायकमांडने तो स्वीकारला नव्हता. त्यानंतर वरिष्ठ काँग्रेस नेते त्यांच्या निवासस्थानी गेले होते, तर राहुल गांधी यांनीही त्यांच्याशी संपर्क साधला होता. आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी त्यांनी अवधी मागितला होता; परंतु , त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. Eknath Shinde : सार्वजनिक बांधकाम खात्याची धुरा भुसेंकडे, तर नगरविकासची जबाबदारी सामंतांना; एकनाथ शिंदेंच्या पत्रात काय? आसाम विधानसभेची मार्च-एप्रिलमध्ये निवडणूक होण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभमीवर काँग्रेससाठी हा धक्का मानला जात आहे. ‘मी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पक्षाचा राजीनामा दिला नव्हता. बिघडलेल्या गोष्टींबाबत मंथन, आत्मपरीक्षण होईल, अशी अपेक्षा होती. नेतृत्वाने मात्र मला दुखावले’, असे ते म्हणाले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा