Headlines

Food Inflation In India ; फक्त साखर नाही, स्वयंपाकघरातील अनेक गोष्टींच्या किंमती वाढल्या; कोणकोणत्या? जाणून घ्या


देशभरातील सामान्य नागरिक महागाईच्या समस्येने फार त्रस्त आहेत. देशातील सामान्य नागरिक आधीच गॅसदरवाढीने त्रासले आहेत अशात स्वयंपाकघरातील इतर वस्तुही महागाईच्या संकटात सापडत आहेत. एकंदरीत, महागाई आता सामान्य नागरिकांच्या पोटापर्यंत पोहचली आहे. गेल्या काही दिवसांपासून साखरेच्या वाढत्या किंमतीबद्दल अनेक चर्चा होत आहेत. देशातील बहुतेक मंडळींनी साखरेच्या वाढत्या किंमतीचे कारण इथेनॉल असल्याचे सांगितले आहे तर भारत सरकारने या आरोपांना फेटाळून लावले आहे.

साखरेबरोबरच कांद्याच्या किंमतीतही वाढ झाली आहे. दररोजच्या वापरतील विविध डाळीही महागल्या आहेत. खाद्य तेलाच्या किंमती वाढत चालल्या आहेत आणि या सर्व वाढत्या किंमती पाहून सामान्य नागरिकांच्या डोक्यावरील तणाव आणि खिशावरील भारदेखील वाढत चालला आहे.

कांद्याच्या किंमती वाढल्या

21 ऑगस्ट 2026 रोजी कांद्याची किंमत 40.79 रुपये प्रति किलोग्राम होती. एका आठवड्यापूर्वी हाच कांदा 36.56 रुपये प्रति किलोग्राम किंमतीने विकला जात होता. एका आठवड्यात कांद्याच्या किंमतीत 4.23 रुपये प्रति किलोग्राम किंमतीची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर महिन्याभरात कांदा 5.92 रुपये प्रति किलोग्राम किंमतीने महागला आहे.

असे म्हंटले जात आहे की नवीन कांदा बाजारात उशीरा उपलब्ध झाल्यामुळे कांदा पुरवठ्यावर दबाव तयार झाला आहे, परिणामी किंमती वाढल्या आहेत.

खाद्य तेलाच्या किंमतीतही वाढ

भारतात खाद्य तेलाचा वापार मोठ्या प्रमाणात केला जातो. अशात गेल्या महिनाभरात खाद्य तेलाच्या किंमतीत 2 ते 3% ची वाढ नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पाल्म ऑइलच्या किंमतीत गेल्या 20 महिन्यांच्या उच्चांकावर आहेत. एकंदरीत, खाद्य तेलाच्या वाढत्या किंमतीच्या समस्यांना जगातील अनेक देश तोंड देत आहेत. भारत पाल्म ऑइल आयात करतो. अशात इंडोनेशिया देशात पडलेल्या दुष्काळामुळे पाल्म ऑइल महागले आहे आणि आयात कमी केल्यामुळे भारतातल्या खाद्य तेलाच्या पुरवठ्यावर दबाव तयार झाला आहे. परिणामी किंमती वाढल्या आहेत.

डाळीही महागल्या

उडीद डाळ, तूर डाळ, मूग असो वा हरभरा, डाळींच्या किंमतीमध्ये 1 ते 2 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. यंदा पेरणी क्षेत्र कमी झाल्यामुळे डाळीची निर्मिती कमी झाली आहे. त्याचबरोवर भविष्यात मान्सून कमी राहिला तर डाळींच्या किंमतीवर आणखीन परिणाम होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Timesसरकारी गोल्ड बॉन्ड रीडीम करण्याचे कॅलेंडर जारी! दोन वेगवेगळ्या तारखांमुळे उडतोय गोंधळ? समजून घ्या सोप्या भाषेतमहागाईत साखरेला विशेष स्थान!

साखर देशातील अनेक भागांमध्ये 70 रुपये प्रति किलोग्राम किंमतीने विकली जात आहे. गेल्या आठवड्यात साखरेच्या किंमतीत 7 रुपये प्रति किलोग्राम इतकी वाढ नोंदवण्यात आली तर महिन्याभरात साखर 17 रुपये प्रति किलोग्राम किंमतीने महागली आहे. देशातील बहुतेक मंडळींनी साखरेच्या वाढत्या किंमतीचे खापर इथेनॉलवर फोडले परंतु सरकारने ते सर्व दावे फेटाळून लावले. तसेच या वाढत्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी गाळप हंगाम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सरकारकडून देशात साखरेचा पुरवठा वाढवण्यात भर दिला जात आहे. देशात साखरेचा तुटवडा तयार झाला असून एका साखर निर्यातदार देशाला साखर परदेशातून आयात करण्याची वेळ आली आहे. तरीही या सणासुदीच्या दिवसांसाठी देशांतर्गत साठा उपलब्ध असून साखर वितरकांना सरकारच्या निर्देशाप्रमाणे स्वतःकडे ठराविक साठाच ठेवता येणार आहे.

दिवेश चव्हाण

लेखकाबद्दलदिवेश चव्हाणदिवेश दिनेश चव्हाण हे मराठी पत्रकार असून ते सध्या महाराष्ट्र टाइम्स येथे कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2026 पासून ते महाराष्ट्र टाइम्स येथे अर्थ, पर्सनल फायनान्स आणि देश-विदेशातील बातम्यांसंबंधित लेखन करत आहेत. शेअर बाजारातील घडामोडी, बँकिंग, नवे आर्थिक धोरण आणि तांत्रिक नियम अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

यापूर्वी ते नवराष्ट्र या मराठी वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून काम करत होते. या काळात त्यांनी अर्थ, व्यवसाय, करिअर आणि नोकरीसह विविध क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन केले आहे. यासोबतच काल्पनिक कथा लेखन आणि एखाद्या कथेचे स्वारस्यपूर्ण विश्लेषण करण्यातही ते पटाईत आहेत.

त्यांचे शिक्षण ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात झाले. याच ठिकाणी त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे मास्टर ऑफ आर्ट्स इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी आहे. विविध विषयांवर अचूक आणि विश्वासार्ह बातम्या पुरवणे हा त्यांच्या लेखन, पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार माहिती देऊन त्यांना जागतिक घडामोडींविषयी जागरुक ठेवणे हा त्यांचा हेतु आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन वार्षिक अंक Rta मध्ये इंग्रजी रिपोर्टींग विभागाचे हेड म्हणून त्यांनी कारोभार सांभाळला आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत