Headlines

सत्य माहीत नसताना निव्वळ व्ह्यूजसाठी खोट्या गोष्टी पसरवल्या; संगीता चांदगुडे यांच्या बहिणीचा संताप


छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज येथील खवड्या डोंगरावरुन पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर विविध दावे केले जात होते. पण यावरुन मृतक संगीता चांदगुडे यांच्या बहीण पल्लवी पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.

Pallavi Patil
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, ​छत्रपती संभाजीनगर : वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावरून दरीत उडी घेऊन चांदगुडे कुटुंबातील तिघांनी केलेल्या सामूहिक आत्महत्येच्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर विविध अफवा आणि व्हिडिओंचा पूर आला असतानाच, मयत संगीता चांदगुडे यांची बहीण पल्लवी पाटील यांनी एक भावूक व्हिडिओ जारी करत युट्यूबर्स आणि सोशल मीडिया युजर्सवर जोरदार संताप व्यक्त केला आहे.

​सोशल मीडियावर केवळ ‘आयफोन किंवा मोबाईल न घेतल्याने मुलगा कुणालने आई-वडिलांना आत्महत्येस भाग पाडले’ अशा दाव्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यावर भावनिक होत पल्लवी पाटील यांनी म्हटले, संगीता माझी मोठी बहीण, कुणाल माझा भाचा आणि मुरलीधर हे माझे मेव्हणे होते. या तिघांना गमावल्यामुळे आमच्या कुटुंबावर काय डोंगर कोसळला आहे, हे फक्त आम्हालाच माहीत आहे. आज आम्ही बहिणीची, भाच्याची आणि मेव्हण्यांची राख गोळा करायला जात असताना मोबाईलवर एकापाठोपाठ एक येणारे व्हिडिओ पाहिले. ते पाहून आमचं काळीज खाली बसलं आहे.

‘​काहीही माहिती नसताना खोट्या गोष्टी का पसरवता?’​

व्हिडिओ बनवणाऱ्यांवर थेट सवाल उपस्थित करत पल्लवी पाटील म्हणाल्या की, सोशल मीडियावर लोक कोणतीही शहानिशा न करता आपले मत मांडत आहेत. ​तुम्ही आम्हाला ओळखत नाहीत, तुम्हाला घटनेची खरी पार्श्वभूमी किंवा सत्य माहिती नाही; तरीही निव्वळ व्ह्यूज मिळवण्यासाठी खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. तुमच्या या खोट्या व्हिडिओंचा आणि अफवांचा आमच्या संपूर्ण कुटुंबाला प्रचंड त्रास होत आहे. आमचे आई-वडील सत्तरीच्या पार आहेत, त्यांचा मुलगा आणि मुलगी दोन्ही गेले आहेत. अशा परिस्थितीत या खोट्या बातम्यांमुळे त्यांचा त्रास आणखी वाढतोय, असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.

‘आम्ही तीन बहिणी पोरक्या झालोय, आम्हाला सावरू द्या’

​आपली उद्विग्नता व्यक्त करताना त्या म्हणाल्या, आम्ही चार बहिणी होतो. आज मोठ्या बहिणीच्या जाण्याने आम्ही तीन बहिणी परक्या झालो आहोत. चांदगुडे कुटुंब पूर्णपणे संपलं आहे, आमचं जगणं मुश्किल झालं आहे. या आघातातातून कसं सावरायचं हेच आम्हाला सुचत नाही. त्यामुळे मृत कुणाल, माझी दीदी आणि मेव्हण्यांबद्दल काहीही लिहिण्या किंवा व्हिडिओ बनवण्याआधी माणसाने थोडा तरी विचार करायला हवा, असं पल्लवी पाटील म्हणाल्या.

‘सत्य माहीत नसताना फक्त लाइक्स,व्ह्यूज साठी व्हिडिओ’

​खवड्या डोंगर सामूहिक आत्महत्येनंतर सोशल मीडियावर व्ह्यूज आणि लाईक्स मिळवण्यासाठी काही युजर्स आणि स्थानिक डिजीटल क्रिएटर्सकडून खोट्या कथा रचल्या जात असल्याचे या व्हिडिओवरून स्पष्ट झाले आहे. पोलीस प्रशासन या प्रकरणाचा तपास करत असताना, अशा संवेदनशील घटनेत तथ्यहीन माहिती पसरवण्याऐवजी संयम बाळगण्याचे आवाहन आता पीडित कुटुंबाकडून केले जात आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा