Headlines

Famous marathi actress caught in girgaon racket deal revealed; हिरोईन होण्यासाठी गावाकडून मुंबईत आली, अलगद देहव्यापाराच्या जाळ्यात


Mumbai Police Raid: मुंबई पोलिसांनी गिरगाव इथं धाड टाकून देहव्यापारात अडकलेल्या दोन अभिनेत्रींची काही दिवसांपूर्वी सुटका केली. या प्रकरणात आता धक्कादायक तपशील समोर आले आहेत.

mumbai news
मराठीतील लोकप्रिय अभिनेत्रीकडून देहव्यापार, एका रात्रीसाठी लाखोंचा सौदा(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: मुंबईतील गिरगाव येथील एका हॉटेलमध्ये धाड टाकून पोलिसांनी नुकतेच देह व्यापार करणारे रॅकेट उद्ध्वस्त केले. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली असून देह व्यापारात गुंतलेल्या अभिनेत्रींकडून एका रात्रीसाठी ग्राहकांकडून लाखो रुपये वसूल केल्याचं उघड झालं आहे. मराठी सिनेसृष्टीत काम करणाऱ्या एका महिला मेकअप आर्टिस्टच्या माध्यमातून गिरगाव परिसरात अभिनेत्रींकडून देह व्यापार करवून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली असता दोन अभिनेत्रींसह दलाल म्हणून काम करणाऱ्या महिला मेकअप आर्टिस्टला रंगेहाथ पकडण्यात आलं. या प्रकरणात आता नवनवे धागेदोरे समोर येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गिरगाव येथील हॉटेलमध्ये देहव्यापाराचे हायप्रोफाइल रॅकेट सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवत आधी याबाबत खात्री केली. त्यानंतर एक महिला मेकअप आर्टिस्ट दोन अभिनेत्रींना घेऊन हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. तिथे आधीच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी देह व्यापारात सक्रिय असलेल्या अभिनेत्रींची सुटका केली आणि त्यांना या रॅकेटमध्ये ओढणाऱ्या मेकअप आर्टिस्टला ताब्यात घेत अटक केली आहे.

एका रात्रीसाठी लाखोंचा सौदा

मराठी सिनेसृष्टीत मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत असलेल्या महिलेचा अनेक अभिनेत्रींशी संपर्क होता. यातील एक अभिनेत्री ही ग्रामीण महाराष्ट्रातून मुंबईत आली होती. आपल्या अभिनयाच्या जोरावर नावलौकिक मिळवण्याचे सदर अभिनेत्रीचे स्वप्न होते. मात्र मागील काही महिन्यांपासून तिला काम मिळत नव्हते. अशातच आरोपी मेकअप आर्टिस्ट महिलेने तिला देह व्यापाऱ्याच्या काळ्या विश्वात ओढलं. या मेकअप आर्टिस्टने एका श्रीमंत ग्राहकाशी संपर्क साधत सदर मराठी अभिनेत्रीसह एका बंगाली मॉडेलच्या शरीराचा सौदा केला. एका रात्रीसाठी प्रत्येकी एक लाख असे दोन्ही अभिनेत्रींसाठी ग्राहकाकडून एकूण दोन लाख रुपये घेतले जाणार होते. मात्र पोलिसांनी वेळीच धाड टाकल्याने दोन्ही अभिनेत्रींची देह व्यापारातून सुटका करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या निमित्ताने अभिनय क्षेत्रातील भयानक वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे. काम मिळण्यातील अडथळे किंवा कमी कालावधीत जास्त पैशांचा हव्यास काही अभिनेत्रींना देहव्यापारासारख्या भयंकर विश्वात ढकलत असल्याचं उघड झाल्याने मराठी सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा