Headlines

Excise Duty Increase On Petrol Diesel ; Crude Oil : कच्च्या तेलाच्या किमती घसरताच सरकारने वाढवला इंधनांवरचा टॅक्स; तेल कंपन्यांवर वाढला भार, सर्वसामान्यांचं काय?


केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल संदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका-इराण दरम्यान असणारे तणाव थोडे शिथिल झाल्यामुळे कच्च्या तेलाची किंमत कमी झाली आहे. जरी कच्च्या तेलाची किंमत घसरली असली तरी पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमतीत काहीच बदल झालेला नाही. देशात इंधनांच्या किंमती स्थिर आहेत. परंतु, कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किंमतीचा पुरेपूर फायदा देशाचे सरकार घेत असल्याचे दिसून येत आहे. भारत सरकारने कच्च्या तेलाच्या एक्साइज ड्यूटी तसेच सेसमध्येबदल केले आहेत.

कच्च्या तेलावर आकारण्यात येणाऱ्या एक्साइज ड्यूटीमध्ये वाढ करण्यात आली आहे. कच्च्या तेलावरचा कर वाढल्यामुळे देशातील पेट्रोल-डिझेलचीही किंमत वाढणार का? असा प्रश्न बहुतेकांना पडला आहे. परंतु, सध्यातरी पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ किंमतीत काहीच बदल होणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे किमान आतातरी पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये फारसा चढउतार दिसणार नसल्याची शक्यता आहे.

फक्त पेट्रोल-डिझेल नव्हे तर या इंधनांच्या एक्साइज ड्यूटीतही करण्यात आली वाढ

कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्यामुळे देशाचा महसूल वाढवण्यासाठी शासनाकडून पेट्रोल-डिझेलसहित ATF (विमानांचे इंधन) वरही एक्साइज ड्यूटी वाढवण्यात आली आहे. जेव्हा ATF वर एखादा कर वाढतो तेव्हा त्याचा परिणाम म्हणून विमानांचे तिकिटेही वाढतात. परंतु, शासनाने वाढवलेली एक्साइज ड्यूटी ग्राहकांवर न लादता कंपन्या स्वतः उचलणार आहेत, त्यामुळे पेट्रोल-डीझेल किंवा ATF च्या किरकोळ किंमतीवर या करवाढीचा फारसा परिणाम जाणवणार नाही.

एक्साइज ड्यूटीमध्ये करण्यात आलेली वाढ किती?

भारत सरकारने पेट्रोलच्या एक्साइज ड्यूटीवर एकूण 1 रुपयांची वाढ केली आहे. आधी 2.5 रुपये प्रति लिटर एक्साइज ड्यूटी म्हणून आकारण्यात येत होते, त्या रक्कमेत वाढ करून आता 3.5 रुपये प्रति लिटर आकारण्यात येत आहे. तर भारत सरकार सर्वात जास्त एक्साइज ड्यूटी डिझेलवर आकारत आहे. आधी 15.5 रुपये प्रति लिटर एक्साइज ड्यूटी डिझेलवर आकारण्यात येत होती, आता त्यात 8.5 रुपायांची वाढ करून ती रक्कम 24 रुपये प्रति लिटर करण्यात आली आहे. तर ATF इंधनावर आता 22 रुपये प्रति लिटर एक्साइज ड्यूटी आकारण्यात येत आहे. याआधी 14.5 रुपये प्रति लिटर एक्साइज ड्यूटी आकारण्यात येत होती.

Maharashtra TimesPFF Savings Rules : गुंतवणुकीसाठी उत्तम, पण चुका टाळा; परताव्यात अडचणी नको तर या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाएक्साइज ड्युटी म्हणजे काय?

एक्साइज ड्युटी म्हणजे सरकारद्वारे एखाद्या वस्तूच्या उत्पादनावर किंवा वस्तूच्या विक्रीवर आकारलेला कर. हा कर पूर्णपणे केंद्र सरकारकडे जातो. देशाचा महसूल वाढवणे हे एक्साइज ड्यूटी वाढवण्यापैकीचे एक महत्वाचे कारण आहे. जेव्हा एक्साइज ड्यूटी वाढते तेव्हा सहसा दोन गोष्टी घडतात. एक तर कंपन्या स्वतः भार उचलते अन्यथा ग्राहकांवर लादते. जेव्हा कंपन्या स्वतः भार उचलते तेव्हा त्यांच्या नफ्यावर परिणाम जाणवू शकतो. पण जेव्हा ग्राहकांवर लादण्याचे ठरवते तेव्हा वस्तूंच्या किरकोळ किंमतीत वाढ दिसून येते.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत