Headlines

E20 Blending Petrol; पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्सिंग केवळ चाचपणीसाठी, पुढच्या वर्षी अहवाल येतील! सरकारी वकिलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद


E20 Petrol in India News: इथेनॉल मिश्रित पेट्रोलसंदर्भात सोशल मीडियावर दावे-प्रतिदावे केले जात आहेत आणि सरकारने या दाव्यांची दखल घेतली. सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीत केंद्र सरकारने सांगितले की “पेट्रोलमधील 20% इथेनॉल मिश्रण कार्यक्रम सध्या एक प्रयोग असून त्याचे वास्तविक परिणाम पुढील वर्षी दिसून येतील.”

E20 Petrol in India
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
E20 Petrol Update: मध्यपूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतात E20 पेट्रोलबद्दलच्या चर्चांनी जोर धरला. पुढील काही वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या जागी इथेनॉल-मिश्रित इंधनाचा वापर वाढेल अशी चर्चा सुरू झाली. पण, गेल्या काही दिवसात पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याच्या मोहिमेवरून सुरू चर्चांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

इथेनॉल-मिश्रित पेट्रोलचे सरकारने काय सांगितले

सरकारने म्हटले आहे की, 20% इथेनॉल मिश्रण कार्यक्रम सध्या केवळ प्रयोग म्हणून राबवला जात असून त्याचे वास्तविक परिणाम पुढील वर्षापर्यंत समोर येतील. पश्चिम आशियातील संघर्षादरम्यान सरकारने सुरू केलेल्या कार्यक्रमाबाबत व्यापक चर्चा आणि चिंतांच्या पार्श्वभूमीवर सरकारचे विधान समोर आले असून इथेनॉलचे मिश्रण वाढवल्यास जुन्या वाहनांचे नुकसान होऊ शकते आणि इंधनाची कार्यक्षमताही कमी होण्याची अनेकजण अशी भीती व्यक्त करत आहेत.
Maharashtra TimesShare Market : ये रे ये रे पैसा… 1 लाखाचे झाले 3.40 लाख; एथर एनर्जीच्या गुंतवणूकदारांना सहा महिन्यातच सुपरडुपर फायदा!
ई20 पेट्रोल, इंधन कार्यक्षमता आणि पर्यावरणावरील परिणामांना वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सर्वोच्च कोर्टात विधान केले. ऊर्जा सुरक्षा, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि पर्यावरणाचे संरक्षण यासाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे केंद्र सरकार सातत्याने सांगत आहे.

BPCL ने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान ॲटर्नी जनरल आर. व्यंकटरमणी यांनी सांगितले की, सरकार 20 टक्के इथेनॉल मिश्रित कार्यक्रमावर सातत्याने काम करत आहे. त्यांनी न्यायालयाला सांगितले, “20% इथेनॉल मिश्रण एक योजना आहे, ज्यावर सरकार प्रयोग करत आहे, ज्याचे परिणाम आपल्याला पुढील वर्षापर्यंत समोर येतील.” बीपीसीएलने 2025-26 च्या इथेनॉल पुरवठा वर्षासाठी इथेनॉल वाटपासंदर्भातील कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले.
Maharashtra TimesPetrol-Diesel Rule Change: पेट्रोल, डिझेलच्या खरेदीवरील मर्यादा पूर्णपणे रद्द; 1 जुलैपासून संपूर्ण देशात होणार बदल, दिवसाला 200 लिटरची मर्यादा होती

E20 पेट्रोलबद्दल वाद का?

पश्चिम आशियातील युद्धामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित झाल्यानंतर सरकारने पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळून आयात केलेल्या कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने नवीन उपक्रम हाती घेतला. यामुळे क्रूडची आयात कमी होईल आणि ऊस व इतर पिकांच्या शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त बाजारपेठ उपलब्ध होईल, असा सरकारने दावा केला. मात्र, अनेक तज्ज्ञांनी जुन्या वाहनांच्या इंजिन क्षमता,मायलेज आणि मेंटेनन्सवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.

गेल्या वर्षी भारताने पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याचे आपले लक्ष्य नियोजित वेळेच्या पाच वर्षे आधीच साध्य केले. तेल विपणन कंपन्यांनी 1 एप्रिलपासून देशभर इथेनॉल-मिश्रित पेट्रोलचा पुरवठा सुरू झाला. अशा परिस्थतीत, आता सरकारने 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण 30% पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
Maharashtra Times8th Pay Commission Salary Hike: पगारवाढीच्या नावाखाली अपेक्षांवर पाणी फिरेल; किमान ₹69000 वेतन स्वप्नच, कोट्यवधी कर्मचाऱ्यांना सरकारचा देणार झटका?
E20 इंधनाच्या वापरामुळे वाहनांच्या विमा संरक्षणावर परिणाम यासारख्या शंका फेटाळून लावत केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम ‘सुरक्षित, ग्राहक-स्नेही आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर’ असल्याचे म्हटल्यानंतर एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीतच आज सुनावणी झाली. 24 जून रोजी मंत्रालयाने निवेदन जारी केले आणि म्हटले की E20 इंधनामुळे विमा पॉलिसी रद्द होऊ शकतात किंवा अवैध ठरू शकतात, या दाव्यांची संबंधित घटक म्हणजे स्टेकहोल्डर्ससोबत पडताळणी केली गेली आणि दावे चुकीचे असल्याचे आढळून आले.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा