Headlines

Donald Trump Hormuz Toll Impact; होर्मुझचा वाद तूर्तास नाही मिटणार, चीनने करून घेतली स्वतःची व्यवस्था; भारताकडून अजूनही जोरदार खरेदी

Donald Trump Hormuz Toll: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या सर्व मालवाहू जहाजांवर 20% टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी सांगितले की इराणच्या बंदरांवरील अमेरिकेची नाकेबंदी पुन्हा सुरू केली. ट्रम्प यांच्या नव्या वक्तव्यामुळे भारताच्या समस्या वाढण्याची भीती निर्माण झाली तर चीनलाही चेकमेट करण्याचा महासत्तेचा इरादा यावरून दिसून येतो.

Donald Trump Hormuz Toll Impact on India and China
Hormuz 20% Toll: होर्मुझ सामुद्रधुनीत इराण आणि अमेरिका यांच्यात नव्याने संघर्ष सुरू झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी US आता या सागरीमार्गाचा गार्डियन असल्याचा दावा केला. तर दुसरीकडे, इराणने या जलमार्गावर आपला दावा सांगितला. होर्मुझवर नेहमीच त्यांची मालकी होती आणि ती कायम राहील, असे इराणकडून सांगितले गेले. अशाप्रकारे, इराण-अमेरिकेच्या दाव्यानंतर तेलाच्या बाजारात पुन्हा वाढीचा कल पाहायला मिळत आहे, ज्यामुळे भारतासाठी समस्या निर्माण होऊ शकतात.

अमेरिका होर्मुझवर टोल वसूल करणार

अमेरिका होर्मुझवर टोल वसूल करणार

अमेरिका आणि इराण संघर्ष संपायचं नाव घेत नसून पश्चिम आशियातील परिस्थितीवर तोडगा निघत नाही. दोघे कधी एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले करतात तर, आता दोघे होर्मुझ सामुद्रधुनीचे ‘गार्डीयन’ म्हणून हक्क गाजवत आहेत. अमेरिका-इराण संघर्षात होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा सर्वात मोठा पेच बनला आहे, जिथून जगातील 20% कच्चे तेल आणि नैसर्गिक गॅसचा व्यवहार होतो. अशाप्रकारे, या जलमार्गावर दोघांकडून वर्चस्व मिळवण्याची धडपड सुरू असून त्यावर, आता टोल वसुलीची टांगती तलवार लटकली आहे.

होर्मुझवर अमेरिका-इराणमध्ये ठस्सन

होर्मुझवर अमेरिका-इराणमध्ये ठस्सन

डोनाल्ड ट्रम्प यांनी आदल्या दिवशी होर्मुझमधील जहाजांना सुरक्षित बाहेर काढण्याच्या बदल्यात टोल आकारणीचा दावा केला. ट्रम्प यांनी या तेल आणि गॅस वाहू जहाजांकडून 20 टक्के टॅरिफ निश्चित केला आणि अमेरिकेला होर्मुझचा गार्डीयन म्हणून घोषित केले. होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांच्या सुरक्षित प्रवासाचा आपण खर्च उचलत आहेत, त्यामुळे आपल्याला 20% टोल कर वसूल करण्याचाही अधिकार असल्याचा ट्रम्प यांनी युक्तिवाद केला.

इराणचे अमेरिकेला आव्हान, ट्रम्पची उडवली खिल्ली

इराणचे अमेरिकेला आव्हान, ट्रम्पची उडवली खिल्ली

होर्मुझ सामुद्रधुनीवर आपल्या सार्वभौमत्वाचा इराणने वारंवार दावा केला आणि मालाच्या सुरक्षित मार्गाच्या बदल्यात टोल आकारणीचा आपल्याला हक्क असल्याचा दावा केला. यासाठी इराणने होर्मुझमध्ये मोठ्या प्रमाणात सैन्यदल तैनात केले असून इराणचे परराष्ट्र मंत्री, अब्बास अराघची यांनी ट्रम्प यांच्या दाव्यांची खिल्ली उडवली. अराघची यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की ट्रम्प यांचं म्हणणं बरोबर आहे, ‘होर्मुझमधून व्यापारी जहाजांना सुरक्षित मार्ग देणाऱ्यांवर टोल आकारला पाहिजे.’ इराण नेहमीच या सागरी मार्गाचा संरक्षक राहिला आहे आणि राहील पण 20% टोल खूप जास्त आहे. आम्ही या बाबतीत न्याय्य वागू.

तेलाच्या बाजारात पुन्हा उकळी

तेलाच्या बाजारात पुन्हा उकळी

अमेरिका आणि इराण दोघेही होर्मुझच्या सामुद्रधुनीत वर्चस्व गाजवण्याच्या प्रयत्नात आहेत. जागतिक व्यापारासाठी महत्त्वाच्या अशा या जलमार्गावरील तणावामुळे तेलाच्या किमतींना उसळी आली असून आठवड्यापूर्वी 69 डॉलर/बॅरलवर कमी झालेल्या तेलाच्या किमती आता 85 डॉलरवर उसळल्या आहेत. तेलाच्या किमतीत तेजीचा कल कायम असून ही दरवाढ सध्यातरी थांबताना दिसत नाही.

भारतावर काय परिणाम होणार?

भारतावर काय परिणाम होणार?

पश्चिम आशियातील या तणावाने अख्खं जग व्यापले आहे आणि भारतही याला अपवाद ठरला नाही. क्रूडच्या दरवाढीमुळे केला भारताच्या आयात खर्चच वाढणार नाही तर, होर्मुझ नाकेबंदीमुळे पुरवठ्यातही व्यत्यय येईल, ज्यामुळे संभाव्य ऊर्जा संकटाचा धोका निर्माण होतो. गेल्या काही महिन्यातील चढ-उतारातून भारताने धडा घेऊन ऊर्जा संकटाच्या दिशेने तयार सुरू केली पण, होर्मुझमधील वाढत्या तणावामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमत लवकर स्वस्त होण्याची आस मवाळ होताना दिसत आहे.

होर्मुझ वाद पुन्हा निखळला, चीनच्याही हालचाली सुरू

होर्मुझ वाद पुन्हा निखळला, चीनच्याही हालचाली सुरू

दुसरीकडे, कधीकाळी इराणी तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार असलेल्या चीनला पश्चिम आशियातील संघर्ष सहजासहजी संपणार नसल्याचे लक्षात आले असून ड्रॅगनने तेल रिफायनरी कारखान्यांना उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून चीनने क्रूडची खरेदी थांबवलेली, पण आता भारताचा शेजारी पुन्हा तेलाच्या बाजारात उतरल्यास त्याचा क्रूडच्या किमतीवर थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कच्च्या तेलाची किंमत पुन्हा 100 डॉलर पार जाण्याचा धोका दिसत आहे.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा