Headlines

Maharashtra Cabinet updates राज्याच्या मंत्रीमंडळाकडून ८ महत्वाचे निर्णय जाहीर


राज्याच्या मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. १४ जुलै रोजी पार पडलेल्या या बैठकीत मंत्रीमंडळाने राज्याचा सर्वांगीण विकास, कृषी सुधारणा, क्रीडा पायाभूत सुविधा आणि समाजातील वंचित घटकांच्या कल्याणासंदर्भात आठ महत्त्वाचे निर्णय घेतले.

मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयांमध्ये बहुप्रतिक्षित कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याची चर्चा सुरु आहे.

पालघरला मोठी भेट

मिळालेल्या माहितीनुसार राज्य मंत्रिमंडळाने पालघर जिल्ह्याच्या आदिवासी आणि किनारपट्टीच्या भागांमध्ये एका मोठ्या प्रकल्पालाही मंजुरी दिली आहे. व्यापार वाढीसाठी तसेच रोजगार निर्मितीसाठी याचा फायदा होईल अशी अपेक्षा या निर्णयामुळे व्यक्त करण्यात येत आहे.

कर्जमाफी योजनेच्या नव्या बदलानुसार, २०२९ च्या कर्जमाफी योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुमारे १३ लाख नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी निश्चित केलेली ५०,००० रुपयांची आर्थिक मर्यादा नव्या नियमात पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे. याशिवाय, २०२६-२७ या वर्षात कर्जाच्या नियमित परतफेडीची अनिवार्य अटही हटवण्यात आली आहे. ज्यामुळे राज्यातील २३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना थेट प्रोत्साहन लाभ मिळू शकेल.

सहकार आणि विपणन



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत