Headlines

Donald Trump: इराणचे सैन्य नेस्तनाबूत; अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचा दावा, 250व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषण – donald trump claimed us has destroyed military forces of both venezuela and iran


Donald Trump: भारतीय नौदलाचे नौकानयन प्रशिक्षण जहाज आयएसएस सुदर्शिनी अमेरिकेच्या २५०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित भव्य सागरी सोहळ्यात सहभागी झाले. तिरंगा अभिमानाने फडकवत हे जहाज ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ जवळून पुढे सरकले.

trump
डोनाल्ड ट्रम्प(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
वृत्तसंस्था, वॉशिंग्टन: ‘अमेरिकेने व्हेनेझुएला आणि इराण या दोन्ही देशांच्या लष्करी दलांना नेस्तनाबूत केले आहे,’ असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. अमेरिकेच्या २५०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शनिवारी ‘नॅशनल मॉल’ येथील ‘सॅल्यूट टू अमेरिका’ या सोहळ्यात त्यांनी भाषण केले.

‘तुम्ही व्हेनेझुएलाकडे पाहा, तुम्ही इराणकडे पाहा. आम्ही त्यांना पूर्णपणे संपवून टाकले, त्यांचे सैन्य नेस्तनाबूत केले,’ असे ट्रम्प यांनी सांगितले. या लष्करी क्षमतेचे श्रेय ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळातील सशस्त्र दलांची पुनर्रचना करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना दिले. या भाषणात एका विधानात ट्रम्प यांनी सध्याच्या कार्यकाळाचा थट्टेने आपला ‘तिसरा कार्यकाळ’ असा उल्लेख केला; परंतु, कोणताही वाद टाळण्यासाठी आपण या विषयावर पुढे बोलणार नाही, असे त्यांनी लगेचच स्पष्ट केले.

Maharashtra TimesUS Iran Conflict: दोन बड्या नेत्यांना संपवण्याचा डाव! इस्रायलचा कट, अमेरिका अलर्ट; मोठा घातपात टळला, जगाला दिलासा
देशाच्या ऐतिहासिक प्रवासाचा गौरव करताना ट्रम्प यांनी पूर्वसुरींच्या दृढनिश्चयाचे कौतुक केले. अमेरिकेचा हा प्रवास म्हणजे स्वातंत्र्याच्या साम्राज्याची (एम्पायर ऑफ लिबर्टी) निर्मिती असल्याचे वर्णन त्यांनी केले. पनामा कालव्याच्या निर्मितीचा उल्लेखही त्यांनी केला. या अभियांत्रिकीच्या चमत्कारासाठी ३८ हजार अमेरिकींनी आपले प्राण गमावले. हा कालवा जगातील आठवे आश्चर्य असल्याचे ट्रम्प म्हणाले.

दरम्यान, ट्रम्प यांनी शुक्रवारी इराणवर टीका केली होती. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्या देशाला एक आठवड्याची सुट्टी दिली होती, असा दावा त्यांनी केला. अमेरिकेच्या दबावामुळे इराणी नेतृत्वाचे मनोधैर्य खचले असून, ते तडजोड करण्यासाठी आसुसलेले आहेत, असा दावाही त्यांनी केला. स्वातंत्र्यदिनानिमित्त अनेक शहरांत आतषबाजी करण्यात आली. चार जुलैला अमेरिकेत राष्ट्रीय सुट्टी असते. याच दिवशी १७७६ मध्ये ब्रिटिश राजवट संपुष्टात आणण्यासाठी अमेरिकेतील १३ वसाहतींनी स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली होती.

Maharashtra TimesVenezuela Earthquake : मी जिवंत आहे, माझ्या बायकोला सांगू नका; बोगदा खणून 8 दिवसांनी वाचवलं, त्याचेच शब्द ऐकून बचाव पथक बुचकळ्यात, कारण समजताच गलबलले
‘साम्यवाद स्वीकारणार नाही’
अध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेच्या २५०व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात साम्यवादावर अत्यंत कडक शब्दांत टीका केली. अमेरिका कधीही साम्यवादी देश बनणार नाही, असे ते म्हणाले. ही विचारसरणी म्हणजे पूर्वजांनी पराभूत केलेले एक संकट असून, त्याला पुन्हा डोके वर काढू दिले जाणार नाही, असे ते म्हणाले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा