चंद्रपुरात काँग्रेसमध्ये मोठी अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. चंद्रपूर महापालिका निवडणुकीनंतर विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
चंद्रपूर : चंद्रपुरात काँग्रेसमध्ये मोठी धुसफूस बघायला मिळत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील अंतर्गत वाद शिगेला पोहोचला आहे. चंद्रपूर मनपातील गट नेता निवडीवरून दोन्ही काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार वाद सुरु आहे. अखेर चंद्रपूरमधील पक्षांतर्गत संघर्ष शमविण्यासाठी उद्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नागपुरात पोहोचणार आहेत. हर्षवर्धन सपकाळ दोन्ही नेत्यांची बैठक घेणार आहेत. ते मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणार आहेत. AICC चे प्रभारी आणि विदर्भातील मनपा निवडणूक प्रमुख कुणाल चौधरी देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. चंद्रपूर मनपा मधील काँग्रेस नागरसेवकांपैकी काही नगरसेवक वडेट्टीवार यांनी पळवल्याचा आरोप धानोरकर यांनी केला आहे.
“चंद्रपूरमध्ये काँग्रेस जवळपास बहुमताच्या जवळ आहे. आम्ही सत्तेच्या अगदी जवळ पोहोचलो. निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी आम्ही सर्वजण आपापल्या घरी असताना आमच्याच काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने आमचे काही नगरसेवक हे घरी असताना त्यांना उचलून नेले. खरंतर जे पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांना उचलून नेवून असे वेगवेगळे गट करायची गरज नव्हती. ही चुकीची पद्धत झाली. काँग्रेसचे विभाजन दोन गटात झाले. विजय वडेट्टीवार यांचे काही लोकं नगरसेवकांच्या घरी गेले. ते रॅलीत असताना त्या रॅलीतूनच त्यांना उचलून घेऊन गेले”, असा आरोप प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे.
“सोयीसाठी न्यायचे होते तर सर्वांनाच घेऊन जायला हवं होतं. तुम्ही दिलेल्या एबी फॉर्मवर नगरसेवक निवडून आले. अर्धे तुमचे आणि अर्धे आमचे असा विषय आला नाही. खरंतर हा मतदारसंघ माझा आहे. मी इथे काँग्रेसची खासदार म्हणून काम करत आहे. असं असताना कुणीही बाहेरचा माणूस येईल आणि अशाप्रकारचं काम करेल हे पक्षासाठी चुकीचं आहे”, अशी नाराजी धानोरकर यांनी व्यक्त केली. Chhatrapati Sambhajinagar : मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला घेराव, भाजप कार्यकर्ते प्रचंड आक्रमक “विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे आहेत. मी देखील काँग्रेसची आहे. ते संपूर्ण राज्याचे नेते आहेत. ते माझ्या लोकसभा मतदारसंघापुरता मर्यादीत नाहीत. त्यामुळे त्यांना विनंती आहे की, आख्ख्या महाराष्ट्राकडे लक्ष दिलं पाहिजे. फक्त माझ्या मतदारसंघापुरता किंवा कोणत्या जिल्ह्यापुरता मर्यादीत राहू नये. मी स्पष्ट बोलणारी व्यक्ती आहे. मी कधी कुणाच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत नाही. त्यांच्याही मतदारसंघात मी कधी साधा पाय ठेवत नाही. माझा मतदारसंघ आहे. मी सर्वांना एबी फॉर्म दिले, जवळपास महिनाभर मेहनत घेतली आणि सर्वांना निवडून आणलं. यानंतर वेळेवर येऊन कुणी असं कृत्य करत असेल तर ते पक्षासाठी देखील हानिकारक आहे”, असं प्रतिभा धानोरकर म्हणाल्या. BMC Mayor : मुंबईच्या महापौर पदासाठी दिल्लीत खल, सर्वोच्च पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? “2019 पासून माझ्या मतदारसंघात ढवळाढवळ होत आहे. माझ्या पतीच्या निवडणुकीवेळी देखील ढवळाढवळ झाली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीला मी निवडणूक लढवली. लोकसभेच्या तिकीटावेळी देखील हाच प्रकार झाला. आतादेखील तेच होत आहे. मी कुणाच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत नाही. पक्ष वाढवण्यासाठी मी काम करत आहे. चंद्रपूरचे 2012 मध्ये 12 नगरसेवक होते. आता मी 30 नगरसेवक निवडून आणले. अशावेळी वेळेवर येऊन हे माझे आणि ते माझे करणे योग्य नाही”, अशी टीका प्रतिभा धानोरकर यांनी केली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा