Headlines

Dimple Kapadia : ‘स्वभाव तापट, मी त्यांची वाईट बाजूही पाहिली आहे’, नाना पाटेकरांबद्दल डिंपल कपाडिया यांचं वक्तव्य


Dimple Kapadia On Nana Patekar : डिंपल कपाडिया यांनी एका जुन्या मुलाखतीमध्ये नाना पाटेकर यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं होतं. या मुलाखतीदरम्यान डिंपल यांनी नाना पाटेकर यांच्या स्वभावाबद्दल भाष्य केलेलं.

Dimple Kapadia On Nana Patekar
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनी अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. खलनायक असो, पोलीस अधिकारी असो, विनोदी भूमिका असो, देशभक्तीपर असो किंवा गंभीर असो, नाना पाटेकर यांनी प्रत्येक भूमिका पडद्यावर मोठ्या अचूकतेनं साकारली. पण, मग एक काळ असा आला जेव्हा #MeToo चळवळीदरम्यान नाना पाटेकर यांच्यावर आरोप झाले. यादरम्यान, डिंपल कपाडिया यांनी नाना पाटेकर यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलेलं.

नाना पाटेकर यांच्याबद्दल काय म्हणालेल्या डिंपल कपाडिया?

नाना पाटेकर आणि डिंपल कपाडिया यांनी प्रहार, द फायनल अटॅक, अंगार, क्रांतीवीर आणि तुम मिलो तो सही यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. नाना पाटेकर यांचा स्वभाव कसा आहे, हे मला चांगलंच माहित आहे, असं डिंपल कपाडिया म्हणाल्या होत्या.

Onkar Raut Celebrity Corner : टाइमपास ते महाराष्ट्राची हास्यजत्रा…ओंकार राऊतसोबत खास गप्पा

एकदा चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांच्याशी बोलताना डिंपल म्हणाल्या की, नाना पाटेकर एक खूप चांगले अभिनेते आहेत, पण त्यांचा स्वभाव तापट आहे.

Maharashtra TimesSridevi And Mithun Chakraborty : ‘तीन महिने ते एका विवाहित जोडप्याप्रमाणे एकत्र राहिले’, श्रीदेवी आणि मिथुन यांच्याबद्दलच्या दाव्याची चर्चा
या मुलाखतीदरम्यान, अनुपमानं डिंपल यांना नाना पाटेकर यांच्या स्वभावाबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल विचारलं असता डिंपल कपाडिया म्हणाल्या की, ‘ते खूप वेगळे आहेत. कमी लोकांना ते आवडतात. त्यांचा स्वभाव पण खूप वेगळा आहे. पण, त्यांच्यात टॅलेंट खूप आहे. खरं तर ते खूप प्रतिभावान आहेत, यात काहीच शंका नाही. त्यांच्यासारख्या प्रतिभावान कलाकारांच्या कितीही मी चुका माफ करू शकते. मला त्यांचा अभिनय इतका आवडतो की त्यासाठी मी माझा जीवही देऊ शकते.’

Maharashtra TimesVijay Anand : सुप्रसिद्ध दिग्दर्शकानं 19 वर्षांनी लहान भाचीसोबतच थाटला संसार; ओशोंच्या सांगण्यावरून पहिल्या पत्नीला सोडलं अन् उरकलं दुसरं लग्न
‘एक व्यक्ती म्हणून माझ्याबरोबर नाना खूप चांगले वागतात, आम्ही दोघे एकमेकांचे चांगले मित्रही आहोत, पण मी त्यांची वाईट बाजूही पाहिली आहे. त्यांची नकारात्मक बाजू. आपल्या सर्वांची अशीच एक नकारात्मक बाजू असते, जी आपण सर्वांपासून लवपून ठेवतो. तशीच नकारात्मक बाजू नानांची आहे आणि त्यांनी ती खूप चांगल्या पद्धतीनं लपवून ठेवली आहे.’ असंही डिंपल कपाडिया यांनी सांगितलं होतं.