Headlines

Dhule Crime: लग्न लावून देत नाही म्हणून रागात मुलाने आईला पेटवलं; गंभीर भाजल्याने माऊलीचा तडफडून मृत्यू, धुळे हादरलं – 45 yrs old son sets mother on fire for getting married she dies due to severe burns in dhule


Dhule Crime: माझं लग्न का लावून देत नाही? अशी विचारणा करत मद्यधुंद मुलाने चक्क वृद्ध मातेला ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याची घटना घडली आहे.

dhule police
धुळे क्राईम(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, धुळे: लग्न लावून देत नाही म्हणून एका रिक्षाचालकाने त्याच्या वृद्ध आईच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले. यात गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मध्यरात्री घडली. महिंदळे (ता. धुळे) येथे ही घटना घडल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.

जिजाबाई भटू खैरनार (पाटील वय ६५ वर्षे) असे भाजून मृत्यू पावलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलिसांनी संशयित प्रदीप उर्फ दगडू भटू खैरनार (पाटील, वय ४५) यास ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिजाबाई खैरनार या त्यांचा मुलगा प्रदीप याचा विवाह लावून देत नाही असा प्रदीपचा समज झाला होता. जिजाबाई खैरनार यांच्यावर प्रदीपचा राग होता.

Maharashtra TimesNEET पेपरफुटीचा ‘गॉड’फादर कोण? मनीषा हवालदारच्या पतीच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून संशयास्पद बाबी उघड
शुक्रवारी रात्री जिजाबाई खैरनार या प्रदीपची वाट पाहत अंगणात बसल्या होत्या. मध्यरात्री दीड वाजता तो मद्यधुंद अवस्थेत घरी आला आणि त्याने ‘माझा विवाह का लावून देत नाही’, असा सवाल करीत जिजाबाई यांच्याशी वाद घातला. दोघांमधील वाद विकोपास गेल्यानंतर त्याने जिजाबाई खैरनार यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून थेट जाळून टाकले. यात गंभीर भाजल्याने जिजाबाई यांचा अखेर मृत्यू झाला.

Maharashtra TimesPune News: स्वावलंबी होण्यासाठी पाच भावंडांनी सोडलं घर; स्वारगेट बस स्थानकात काढली रात्र, पैसे संपल्याने आई-वडिलांना फोन
या घटनेची माहिती धुळे तालुका पोलिस ठाण्यात देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यानंतर घटनेची सविस्तर माहिती घेतल्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेत पोलिसांनी चौकशीसाठी प्रदीप दगडू खैरनार यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिस दलाची फॉरेन्सिक टीम आणि फिंगरप्रिंट एक्स्पर्ट पथकदेखील दाखल झाले होते.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा