Dhule Borkund Village Bhadane Family Husband and Wife Died in Accident Near Gartad; निष्ठावंत शिवसैनिक, गावात सर्वांशी नाळ जुळलेली, भीषण अपघातात भदाणे दाम्पत्याचा करुण अंत; अख्खं गाव धाय मोकलून रडलं
Dhule Borkund Village Bhadane Family Husband and Wife Died in Accident Near Gartad; निष्ठावंत शिवसैनिक, गावात सर्वांशी नाळ जुळलेली, भीषण अपघातात भदाणे दाम्पत्याचा करुण अंत; अख्खं गाव धाय मोकलून रडलं
Dhule Accident News : राज्यात अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, धुळ्यातील गरताड गावाजवळ एक भीषण अपघात झाला. या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.
धुळे बोरकुंड भदाणे कुटुंब पती पत्नी मृत्यू
अजय गर्दे, धुळे : धुळ्यातील बोरकुंड गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातील प्रगतीशील शेतकरी आणि निष्ठावंत शिवसैनिक अशोक भदाणे व त्यांच्या पत्नीचा एका भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त केली जात असून ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली आहे.
नेमकी घटना काय?
धुळे तालुक्यातील बोरकुंड गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मंगळवारी 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात शिवसेना ठाकरे गटाचे निष्ठावंत पदाधिकारी आणि प्रगतिशील शेतकरी अशोक भदाणे व त्यांच्या पत्नी लता भदाणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धुळ्याहून बोरकुंडकडे दुचाकीवरून परतत असताना गरताड गावाजवळील रेल्वे पुलावर एका भरधाव ब्रेझा कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या भदाणे दाम्पत्याची रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.
कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी नाळ जोडलेले अशोक भदाणे हे परिसरातील अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या अकाली जाण्याने बोरकुंड गावात सर्वत्र शोककळा पसरली असून, ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने आणि बुधवारचा आठवडी बाजार बंद ठेवून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आज सकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात आणि शिवसैनिकांमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू
शिरपूर-चोपडा रस्त्यावर सोमवारी रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा