Headlines

Dharmendra :विवाहित अभिनेत्रीच्या प्रेमात, दोन लग्न होऊनही लोकप्रिय अभिनेत्रीसोबत अफेअर; धर्मेंद्र यांचं वैयक्तिक आयुष्य होतं चर्चेत


Dharmendra Affair : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होते. अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेऊया.

Dharmendra Affairs
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – बॉलिवूडमधील ‘ही-मॅन’ म्हणजेच धर्मेंद्र त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होते. विवाहित असूनही धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. तेव्हा अभिनेत्याचं लग्न हा चर्चेचा विषय ठरलेला. आज आपण अशा एका विवाहित असलेल्या अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत. ती धर्मेंद्र यांच्यासाठी ती स्वतःचं लग्न मोडायला तयार होती.

अभिनेता धर्मेंद्र हे त्यांच्या काळातील सर्वात हँडसम अभिनेत्यांपैकी एक होते. अनेक मुली त्यांच्या प्रेमात होत्या. यामुळेच धर्मेंद्र यांचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. पण एक अशी अभिनेत्री होती जिच्यासोबत धर्मेंद्र यांची लव्हस्टोरी चांगलीच गाजली. ती अभिनेत्री दुसरी कोणी नसून हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ट्रॅजेडी क्वीन’ मीना कुमारी होत्या. धर्मेंद्र आणि मीना कुमारी यांच्या अफेअरची खूप चर्चा झाली होती.

Maharashtra TimesShubhangi Atre : ‘नवऱ्याचं दारूचं व्यसन वाढलं, स्वभाव चिडचिडा झाला’, लोकप्रिय अभिनेत्रीनं सांगितलं लग्नाच्या 19 वर्षांनी घटस्फोट घेण्याचं कारण

मीना कुमारी आणि धर्मेंद्र यांचं अफेअर

मीना कुमारी आधीच विवाहित होत्या आणि त्यांचं ज्येष्ठ अभिनेते-चित्रपट निर्माते कमल अमरोही यांच्यासोबत लग्न झालेलं. लग्न झालेलं असतानाही मीना कुमारी धर्मेंद्र यांच्या प्रेमात होत्या. धर्मेंद्र आणि मीना कुमारी यांचं रिलेशनशिप अनेक वर्ष होतं. धर्मेंद्र यांना बॉलिवूडमध्ये सुपरस्टार बनवण्यात मीना कुमारी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, असंही म्हटलं जातं. मीना कुमारी निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून धर्मेंद्र यांचं नाव सुचवायच्या.

Maharashtra TimesAR Rahman यांच्या मुलाच्या कारला कॅबची धडक, पोर्शे कार जप्त, एआर. अमीन अपघातात जखमी
धर्मेंद्र आणि मीना कुमारी यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं असून सिनेमांमध्ये एकत्र काम करताना त्यांच्यात जवळीक वाढली. ‘पूर्णिमा’, ‘काजल’, ‘फूल और पत्थर’, ‘बहारों की मंझिल’, ‘चंदन का पालना’, ‘मझिली दीदी’ यांसारख्या सिनेमांमध्ये धर्मेंद्र आणि मीना कुमारी यांनी एकत्र काम केलं आहे.

Meena Kumari Dharmendra

धर्मेंद्र आणि मीना कुमारी यांच्या ब्रेकअपचं कारण

धर्मेंद्र यांचं स्टारडम हे ब्रेकअपचं कारण होतं. धर्मेंद्र सुपरस्टार झाल्यानंतर त्यांना अनेक सिनेमांच्या ऑफर्स येत होत्या. आपल्या व्यग्र वेळापत्रकामुळे ते मीना कुमारी यांना वेळ देऊ शकत नव्हते आणि अभिनेत्रीची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. तरीही, धर्मेंद्र मीना कुमारी यांना भेटायला गेले नाहीत. यामुळे मीना कुमारी आणि धर्मेंद्र यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि त्यांचं अनेक वर्षांचं नातं तुटलं.

Celebrity Corner : धर्मवीरमधले राज ठाकरे ते लक्ष्मी निवासचा विश्वा, गोव्याच्या अनुज प्रभू सोबत गप्पा

दरम्यान, धर्मेंद्र यांनी वयाच्या १९व्या वर्षी प्रकाश कौर यांच्यासोबत पहिलं लग्न केलं. या जोडप्याला अजय सिंग, विजय सिंग, विजेता आणि अजिता देओल अशी चार मुलं आहेत. त्यांचं वैवाहिक आयुष्य सुरळीत चाललं होतं, पण १९८० च्या दशकात धर्मेंद्र हेमा मालिनी यांना भेटले. पहिल्याच भेटीत धर्मेंद्र हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी अभिनेत्रीला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन लग्नांनंतरही धर्मेंद्र यांच्या आयुष्यात तिसरी स्त्री आली. ही स्त्री दुसरी कोणी नसून सुप्रसिद्ध अभिनेत्री अनिता राज होती. धर्मेंद्र आणि अनिता यांनी ‘जलजला’, ‘करिश्मा कुदरत का’, ‘इन्सानियत के दुश्मन’ आणि ‘नौकर बीवी का’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यामुळे धर्मेंद्र आणि अनिता यांच्यातील जवळीक वाढली. वृत्तांनुसार, त्या काळात धर्मेंद्र यांनी निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना त्यांच्या चित्रपटांमध्ये अनिता राजला कास्ट करण्याचा सल्लाही दिला होता. जेव्हा हेमा मालिनी यांना याबद्दल कळलं, तेव्हा हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांना सक्त ताकीद दिलेली. यानंतर धर्मेंद्र यांनी अनिता राजपासून स्वतःला दूर केलं.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा