Headlines

devendra fadnavis big statement in chandrapur on state treasury funds policy and destiny ; आमच्याकडे नीती, नियत अन् निधीही; मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला


Devendra Fadnavis: भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नगर परिषदा, नगरपंचायतींमधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा झाल्या.

fadnavis chandrapur
fadnavis chandrapur(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
चंद्रपूर: आम्ही प्रचारसभेत विरोधकांवर टीका करत नाही. त्यांची उणीदुणी काढत नाही, त्यांचा कमकुवतपणा दाखवित नाही. आम्ही विकासाचे ‘मॉडेल’ घेऊन आलो आहोत. आमच्याकडे नीती, नियत आणि निधीदेखील आहे’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

फडणवीस म्हणाले, छोट्या शहरांमध्ये निधी देऊन त्यांचा चेहरा बदलू शकतो. शहरांमध्ये संधी असल्यामुळे गावातील लोक शहराकडे जातात. पण, नियोजन नसल्यामुळे शहरांची अवस्था बिकट झाली. २०१४नंतर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदा देशातल्या शहरांसाठी विविध योजना सुरू केल्या. त्या योजनांच्या माध्यमातून लाखो कोटी रुपये शहरांच्या विकासासाठी दिले. शहरातील घरांचे पट्टे आम्ही देणार आहोत, म्हणजे त्यांचा विकास करता येईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
Maharashtra Timesहे फडणवीसांचं सरकार आहे, जास्त कराल तर कापून काढू; BJP आमदाराची विरोधकांना उघड धमकी
भंडारा, गोंदिया, चंद्रपूरपर्यंत गुंतवणूक विस्तारणार
लॉयड मेटल्सनंतर टाटा स्टील आणि जेएसडब्ल्यू प्रकल्पदेखील गडचिरोलीत आले आहेत. येत्या काळात ही गुंतवणूक केवळ गडचिरोली पुरती मर्यादित राहणार नाही. ती भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूरपर्यंत विस्तारेल. पवनी आणि साकोलीमध्ये विकासकामे केली जाणार आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भंडाऱ्यातील सभेत बोलताना त्यांनी विकासाचे चित्र मांडले.

व्यासपीठावर आमदार परिणय फुके, भाजपचे जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे, माजी खासदार सुनील मेंढे उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार, असा दावा करून विरोधकांनी चुकीची माहिती पसरवली. जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत ही योजना बंद केली जाणार नाही. लाडक्या बहिनींना लखपती दीदींमध्ये रूपांतरित केले जाईल. गेल्या दीड वर्षांत ५० लाख बहिणींना लखपती दीदींमध्ये रूपांतरित केले आहे. लाडक्या बहिणींना मुख्य प्रवाहात आणले जाईल, असे ते म्हणाले. सर्व अतिक्रमणे नियमित केली जातील. त्यांना मालकी पट्टे दिले जातील. बेघरांना नगर परिषदेमार्फत घरे दिली जातील. झुडपी जंगलात अतिक्रमण करणाऱ्यांना जमिनीचे पट्टे आणि घरे दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ayodhya paul राणे पिता-पुत्रांवर हल्लाबोल, एकनाथ शिंदेंनाही सोडलं नाही…अयोध्या पौळ बेक्कार बोलल्या

गडचिरोलीला दक्षिण भारताचे प्रवेशद्वार करणार
गडचिरोली जिल्ह्यात तीन लाख कोटींची गुंतवणूक येत आहे. टाटानगरमुळे झारखंडचे चित्र बदलले. याहून मोठी गुंतवणूक येत असल्याने गडचिरोलीचे चित्र बदलणार आहेत. गडचिरोलीला दक्षिण भारताचे प्रवेशद्वार बनविणार, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. गडचिरोली, देसाईगंज आणि आरमोरी या तिन्ही नगर परिषदांमधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी फडणवीस यांची गडचिरोलीत जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा