Headlines

Devendra fadnavis attacks congress rahul gandhi over womens reservation; देवेंद्र फडणवीसांनीही जेन झींची गर्दी जमवत ताकद दाखवली; राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमावर हल्लाबोल


नागपूर : “काँग्रेस हा दिशाहीन पक्ष झाला असून, अलीकडच्या काळात या पक्षात बोलबच्चन करणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रोज बोलबच्चन करायचे आणि टीव्हीच्या माध्यमातून स्टेटमेंट द्यायचे, एवढेच काम काँग्रेसकडे उरले आहे. स्टेटमेंट देण्यापुरताच काँग्रेस पक्ष मर्यादित राहिला आहे, “अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “काँग्रेस हा दिशाहीन पक्ष झाला आहे. अलीकडच्या काळात या त्या पक्ष्यांमध्ये बोलघेवडे लोक आहे , बोलघेवड्या लोकांचा तो पक्ष झालेला आहे. या पक्षामध्ये सध्या बोलबच्चन करणारे लोक मोठ्या प्रमाणात भरले आहेत. रोज बोलायचे, माध्यमांसमोर वक्तव्य करायचे आणि त्यातून राजकीय वातावरण निर्माण करायचे, एवढेच काँग्रेसचे काम राहिले आहे. राहुल गांधी यांनी महिलांच्या अधिकारांबाबत स्टेजवरून मोठ्या प्रमाणात भाष्य केले. मात्र महिलांना राजकीय अधिकार मिळवून देण्यासाठी सर्वात क्रांतिकारी प्रयत्न म्हणजे महिला आरक्षण विधेयक आहे. संसदेत ३३ टक्के महिला खासदार पोहोचल्या पाहिजेत, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. मात्र राहुल गांधी या महिला आरक्षणाला विरोध करतात,” असा आरोप फडणवीस यांनी केला.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, चित्रा वाघ यांनी काल जो प्रश्न उपस्थित केला, त्याचे उत्तर राहुल गांधी यांनी आधी दिले पाहिजे, संविधानामध्ये संसदेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. संसदेत महिलांना ३३ टक्के प्रतिनिधित्व मिळावे, हा महिलांना अधिकार देण्याच्या दिशेने मोठा निर्णय आहे. महिला आरक्षणामुळे महिलांनाच राजकीय प्रतिनिधित्व मिळणार आहे. त्यामुळे त्याला विरोध करायचा आणि दुसरीकडे पुण्यात जाऊन महिलांच्या प्रश्नांवर भाषण करायचे, ही दुटप्पी भूमिका राहुल गांधी यांनी सोडली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, नागपुरातील ‘जेन झी’ कार्यक्रमाबाबत बोलताना फडणवीस यांनी या कार्यक्रमाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा केला. हा कार्यक्रम सहभागाचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम लोकांना जबरदस्तीने आणून आयोजित केलेला नव्हता, तर ऑरगॅनिक पद्धतीने तरुण तरुणींनी सहभाग घेतला. गेल्या काही दिवसांपासून विविध माध्यमांतून नागपूरमध्ये या कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. कोणालाही पैसे देऊन किंवा वाहनांची व्यवस्था करून गर्दी जमवण्यात आलेली नाही. तरुण-तरुणींनी स्वेच्छेने या कार्यक्रमात सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या ढोल-ताशा परंपरेचे प्रदर्शन करत चार हजारांहून अधिक युवक-युवती सहभागी झाले. जवळपास ५८५ ध्वजधारकांनी आपल्या पथकांसह सहभाग घेत नवीन विक्रम प्रस्थापित केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. शिक्षण, कौशल्य, स्टार्टअप आणि कला या क्षेत्रांमध्ये तरुणांचा सहभाग वाढवणे आणि विकसित महाराष्ट्र तसेच विकसित भारताच्या निर्मितीसाठी तरुणांना योग्य दिशा देणे, हा कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

आदिवासी विद्यार्थी आंदोलनावरही फडणवीस यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले असून, राज्यातील २० हजार विद्यार्थ्यांना अभ्यास, भोजन आणि निवासासाठी प्रत्येकी ६० हजार रुपये देण्याची योजना सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात बोललेल्या काही विद्यार्थ्यांची राजकीय पार्श्वभूमी तपासल्यास ते कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत, हे स्पष्ट होईल, असा दावाही त्यांनी केला.

एसआयआर प्रक्रियेबाबत फडणवीस यांनी ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे सांगितले. आक्षेप आणि शंकांवर पुन्हा तपासणी केल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे पात्र मतदारांचा समावेश होण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात २३ हजार मृत व्यक्तींची नावे आणि २० हजारांहून अधिक डुप्लिकेट नावे असल्याचा दावा करत मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी एसआयआर प्रक्रिया आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत