Free Electricity For Farmers: कागल येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्रांती घडवून बहुजन समाजासाठी शिक्षण आणि रोजगाराची दारे खुली केली. त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे फडणवीस म्हणाले.
Maratha Reservation: मराठा आरक्षण सुनावणी लांबणीवर? न्यायमूर्तीच्या संभाव्य बदलीमुळे नवे पूर्णपीठ स्थापन करावे लागण्याची शक्यताशेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेत ५६ हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी सरकार दर वर्षी २५ हजार कोटी रुपये खर्च करीत असून, ५८ हजार कोटी रुपयांची थकबाकीही सरकारने भरली आहे. सौर कृषी वाहिनी योजनेला गती दिल्याने सध्या ७४ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
साखर उद्योगाच्या स्थैर्यासाठी इथेनॉल धोरण महत्त्वाचे असून, त्यामुळे ऊस उत्पादकांना एफआरपी देणे शक्य होत आहे. साखर कारखानदारीत ‘झीरो वेस्ट’ संकल्पनेतून ‘सीबीजी’ (कॉम्प्रेस बायोगॅस) व ‘सीएनजी’ची निर्मिती केली जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात देशातील पहिला एकत्रित सीबीजी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शाहू महाराजांचे शेतकरी हिताचे कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे सांगितले. कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
Raj Thackeray On Third Mumbai: ‘तिसरी मुंबई’ नेमकी कुणाच्या फायद्यासाठी ? राज ठाकरे यांचा सरकारला प्रश्नफडणवीस-जयंत पाटील यांचा एकत्र प्रवास
कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमदार जयंत पाटील यांनी मुंबई ते कोल्हापूर असा विमानप्रवास केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही त्यांच्यासोबत होते. या तासाभराच्या प्रवासात फडणवीस आणि पाटील यांच्यात राजकीय चर्चा झाल्याचे समजते. शरद पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली भेट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदारांची सोमवारी होणारी पंतप्रधानांसोबतची भेट या पार्श्वभूमीवर या विमानप्रवासामुळे राजकीय चर्चेला पुन्हा वेग आला आहे. सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद आणि जयंत पाटील राज्यात अर्थमंत्री होणार अशाही चर्चा आहेत.

