Headlines

Devendra Fadnavis: राजकीय पोळी भाजताहेत! दिल्ली आंदोलनावरुन मुख्यमंत्र्यांचा आरोप; पोलिस योग्य असल्याचा दावा – cm devendra fadnavis support delhi police lathicharge makes serious allegation


Devendra Fadnavis: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या २० दिवसांपासून जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले.

delhi lathi charge
दिल्ली लाठीचार्ज(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई: ‘कोणत्याही सरकारला स्वतःच्या नागरिकांवर लाठीमार करणे आवडत नाही. जंतरमंतरवरची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी आवश्यक तेवढीच कारवाई केली. मात्र, कोणाचेही नेतृत्व नसलेले, चेहराविहीन आंदोलनात सहभागी झालेल्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा काही पक्ष प्रयत्न करत आहेत’, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला.

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली चलो संसद मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांना आंदोलकांवर लाठीमार करावा लागला. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांवर नाव न घेता टीका केली.

ते म्हणाले, ‘लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. मात्र, अधिकारांसोबत संविधानाने दिलेल्या जबाबदाऱ्यांचाही विचार करणे आवश्यक आहे. शांततापूर्ण आणि परवानगी घेऊन होणाऱ्या आंदोलनांना सरकारकडून परवानगी दिली जाईल. मात्र, जाणीवपूर्वक राजकीय अशांतता निर्माण करण्यासाठी विनापरवानगी आंदोलन करणे, हिंसाचार घडवून आणणे हे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही.

Mumbai Farmers Protest | मुंबईत शेतकऱ्यांचा मोर्चा,काय आहेत नेमक्या मागण्या?

मुख्यमंत्री म्हणाले…
-पोलिसांनी मोठा संयम दाखवला. अधिक गंभीर घटना टाळण्यासाठी कारवाई आवश्यक होती
-आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांवर आरोप करण्याची भूमिका नाही
-अनेक आंदोलक चांगल्या हेतूने आंदोलन करत असतील
-त्यांच्यामध्ये काही लोक स्वतःचा अजेंडा घेऊन घुसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे
-ज्यांचा या आंदोलनाशी काहीही संबंध नाही असे काही राजकीय पक्ष, विविध संघटना आपली राजकीय पोळी भाजत आहेत
-कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला

काही राजकीय पक्षांना त्यांच्या राज्यांमध्ये जनतेने नाकारले आहे; परंतु दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून काही राजकीय पक्षांचा पुन्हा राजकीय संधी शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
Maharashtra TimesDevendra Fadnavis: दिल्ली पोलिसांच्या लाठीचार्जचं समर्थन, आंदोलकांवर गंभीर आरोप; देवेंद्र फडणवीस CJP आंदोलनावर काय-काय म्हणाले?
मारहाणीचे मुख्यमंत्री समर्थन करतात का ?
मुंबई : ‘दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनामागे काही राजकीय पक्षांचा अजेंडा असल्याचे अत्यंत बेजबाबदार विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचे मुख्यमंत्री समर्थन करतात का,’ असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंगळवारी केला. २०१४मध्ये दिल्लीत अण्णा हजारेंच्या आंदोलनातून भाजप व संघाने अजेंडा चालवून देशात अराजक माजवण्याचे काम केले होते, अशा प्रवृत्तींना विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अजेंडाच दिसू शकतो, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. ‘लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे; पण जे लोक संविधानच मानत नाहीत त्यांना आंदोलनाचे महत्त्व कळणार नाही,’ असे ते म्हणाले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा