Aditya Thackeray: फेसलेस आंदोलनामुळेच भाजपच्या तोंडाला फेस, असा आदित्य ठाकरेंनी दिल्ली आंदोलनावरुन मुख्यमंत्री फडणवीसांवर पलटवार केला.
आदित्य ठाकरे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : दिल्लीत जंतरमंतरवरील आंदोलनाला ‘फेसलेस’ म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनात काही अपप्रवृत्ती घुसल्याचा आरोप केला आहे. त्यावर, ‘या फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आला आहे,’ असा पलटवार करीत शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. आंदोलनावरील लाठीहल्ला ब्रिटीशकालीन अत्याचारापेक्षा भयंकर असल्याचेही ते म्हणाले. आंदोलकांना कायदेशीर मदत देण्याची घोषणा करत, shivsenaubtlegal@gmail.com हा ईमेल आयडीवर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
दिल्लीत पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमारानंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. मुंबईत शिवाजी पार्क येथे चैत्यभूमीवर शांततेत आंदोलन सुरू असताना, तिथेही पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. आमचे कार्यकर्ते धावून गेले , त्या मुलांना सोडवले. मात्र, त्या मुलांना पुन्हा नोटीस पाठवून पोलिस ठाण्यात बोलवले. त्यामुळे नीट परीक्षेच्या मुद्द्यावर, सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन केल्याबद्दल गुन्हे दाखल झाले, तर तुम्हाला कायदेशीर मदत करू ,’ असे आदित्य ठाकरेंनी जाहीर केले.
किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा